लोहारा ता. पाचोरा दि.१९
कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील भाजपा सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली.
विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन ,गरीब कल्याणाची या अकरा वर्षाच्या काळातील लेखा जोखा मांडण्यासाठी मा. नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन कुऱ्हाड येथे दि.१९ रोजी आयोजन करण्यात आले.
या सभेचे अध्यक्ष पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे होते. सभेचे वक्ते जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती माजी सभापती सुभाष पाटील, कैलास चौधरी, शरद सोनार हे होते. यावेळी क्त्यांनी मोदीजींच्या काळात झालेली विकास कामे सांगितले. , तसेच कलम 35 अ,देशातील जनतेच्या भावनांची कदर करून ३७० वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेऊन दाखवला.

भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानप्रेरित होता हे भारताने जगाला ठणकावून सांगितले.
तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, महा डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे थेट अनुदान, शेतीसाठी लागणारे उपकरणे जसे की ट्रॅक्टर, रोटर, पेरणी यंत्र, उज्वला योजनेत मोफत गॅस सिलेंडर. तसेच शेतकऱ्यां साठी मागेल त्याला सोलर, सूर्य घर योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कुठलीही पायपीट न करता मिळत असल्याचे सांगितले. खाजगी वाहनधारकांना तीन हजार रुपयां मध्ये वर्ष भारतासाठी नॅशनल हायवे वरील टोल साठी पास मिळत आहे.
देशात ८० कोटी गरीब जनतेला दरमहा पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. अश्या अनेक योजना मोदीजींच्या काळात जनतेला मिळत आहे.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा गेल्या अकरा वर्षांत कायापालट झाला आहे व होतो आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा मोठा विश्वास आहेच, यापुढेही जनता त्यांना साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे असे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा पाचोरा पूर्व अध्यक्ष शोभाताई तेली,
भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मुकेश पाटील,
शेतकी संघ संचालक शिवदास तात्या पाटील, प्रकाश पाटील, नरू बापू पाटील तसेच लोहारा-कुऱ्हाड-गोराडखेडा गटातील शेतकरी, नागरिक, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते , गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती प्रमुख, केंद्रप्रमुख , बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख , विभागातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
प्रास्ताविक शरद सोनार, सूत्रसंचालन कैलास चौधरी तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.