कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा | प्रतिनिधीचोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.

Read More

कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा घाट परिसरातून कर्जतच्या दिशेने जात असताना रेल्वेच्या एका डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.धूर वाढत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने सामान घेऊन रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी घाबरून धावत्या परिस्थितीत खाली उतरल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या इंजिन अथवा संबंधित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळ रेल्वे परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मोठी दुर्घटना टळलीया घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण तपासले जात आहे.

Read More

खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित PSI यांनी खाकी वर्दीत असतानाच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. PSI यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला काही सांगितले होते का, तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांनी हे पाऊल उचलले, याचा तपास केला जात आहे.दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे हिंगोली पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read More

जामनेर न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

जामनेर प्रतिनिधीसध्याच्या काळात व्यसनाधीनता खुप मोठी समस्या निर्माण झाली असुन विशेषतः युवक वर्गात खुप व्यसन दिसत आहे.गुडखा,गांजा,चरस,दारु यांचा सऱ्यास वापर आता शहर आणि खेड्यात सुद्धा जास्त वाढत आहे.यामुळे घरात, समाजात वाद, भांडणे निर्माण होतात .पैशाचा अपव्यय होऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे.यामुळे समाजातील,घरात तेढ निर्माण होऊन सगळ्यांचेच नुकसान होत आहे.तेव्हा युवकांनी व्यवसनांपासुन दुर रहावे असे आवाहन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती यु.एस.वानखडे यांनी केले आहे.जामनेर न्यायालयात जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकिल संघाच्या विद्यमाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ॲड.तृप्ती देठे यांनी आपल्या भाषणात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता त्यांचे परिणाम तसेच याबाबत असलेले कायदे यांची सविस्तर माहिती दिली.यावेळी जामनेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर बारी सचिव ॲड.डिगंबर गोतमारे तसेच सर्व वकिल बांधव, भगिनी,नागरिक न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.एस.आर.पाटील तर आभार ॲड.देवेंद्र पारळकर यांनी मानले.

Read More

सामरोद जि. प. शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहातगावकरी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचा सक्रिय सहभाग

सामरोद | प्रतिनिधी सामरोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. या वेळी शाळेच्या परिसरातील क्रीडांगण व बागेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सरपंच व पोलीस पाटील यांनी ‘स्वच्छ शाळा, समृद्ध गाव’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच अभ्यासातील एकाग्रताही वाढते, असे त्यांनी सांगितले. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. अभियानाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.

Read More

गोपाल भंडारी सह समाजसेवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विरोधकांचा डाव फसला; पोलिस ठाण्यातील तक्रार मागे ; ग्रामसभेत माफीनामा

शहादा प्रतिनिधी : ग्रामपंचायत शहाणा येथील कथित गैरव्यवहार/भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊ नये, संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई होऊ नये, ग्रामसभा होऊ नये, ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती ग्रामस्थांना मिळू नये तसेच श्री. सुनील सुळे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीवर कारवाई होऊ नये, या उद्देशाने शहादा मतदार संघाचे माजी अपक्ष उमेदवार गोपाल सुरेश भंडारी, जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग सुळे सह समाजसेवकांविरूद्ध पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २६/८/२०२६ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक,दिव्यांग कर्मचारी सुनील सुळे सह काही समाजकंटकांनी दिलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. याऊलट मौजे शहाणा, ता. शहादा येथील ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी आपणास नमूद करतो की, दिनांक २६/०८/२०२६ रोजी काही व्यक्तींनी आमच्याविरुद्ध तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन, सामाजिक अशांतता निर्माण करणे, सोशल मीडिया व व्हॉट्सॲपद्वारे बदनामी व दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावाची बदनामी करणे व शांतता भंग करणे इत्यादी गंभीर आरोपांची तक्रार पोलीस स्टेशन शहादा येथे केली आहे. सदर तक्रारीतील आरोप हे खोटे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.ग्रामपंचायत शहाणा येथील कथित भ्रष्टाचाराबाबत होणारी चौकशी व दिनांक २७/०८/२०२६ रोजी आयोजित ग्रामसभा रोखण्यासाठी तसेच श्री. सुनील सुळे, कृषी सहाय्यक, मंदाणे गट, ता. शहादा यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई होऊ नये म्हणून समाजसेवक व ग्रामस्थांविरुद्ध खोटे व तथ्यहीन आरोप करून बदनामी, दमदाटी व सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गोपाल भंडारी सह शहाणा गावातील अनेक ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २७/८/२०२६ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे विरोधकांचा डाव चांगलाच फसला आहे.ग्रामसभेत याबाबत संबंधितांनी जाहीर माफी मागितली आहे.तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, गोपाल सुरेश भंडारी हे गाव व समाजहितासाठी काम करणारे व्यक्ती असून ते ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गोपाल भंडारी किंवा त्यांचे साथीदार तडीपार नाहीत ते चांगले समाजसेवक आहेत.जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग डेमा सुळे तसेच समस्त ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी हे गावाच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.ते कोणालाही धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणणे किंवा गावात अशांतता निर्माण करणे, खंडणी मागणे असा कोणताही प्रकार करत नाहीत.सुनील सुळे, कृषी सहाय्यक, यांच्या सांगण्यावरून खोटा तक्रार अर्ज देण्यात आला असून तक्रार अर्जावर आमच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा व फाईल बंद करण्यात यावा .

