आप्पासाहेब र.भा.गरूड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेची सहविचार सभा संपन्न

धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित, आप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी संचालक यांच्या उपस्थितीत शिक्षक,शिक्षकेतर सहविचार सभा पार पडली याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड,उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासो.सागरमलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, ज्येष्ठ संचालक बापूसो भीमराव पाटील,संचालक डॉ.राजेंद्रजी शेळके,कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,संस्थेचे वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक,आर एस चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजयजी

भोळे,प्रा.डॉ.श्याम साळुंखे, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभेप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांनी भूषविले सर्वप्रथम प्रतिमापूजन व माल्यार्पण नंतर प्रास्ताविक आर एस.चौधरी यांनी केले नंतर एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संस्थेतील सर्व शाळांच्या,मुख्याध्यापकांचा व, शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.


मान्यवरांच्या मनोगतात संस्थेचे सहसचिव यु यु पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करत विविध प्रकारच्या शालेय कामकाजाबद्दल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या क्षमता वृंदिगत व्हाव्यात व विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक वाटचालीतून स्वयंपूर्णता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तद्नंतर सचिव सागरमलजी जैन यांनी शिक्षक आदर्श असून त्यांनी समाजापुढे व आपल्या विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण करावा असे विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात संजय दादा गरुड यांनी आदेश वजा सूचनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व भाऊसाहेब यांनी

स्वतःअपडेट राहून नवीन गोष्टींचा स्वीकार करावा तसेच कुठल्याही प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून आपले जे टेक्नोसेवी काम असतील ते आपण स्वतः करावेत अशा सूचना केल्या.त्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित करून नवीन शैक्षणिक धोरणाला तोंड देण्यासाठी सज्ज राहुन प्रत्येक शिक्षकाने बदल स्वीकारून स्वतःमध्ये व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणावा अशा अपेक्षा व्यक्त करत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी जी पाटील यांनी केले व आभार पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांनी मानले.

error: Don't Try To Copy !!