JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

विटनेर येथे स्व. ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ एक्वा पाणपोईचे लोकार्पण

विटनेर (ता.जळगांव ) – गावाचे सुपुत्र स्वर्गीय ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ विटनेर येथे उभारण्यात आलेल्या एक्वा पाणपोईचे लोकार्पण मा. ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते संपन्न झाले.गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. स्व. ललितदादा साठे यांनी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक केली.कार्यक्रमास मा. श्री. पप्पूदादा सोनवणे (जि.प. सदस्य), मा. श्री. हरीशेठ साठे (माजी पं. स. सभापती), मा. श्री. साहेबरावदादा वराडे (माजी पं.स. सदस्य), नेहाताई ललित साठे (लोकनियुक्त सरपंच, विटनेर), मा. श्री. रमेशआप्पा पाटील, मा. श्री. शिवराज पाटील, मा. श्री. पी. के. पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्व. ललितदादा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Read More

प्र. प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना उत्कृष्ट समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार……

शेंदुर्णी ता.जामनेर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सह समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार मा.श्री मनोज चौधरी उपमहापौर, महापालिका, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आला . त्यांच्या सोबत मा.श्री चंद्रशेखर पाटील स्थायी समिती सभापती, महापालिका जळगाव ,मा.श्री दिपक सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष जळगाव ,श्री.गजानन देशमुख, माजी नगरसेवक,श्री शिवाजी पाटील, शिक्षण संस्था चालक धरणगाव,श्री मनोज कोळपकर, गृहरक्षक समादेशक, जळगाव ,नगरसेवक श्री संजय देविदास सूर्यवंशी , शेंदुर्णी , तसेच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा .दादासाहेब संजयराव गरुड वप्रा. सुनील गरुड सर, जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.सत्कार व सन्मान केल्याबद्दल प्र.प्राचार्य डॉ. संजय भोळे व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

Read More

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानभवनात कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आमदार पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

Read More

वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. एस. पाटील यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्कार

जामनेर (प्रतीनिधी) वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी. एस. पाटील (अप्पासाहेब) यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते श्री पाटील सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री पी. एस. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, “पाणी अडवा–पाणी जिरवा” उपक्रम, पशू-पक्षी संवर्धन तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवून समाजात जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री पी. एस. पाटील यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच अण्णासाहेब भास्करराव गरुड माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पाटील सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. एन.एम.एम.एस. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दर्शन समाधान मोरे, हर्षल गणेश जाधव, तेजस राहुल दुसाने व रितेश मुरलीधर सपकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र भाऊ बाविस्कर (नगरसेवक, जामनेर), कमलाकर भाऊ पाटील (मा. सभापती), नवल भाऊ पाटील राजपूत (माजी सभापती), सदाशिव चौरे सर, इंदिराबाई ललवाणी (उपमुख्याध्यापक, जामनेर), सुपडू सोनार (सेवानिवृत्त शिक्षक, टाकळी), डॉ. राहुल माळी (शांताई हॉस्पिटल, जामनेर), अरुण सातव सर (सातव क्लासेस, जामनेर), प्रा.ईश्वर चोरडिया, प्रा. सागर बाविस्कर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण सर गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी भूषविले. तसेच बाळूभाऊ चौरे (ग्रामपंचायत सदस्य), सारंगधर अहिरे (माजी सरपंच), समाधान वराडे, दीपक बाविस्कर, रमेश वराडे, पवन महाजन, उमेश बंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनाई क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Read More

मानसिंग आप्पांचा ८१ वर्षांचा सुवर्णप्रवास — सहस्रचंद्र दर्शनाचा अनोखा गौरव सोहळा संपन्न..!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरबोदवड प्रतिनिधीआज आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे आपल्या सर्वांचे आदरणीय माझ्या परिवाराचे कायम ऋणानुबंध असलेले गो.बा.ढाके महाविद्याल ऐणगावचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक उत्सवमूर्ती मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम आप्पांच्या परिवाराने घडवून आणला.या प्रसंगी मंचावर ॲड. जगनदादा लोखंडे, पुरुषोत्तम गड्डम सर, गोपालजी अग्रवाल, डॉ. विजय पाटील, डॉ. सुधीर पाटील, भरत आप्पा पाटील, पवन राजे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रोहन लोखंडे यांनी केले. प्रस्ताविक भरतसिंह राजपूत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन अतुल पाटील व विशाल पाटील यांनी केले.व्यासपीठावरील मान्यवरांनी मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 🌿 पर्यावरण प्रेमी संजय वराडे यांच्या हस्ते फणस वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.आप्पांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोयात्रींना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला आप्पांचा संपूर्ण परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महेंद्रसिंग सर व संपूर्ण परिवार यांनी परिश्रम घेतले.हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नव्हे, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि जीवनमूल्यांचा उत्सव होता.

Read More

वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस

वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.

