वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )
जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे.

💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!
आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल.

जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!
या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!
जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

error: Don't Try To Copy !!