पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या धरतीवर या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन च्या “योग संगम” कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भुसावळ येथील सेन्ट्रल रेल्वे मैदान येथे दि.२१ जून रोजी सकाळी ६ वा. आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जळगाव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निदेशक श्री.पांडुरंग चाटे, श्री. राजेंद्र फातले यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सदर ‘योग संगम’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुसावळ शहर व परिसरातील इच्छुक नागरिकांनी दि.२१ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.