मुल्यवर्धन प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचा आत्मविशवास आणि कार्य क्षमता वाढेल…. गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे
शेंदुर्णी – मुल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचा आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षाकांची कार्य क्षमता सुधारेल आणी त्यांना विद्याथ्यामध्ये मुल्ये रुजवण्याचा आत्मविश्वास मिळेल. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांनी शेंदुर्णी येथे गरुड प्राथमिक शाळेत आयोजीत प्रशिक्षणत केले.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण 3. 0 दिनांक – 01-10-2025 पासून 08-10-2025 पर्यंत दोन टप्प्यात समूह साधन केंद्र शेंदुर्णी येथे आ. ग. गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे सुरु असून या प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे , मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक, लखन कुमावत यांनी भेट दिली.गटशिक्षाणाधिकारी विष्णू काळे यांनी मार्गदर्शन करतांना या प्रशिक्षणाची उपयोगीता व शिक्षकाची भुमिका स्पष्ट केली. तसेचे विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणूक करणे, सामाजीक जवाबदारीची जाणीव निर्माण करणे, संवेदनशील आणी सहकार्यशील नागरीक घडवणे, शाळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे.असे मूल्यवर्धनाची उदिष्ठे स्पष्ट केली.यावेळी कुलाचे कुलसंचालक तथा केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे , गरुड शाळेच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड , तसेच सुलभक रविंद्र सपकाळे व योगेश इंगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोपाल कुमावत यांनी केले.
