“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले.

स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे.

कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

error: Don't Try To Copy !!