अमळनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू; टकरेखेडा परिसरात हळहळ

जामनेर | प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुली यांचा या घटनेत मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास टकरेखेडा शिवारातील रेल्वे मार्गावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेसमोर गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने टकरेखेडा परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

“जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन; भाविकांचा अभूतपूर्व उत्साह”

जामनेर : जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराज यांच्या पवित्र छडीचे आगमन झाल्याने शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रामदेव बाबा नगर, भुसावळ रोड येथे आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी श्री तेजस पाटील, श्री जुतू काका पाटील, श्री अतिष भाऊ झाल्टे ,श्री दिपक भाऊ तायडे यांच्यासह जामनेर शहरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. श्री गुरु गोरखनाथजी व श्री गोगाजी महाराज यांच्या कृपेने आयोजित या सोहळ्यास जामनेर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भाविकांनी श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पवित्र छडीच्या आगमनामुळे रामदेव बाबा नगर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जामनेरमध्ये प्रथमच असा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांसह सर्व सहकारी व भाविकांनी मोलाचे योगदान दिले. “जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन” हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Read More

जामनेरच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा; १ कोटींच्या निधीतून ‘नमो उद्यान’ साकारणार

जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडणार असून, शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालणारे ‘नमो उद्यान’ उभारण्यात येणार आहे. सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उद्यानाची माहिती भाजप नेते गिरीश महाजन आणि साधना महाजन यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे देण्यात आली आहे. पोस्टमध्ये जामनेरच्या विकासात आणखी एक सुंदर पाऊल म्हणून या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी चालण्याचा मार्ग ‘नमो उद्यान’मध्ये विविध वयोगटातील नागरिकांचा विचार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र चालण्याचे मार्ग, आकर्षक बाग तसेच फवारे उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा, ज्येष्ठांना फिरण्यासाठी सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांना विरंगुळ्यासाठी हिरवाईने नटलेले ठिकाण उपलब्ध होणार आहे. हिरवाईसोबत आरोग्यदायी वातावरण जामनेर शहरातील नागरिकांसाठी अधिकाधिक हिरवे आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उद्यानाच्या संकल्पित आराखड्यात हिरवळ, पादचारी मार्ग, बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळाचे क्षेत्र आणि आकर्षक लँडस्केपिंग दिसून येते. त्यामुळे पूर्णत्वानंतर हे उद्यान जामनेरमधील एक प्रमुख सार्वजनिक आकर्षण ठरू शकते. शहराच्या सौंदर्यात पडणार भर जामनेर शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सार्वजनिक हिरव्या जागा आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ‘नमो उद्यान’ प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पामुळे जामनेर शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार उद्यान, हिरवे वातावरण आणि विरंगुळ्याची जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. १ कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या या ‘नमो उद्याना’कडे आता जामनेरकरांचे लक्ष लागले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात आणि उद्यानाचे लोकार्पण कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. फोटो : ‘नमो उद्यान’च्या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा

Read More

चोपडा तालुक्यात बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश; १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई; बाटल्या, लेबल, बुचे आणि सीलिंग मशीन ताब्यात चोपडा | जळगाव : चोपडा तालुक्यात बनावट देशी मद्य निर्मितीचा प्रकार उघडकीस आला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील बनावट दारू निर्मिती आणि विक्रीच्या साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यात बनावट देशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान बनावट मद्याच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणावर रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. याशिवाय दारूच्या बाटल्यांसाठी वापरण्यात येणारे लेबल, बुचे, स्वयंचलित सीलिंग मशीन आणि बनावट मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य पथकाच्या हाती लागले. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १८ लाख ३२ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. बनावट दारू तयार करण्याची यंत्रणाच उघड या कारवाईत बाटल्या आणि पॅकिंग साहित्याबरोबरच स्वयंचलित सीलिंग मशीन आढळल्याने बनावट मद्य तयार करून त्याचे पॅकिंग करण्याची यंत्रणा कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तयार केलेले बनावट मद्य कुठे आणि कोणामार्फत विक्री केले जात होते, याचा तपास आता उत्पादन शुल्क विभागाकडून केला जात आहे. ज्ञात-अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा या प्रकरणी ज्ञात-अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे बनावट दारू निर्मितीचा नेमका उद्देश, या व्यवसायामागील व्यक्ती तसेच वितरणाची साखळी याबाबत माहिती गोळा केली जात आहे. बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. 📍 ठिकाण : चोपडा तालुका, जि. जळगाव💰 जप्त मुद्देमाल : ₹१८ लाख ३२ हजार ५००🚨 कारवाई : राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक

Read More

गरुड विद्यालयाच्या एस.एन.दांडगे मॅडम यांचे राष्ट्रीय पातळीवरील हिंदी नवीकरण प्रशिक्षण यशस्वी

राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कारशेंदुर्णी : आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. एन. दांडगे मॅडम यांनी केंद्रीय संस्था,हैदराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील 500 वे हिंदी नवीनीकरण अभ्यासक्रम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण 10 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संपन्न झाले.या प्रशिक्षणादरम्यान NEP 2020, भारतीय ज्ञान परंपरा,प्रभावी पाठ नियोजन,भाषा कौशल्यांचा विकास तसेच आधुनिक काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.बदलत्या शैक्षणिक पद्धती आणि तंत्रज्ञानाशी शिक्षकांनी अद्ययावत राहून त्याचा प्रभावी वापर अध्यापन प्रक्रियेत करावा,यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीश डी.पवार,सहाय्यक प्राध्यापक, हैदराबाद विद्यापीठ तसेच वैभव गायकवाड, डीसीपी, हैदराबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणामध्ये एकूण 36 शिक्षकांचा सहभाग होता. त्यामध्ये 8 महिला व 28 पुरुष शिक्षकांचा समावेश होता. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.दांडगे मॅडम यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार राष्ट्रीय पातळीवरील हिंदी नवीकरण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल एस.एन.दांडगे मॅडम यांचा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एन.कोळी, उपप्राचार्य बी. एम. कुमावत,पर्यवेक्षक पी.पी. पाटील व व्ही. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल एस.एन. दांडगे मॅडम यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.

