JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे.अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे. अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

बीजेएस कार्यकर्ते आणि जिल्हाधीकारीं यांचे सोबत या वर्षी तलावातिल गाळ काढणे बाबत चर्चा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवआज दि 5 मार्च रोजी भारतीय जैन संघटना व मा जिल्हाधीकारी आयुष प्रसादसरांचीगाळयुत्त शिवार व गाळ मुक्त बंधारा/धरण, नाला खोलीकरण यां विषयांवर यांचे सोबत सविस्तर चर्चा संपन्न झाली या चर्चेत मा जिल्हा धिकारी, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जल संधारण विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी , तसेच भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, BJS जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जलंगाव तालुका प्रमुख पंकज जैन ,रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर , भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगांव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल व BJS जळगांव अध्यक्ष अजय राखेचा, bjs जलकार्य जिल्हा समनव्याक गणेश कोळी यांचे सोबत चर्चा संपन्न झाली तसेच 15 तालुक्यातील bjs चे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवां पर्यन्त पोहोचून तलावातील गाळ शेतात गहेवून घेवून जाणे साठी प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी तयार आहेत अशी हमी विनय पारख यांनी दिली. लवकरच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार आणि बिडिओ आणि सरपंच यांचे सोबत मीटिंग घेताना bjs च्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करावे असे जिल्हयाधिकाऱ्यांनी सांगितले .

Read More

बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन

जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अनेक महिने लोटले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन दिले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक फोटो समोर आले असून, आरोपींनी दाखवलेली क्रूरता पाहता, त्यांना जलदगतीने कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे. शिवसेना तालुका अध्यक्ष भरत पवार, उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, तालुका संघटक प्रवीण ठाकरे, गटप्रमुख सचिन सोनार, उपशहर प्रमुख खुशाल पवार, नितीन राजूरकर, विशाल, सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

तलावातील गाळ काढण्यासाठी BJS कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला. BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read More

जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

जामनेरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान तर्फे स्वच्छता अभियानात १०.३७० टन कचरा संकलन

रविवार, २ मार्च, २०२५जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर दि.२ मार्च -महाराष्ट्र भुषण आदरणीय तीर्थरूप डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे जामनेर शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. दि. २ मार्च रोजी जामनेर नगरपालिके समोर जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी महास्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी नगर परिषदेचे सी.ई.ओ. नितीन बागुल, महेंद्र बाविस्कर, आतिश झालटे, जितू पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे इ. मान्यवर व श्री बैठकीतील श्रीसदस्य स्वच्छता अभियान प्रसंगी उपस्थित होते. महास्वच्छता अभियानामध्ये जामनेर शहरातील मुख्य रस्ते दोन्ही बाजूनी स्वच्छ करण्यात आले. तसेच शासकिय इमारतीं , शासकिय तांत्रिक विद्यालय, आय टी. आय कॉलेज, विश्रामगृह , पोलिस निरीक्षक बंगला, सरकारी हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, बस स्टॉप, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषर कार्यालय , न्यायालय परिसर, मधूबन कॉलनी सह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता अभियानामध्ये १२ ट्रैक्टर, ७ मालवाहू रीक्षा या वाहनांमार्फत ६८१ श्री सदस्यांकडून 3.५२० टन ओला कचरा व ६.८५० टन सुका कचरा.असा एकूण १०.३७० टन कचरा संकलित करण्यात आला. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट ओझर रस्त्यावरील डम्पिंग ग्राऊंड याठिकाणी करण्यात आली.जामनेर शहरात केलेल्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!