जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सवात तोरनाळा शाळा प्रथम

वाकडी.ता.जामनेर.दि.०२/१०/२४ येथून जवळच असलेल्या का.आ.विद्यालय तोरनाळे सध्या धावत्या युगाची परिस्थिती पाहून तसेच ऑनलाईन व मोबाईलच्या धावत्या युगाचा विचार डोळ्यासमोर येऊन आपल्या सांस्कृतिक परंपरला व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जळगाव येथे प्रथम भुलाबाई महोत्सवात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, जिल्ह्यातील अनेक संघांनी महोत्सवात सहभाग नोंदवला होता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह जळगाव येथे आयोजित केलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी तर्फे जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धेत तोरनाळे येथील काशीराम आनंदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, भुलाबाईची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हा वारसा नवीन पिढीला मुलीन पर्यंत पोचवण्यासाठी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, स्पर्धकांनी जिल्ह्याभरातील अनेक उपस्थितीची मने जिंकली, विजेता संघाला जळगाव येथील खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले, विजेता संघाला शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.पाटील, भाऊसाहेब महेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले, तसेच शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्योती रेसवाल,मनिषा पाटील, गजानन पाटील, गौरव पाटील, वादक धोंडू महाराज यांचे सहकार्य लाभले, तसेच ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संस्थेचे चेअरमन सुपडूसिंग पाटील,व्हाईसचेरमन सरदारसिंग पाटील, सचिव प्रताप सिंग पाटील, जेष्ठ संचालक बाबुराव पाटील, सन्माननीय संचालक मंडळ शिक्षक वृंद कर्मचारी पालकवर्ग ग्रामस्थांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Don't Try To Copy !!