वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे. 💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

Read More

जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..

जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

Read More

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.

Read More

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Read More

राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल खालील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गौरविण्यात आले आहे. यादी भाग – १ सुरेश वामन गोपाळयादी भाग – ५० विलास देवलाल तागवालेयादी भाग – ६८ विजय सुकराम कोळीयादी भाग – ८१ शेख बिलाल शेख अहमदयादी भाग -१०६ राजूसिंग पंचमसिंग चौधरीयादी भाग -११३ समाधान मारोती किरोतेयादी भाग -१८५ साजिद अहमद अ.रशीदयादी भाग -२०२ मुकुंद भगवान वारंगेयादी भाग – २५८ संजीव त्र्यंबक बारीयादी भाग – ३३४ संतोष तुळशीराम वरखड

Read More

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य न्यायाधीश दि.न. चामले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश भुषण काळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रशांत सूर्यवंशी, वकील संघाचे अध्यक्ष कमलाकर बारी, सचिव दिगंबर गोतमारे सहा. सरकारी अभियोक्ता ॲड कृतिका भट, ॲड रुपाली चव्हाण सह सर्व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड अशोक डोल्हारे, अरुण नाना, व्हि एस पाटील, ॲड शिवाजी सोनार, ॲड प्रकाश पाटील आर बी पाटील, बापुजी बाविस्कर, ॲड बी एम चौधरी, ॲड महेंद्र पाटील ॲड अनिता पाटील, ॲड सोनाली सुरवाडे, ॲड शिल्पा सावळे, ॲड रुपाली पाटील सह सर्व वकील बांधव, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर न्या. चामले यांनी आपल्या भाषणात सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. न्यायालयाचे आवारात काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्याचे संपूर्ण श्रेय न्या. चामले यांनी न्यायालयायीन कर्मचारी जावळे, बेलिफ परसोडे यांना दिले. अत्यंत उत्साहात भारताचा प्रजासत्ताक दिन येथील न्यायालयात साजरा करण्यात आला.

Read More
error: Don't Try To Copy !!