JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली. या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

प्रतिनिधी -सुपडू जाधवमहाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

जामनेर येथून आरोपीस अटक – बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे केली होती घरफोडी

जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव: बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर उर्फ बाल्या याला जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ६०/२०२५, भादंवि कलम ३०५ , 331 (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीवरून जामनेरमध्ये अटक: गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी जामनेर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस प्रशासनाची जलद कारवाई: 🔹 घरफोडीप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपी जामनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.🔹 स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.🔹 बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील घरफोडी प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी पोलीस यंत्रणा या यशस्वी कारवाईमुळे पोलिस प्रशासनाने दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही लपण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. पोलिसांच्या या त्वरित हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान: या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक डोमाळे , पो.हे.का विनोद पाटील , पो.ना रणजीत जाधव, पो.का ईश्वर पाटील, पो.का राहुल महाजन तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांचा नागरिकांना संदेश: ➡ कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.➡ गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.➡ घरफोडी, चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक: या जलद कारवाईमुळे बेटावद खुर्द (ता. जामनेर) आणि जामनेर परिसरातील नागरिकांनी जळगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यात अशा कठोर कारवाया सुरूच राहाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ➡ “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर (जि. जळगाव) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद! आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावे भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष पाठपुरावा! या प्रकल्पाची गती वाढावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही लक्ष! शेतकऱ्यांना वेळेत सिंचन सुविधा मिळावी आणि शेती समृद्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा मिळून शेती जलसंपन्न होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे. 💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

Read More

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More

गरुड विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यशस्वी

शेंदुर्णी : येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता राठोड, डॉ. जितेंद्र वानखेडे, औषध निर्माता प्रियंका वानखेडे, आरोग्य सेविका हर्षा गवळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षण पूर्ण केले. तसेच, काही विद्यार्थ्यांना किरकोळ तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी येथे पाठविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य जपण्याचे विविध उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिता राठोड व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी आरोग्य जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. एम. शिरापुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read More

निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व सफाई अभियान

जामनेर : संत निरंकारी मिशनच्या वतीने परम पूज्य निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या मोहिमेअंतर्गत जामनेर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र सोनबर्डी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये जामनेर ब्रांच आणि सेवादल UNIT – 1359 चे सर्व सेवादल भाई आणि बहन यांनी सक्रिय सहभाग घेतला. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने हे अभियान यशस्वीपणे पार पडले. या प्रसंगी प्रल्हादजी वाघ, रतनसिंग परदेशी, देविदास पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, शालिग्राम घुले, नामदेव सुरळकर, देविदास चिंचोले तसेच जामनेर, नवी दाभाडी, सोनारी, बोरगाव, पहूर येथून अनेक सेवादल सदस्य उपस्थित होते.

Read More

जामनेर पंचायत समितीमार्फत 9820 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल मंजुरीपत्र वाटप

जामनेर रविवार, 23 फेब्रुवारी, 2025 जामनेर प्रतिनिधी (सुपडू जाधव )प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत देशभरात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यातील 9820 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून, त्यातील 7744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी बांधकाम अभियंता जे. के. चव्हाण, माजी उपसभापती नवल राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंदा लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण ₹1,46,000 अनुदान मिळणार आहे. पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Read More

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन सोयगाव तालुका.. प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व ग्रामपंचायतबॉडी व ग्रामसेवक यांच्या नाहक हलगर्जीपणामुळे देव्हारी पिंपळवाडी इथून वाटर सप्लाय विहिरीवरून येणारी मेन पाईपलाईन वरती देव्हारे येथील शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून आपल्या शेतात शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी पाईपलाईन करून घेतली आहे व त्यातूनच नव्हे तर सावळदबारा फाट्याजवळ सुद्धा काही अज्ञात लोकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे ग्रामपंचायत सावळदबारा कार्यालयाला व संबंधित सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करता 24 तास पाणी सुविधा देण्यात येत आहे पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळद बारा ग्रामपंचायतची व अवधरीत्या पाणी उपसा तेथील शेतकरी काही लोक सर्रासपणे शेतीला व इतर कामाला पाणी घालत आहे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकीमध्ये उशिरा पाणी येते आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना भोगाव लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन वरती कारवाई न केल्याने काही देणे घेणे करून नळ कनेक्शन देण्यात आले आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाणी जास्त प्रमाणात लागत आहे अवैध नळ घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे नळ कनेक्शन घेतली जात आहेजब्बार तडवी ,(सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा सर्कल

Read More
error: Don't Try To Copy !!