आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले.

ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

error: Don't Try To Copy !!