Read More

चोपडा तालुक्यात तीन अस्वलांचा शेतमजुरांवर हल्ला; दोन शेतमजूर जखमी

चोपडा : तालुक्यातील एका परिसरात तीन अस्वलांनी दोन शेतमजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात दोन्ही शेतमजूर जखमी झाले आहेत. जखमी शेतमजुरांनीच परिसरात तीन अस्वल असल्याची माहिती दिली आहे. अस्वलांनी अचानक हल्ला केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने अस्वलांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही जखमी शेतमजुरांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अस्वलांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

Read More

नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी रंगकर्मींनी घेतली आयुक्तांची भेट

बालगंधर्व खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा; रंगकर्मींनी आयुक्तांना दिले निवेदन कलावंतांसाठी महत्त्वाच्या नाट्यगृहाची दुरवस्था; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष जालगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील कलावंत आणि रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी आता रंगकर्मींनी केली आहे.यासंदर्भात रंगकर्मींनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. नाट्यगृहाची सद्यस्थिती पाहता कलावंत आणि प्रेक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रंगकर्मींनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.बालगंधर्व खुले नाट्यगृह हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे रंगकर्मी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read More

कर्णकर्कश बुलेटचा आवाज बंद! जळगाव पोलिसांनी सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

*‘फटाका’ सायलेन्सरवर पोलिसांचा बुलडोझर; जळगावात अनेक सायलेन्सर जप्त* *वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची खैर नाही; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंचा इशारा* जळगाव दि. 25(प्रतिनिधी) जळगाव शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष मोहिमेदरम्यान नियमबाह्य आणि मोठा आवाज करणारे बुलेटचे सायलेन्सर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या सायलेन्सरवर थेट रोडरोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. त्यामुळे बुलेटला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्यांचे आता चांगलेच टेन्शन वाढले आहे.

Read More

जामनेर विधानसभा क्षेत्रात भाजप महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात

जामनेर | प्रतिनिधी जामनेर येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महिला कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामाची दिशा देणे, बूथस्तरापासून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि महिलांशी प्रभावी संवाद साधून पक्षाचे विचार व विविध उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर अधिक सक्रिय राहून संघटन विस्ताराला प्राधान्य द्यावे, तसेच महिलांच्या प्रश्नांशी संबंधित विषय प्रभावीपणे जनतेसमोर मांडावेत, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. आगामी काळातील पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांवरही चर्चा करण्यात आली. बैठकीस भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव व जळगाव जिल्ह्याच्या पूर्व प्रभारी सविताताई जयस्वाल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन, जामनेर शहर मंडळाच्या अध्यक्षा कल्पना पाटील, जामनेर पूर्व मंडळाच्या अध्यक्षा सुनीता गोरे, जामनेर पश्चिम मंडळाच्या अध्यक्षा लीना चव्हाण यांच्यासह नगरसेविका, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच प्रत्येक बूथपर्यंत महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील भाजप महिला मोर्चाच्या अलीकडील संघटनात्मक बैठकांमध्येही बूथस्तरावर संघटना मजबूत करण्यावर आणि अधिकाधिक महिलांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रातील या बैठकीमुळे महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

रावेरमध्ये POCSO प्रकरणात खळबळ; लॉजिंग मॅनेजरसह तिघांवर कारवाई

जळगांव | प्रतिनिधी रावेर शहरातील सावदा रोडवरील एका लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलीला खोली उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी लॉजिंग मॅनेजरसह संबंधित तरुणावर कारवाई केली असून, अल्पवयीन मुलीच्या उपस्थितीमुळे प्रकरणाला POCSO कायद्याची गंभीर कलमे लागू करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सावदा रोडवरील वैशाली लॉजिंग येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि २३ वर्षीय तरुण आढळून आले. या दोघांकडून कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच आवश्यक रजिस्टरमध्ये योग्य नोंद न करता त्यांना रूम उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे लॉजिंगच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही पोलिसांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांच्या तपासणीत प्रकार उघडकीस रावेर पोलिसांकडून हॉटेल-लॉजिंगची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलगी लॉजिंगमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली. तसेच लॉजिंगच्या रजिस्टरची तपासणी करण्यात आली. या प्रकरणात लॉजिंगमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून ओळखपत्र घेणे आणि त्यांची नोंद ठेवणे या नियमांचे पालन झाले नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित लॉजिंग मॅनेजरची भूमिका तपासण्यात आली. POCSO कायद्यांतर्गत गुन्हा अल्पवयीन मुलगी असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पोलिसांनी BNS कलम 64(2)(1), 351(2)(3) तसेच POCSO कायद्यातील कलम 4, 16 व 22 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लॉजिंग मॅनेजरसह संबंधित तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेतील प्रत्येक बाबीचा तपास केला जात असून, अल्पवयीन मुलीला लॉजिंगमध्ये नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणण्यात आले होते, याचाही तपास केला जात आहे. लॉजिंग व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे शहरातील लॉजिंग आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकांकडून ओळखपत्र घेणे, रजिस्टरमध्ये नोंद करणे आणि अल्पवयीन व्यक्तींशी संबंधित प्रकरणात विशेष दक्षता घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि हरिदास बोचरे करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची नोंद : अल्पवयीन मुलीची ओळख किंवा तिच्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती जाहीर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!