जामनेर, दि. २१ जून २०२५ –
इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेरपुरा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता शासकीय प्रोटोकॉलनुसार योग सत्राला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीर घोडेस्वार यांनी करताना “करो योग, रहो निरोग” या संकल्पनेवर आधारित योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले.
या कार्यक्रमात ओंकार, प्रार्थना, विविध योगासन, प्राणायाम, फेसिंग योग, हास्य योग, टाळ्यांचा व्यायाम आणि ध्यान यासारख्या अनेक प्रकारांचे सविस्तर प्रात्यक्षिक प्रा. समीर घोडेस्वार यांनी दिले. विद्यार्थ्यांनी या सर्व कृती हसत-खेळत आत्मसात केल्या.

प्रा.दिनेश महाजन यांनी संतुलित आहाराचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले, तर प्रा.सुमित काबरे यांनी फास्ट फूड व पॅकबंद पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन. चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.के.डी. निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक व्ही.जी.महाजन, पर्यवेक्षक पी.पी.चौधरी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बी.पी.बेनाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशामध्ये आर जी चौधरी, किशोर चौधरी, प्रितेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तो नियमित केल्यास विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होतील, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.