Read More

जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी

जामनेर | प्रतिनिधीजामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी एका प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read More

धुळे | आक्षेपार्ह स्टेटसवरून दोन गटांत वाद; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या प्रकरणात नेमके किती जण जखमी झाले आणि किती जणांवर कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Read More

साखर विक्रीच्या नियमांत मोठा बदल; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

साठेबाजीला बसणार चाप, सप्टेंबरपासून साखर कारखान्यांसाठी पंधरवड्याचा विक्री कोटा नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून साखर कारखान्यांसाठी असलेली मासिक कोटा पद्धत रद्द करून पंधरवड्याची (Fortnightly) विक्री कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा नियमित राहण्यास मदत होणार असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. महिन्याऐवजी आता पंधरवड्याचा कोटा सध्या साखर कारखान्यांना महिन्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा दिला जातो. मात्र, काही ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीला विक्री झालेली साखर प्रत्यक्षात महिन्याच्या शेवटी उचलली जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाजारात काही काळ साखरेची उपलब्धता कमी भासून कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने आता पंधरवड्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीत कारखान्यांना त्यांच्या वाटपातील किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार असून उर्वरित साखर त्यानंतरच्या आठवड्यात विकावी लागेल. विकलेली साखर ७ दिवसांत पाठवावी लागणार केवळ साखर विक्री करून ती कारखान्यातच पडून राहू नये, यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम केला आहे. विक्री झालेली साखर सात दिवसांच्या आत कारखान्यातून डिस्पॅच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे साखर कारखान्यांपासून व्यापारी, वितरक आणि पुढे किरकोळ बाजारापर्यंत साखरेचा प्रवाह वेगाने होण्यास मदत होईल. साठेबाजीवर सरकारची करडी नजर साखरेच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर साठ्याची देशव्यापी तपासणीही सुरू केली आहे. काही साखर कारखान्यांकडे त्यांच्या मासिक अहवालात दाखवलेल्या साठ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक साखर असल्याचे तपासणीत आढळल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय, काही कारखाने त्यांना मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा कमी साखर विकत असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे बाजारातील पुरवठा कृत्रिमरीत्या कमी होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता दरम्यान, सरकारच्या उपाययोजनांनंतर साखरेच्या एक्स-मिल किमतीत अलीकडच्या दिवसांत सुमारे २० टक्क्यांची घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. किरकोळ बाजारातील दरही खाली येण्यास सुरुवात झाली असून त्याचा फायदा पुढील काळात ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या मते, देशात साखरेची कमतरता नसून साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे दरवाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पंधरवड्याचा कोटा, सात दिवसांत डिस्पॅच आणि साठ्याची तपासणी या उपायांमुळे बाजारातील साखरेचा पुरवठा अधिक पारदर्शक आणि नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!