Read More

गोद्री येथे शांततामत वातावरणात सर्वव धर्मीय शिव जयंती साजरी समाजसेवक अक्षय पाटील यांचे अमोल सहकार्य

तोंडापूर ता. जामनेर येथून जवळच असलेल्या गोद्री येथे सर्व समज बांधवामार्फत डी जे च्या तालावर नाचत अतिशय शांततापूर्ण वातावरणात पोलीस संरक्षण शिवाय शिव जयंती साजरी करण्यात आली.या वेळी गोद्री येथील समाजसेवक अक्षय पाटील याच्या हस्ते गावाच्या वतीने ग्रामपंचायत आवारातील छत्रपती शिवाजी महाराष्ट्रचंच्या आश्वावृढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी अक्षय पाटील यांच्या वतीने संपूर्ण गावाला अन्नदान करण्यान्त आले, तसेच गावातील युनूस तडवी, रुबाब तडवी, विष्णू कोळी, प्रकाश कोळी, गणेश देशमुख, सागर कोळी,गजानन पाटील, निखिल कोळी, चेतन कोळी, यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे गोद्री येथील शिवजयंतीसाठी पुण्याहून सत्त्यम कड, ऋतिक चव्हाण, आनंद कड,रुपेश कड,तुषार बचचे,अजित रागडे,जगदीश हलडेकर,मिनीनाथ गव्हाणे उपस्थित होते

Read More

समाजासाठी येणारे काळ जोखमीचा नंदकिशोर साखला

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधी – सध्याची सामाजिक स्थिती पाहता येणारा काळ हा समाजासाठी जोखमीचा असेल, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी व्यक्त केले. ते साक्री तालुक्यातील बळासाने तीर्थ क्षेत्रात खानदेश विभागातर्फे आयोजीत खानदेश विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेह मिलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीओम विश्वकल्याण विमलनाथ तीर्थभूमी ट्रस्टचे खजिनदार व पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते. नमस्कार महामंत्राने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानदेश उपाध्यक्ष स्व. लतीश जैन यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित केली.प्रास्ताविक खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.साखला पुढे म्हणाले, समाजातील समस्या ओळखणे, त्यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून उपाय सुचविणे ही संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची कार्यशैली राहिली आहे. चाळीस वर्षापासून निरंतर हे काम सुरू आहे. समाजात अनेक बदल झाले आहेत. मुला-मुलींमध्ये शैक्षणिक स्तर भिन्न झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्याने समस्या वाढल्या आहेत. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. त्यासाठी आपल्या व्यवहाराने संस्काराने राहणीमानाच्या पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या पाया मजबूत करण्यासाठी संघटने बारा महिन्यात 14 कार्यक्रम दिले हे कार्यक्रम यशस्वी करणे प्रत्येक शाखेचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी, कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे.समाजकारणात करता करता अनेक जण राजकारणात गेले. खानदेशात पंचवीस शाखा कार्यरत असून वर्षभरात 120 फाउंडेशन कार्यक्रम त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील एकूण कार्यक्रमात 40% हिस्सा आहे.राज्य उपाध्यक्ष विनय पारखे यांनी येत्या वर्षात खानदेशाने किती कार्यक्रम घेतले पाहिजे याचे टार्गेट दिले. माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी संघटनेने नव्याने सुरू केलेले पारिवारीक अदालत विषयी माहिती दिली. राज्य सचिव विजय दुगड यांनी संघटनेचे कार्यक्रम घेण्याचे आव्हान केले. डॉक्टर कांतीलाल टाटीया यांनी संघटनेने पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याची व संघटनेचे महत्व विशद केले तर जयश्री गोगड यांनी अंकाचे महत्व सांगितले.**कार्यक्रम दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सन्मानपत्र देऊन केला.ललित रमनलाल छाजेड(शहादा), दीपक प्रवीणजी डांगी (जामनेर), धीरज ओस्तवाल(शेंदुर्णी), देवेंद्र चंदनमल जैन (नंदुरबार),अमर जैन(जळगांव), निर्मल कोठारी( भुसावळ), नितीन जैन (मुक्ताईनगर )जयश्री विनोदकुमार पगारिया (साक्री) तर विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या राजेंद्र टाटिया (साक्री जैन संघ अध्यक्ष),चंद्रकांत डागा(ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी सदस्य),जोशीला पगारिया(गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय महिला अध्यक्ष)मनोज डागा(अखिल भारतीय खरतरगछ परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुमित मुनोत(समस्त ज़िला समन्वयक), जयश्री गोगड (एस्ट्रॉलॉजर) यांचा सत्कार शॉल, माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला.**सन 2025मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक फाउंडेशन कार्यक्रम घेतल्या बद्दलतळोदा,जामनेर व शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष राहूल जैन, कुशल बोहरा,सौ मोना चोरड़िया व मयुर ओस्तवाल यांचा त्यांच्या टीम सह ट्रॉफी देऊन सत्कार केला.नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, जयश्री पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सोनाली कोठारी तर आभार विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी मानले.

Read More

वाकडी गरुड विद्यालयात शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न

शेंदूर्णी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) – शेंदूर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री व्ही. बी. पाटील सर होते. प्रारंभी अध्यक्ष तसेच श्री दीपकभाऊ परदेशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत सर यांनी केले.जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदर्शी राज्यकारभाराविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनी गीतगायनातून महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.उपशिक्षक श्री आर. एस. चौधरी सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची थोरवी वर्णन केली व कवितेद्वारे मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात श्री व्ही. बी. पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडत त्यांच्या आदर्श राज्यपद्धती, सर्वधर्मसमभाव व लोककल्याणकारी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. एम. भुरट सर व श्रीमती व्ही. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे. एम. नाईक सर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More
error: Don't Try To Copy !!