आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार उपक्रम उत्साहात संपन्न

जामनेर :- आज दिनांक २९ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आनंददायी शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच स्वच्छ शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत स्वच्छता उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि आनंदातून शिकण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत झाली. मुख्याध्यापिका नजराना मॅडम व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन

अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव (Fire Disaster Mock Drill) आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रात्यक्षिक सरावामुळे विद्यार्थ्यांना आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने, प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे प्रतिसाद देण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी, आत्मविश्वास आणि व्यावसायिक क्षमता वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी उद्भवू शकते. अशा वेळी रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, तातडीने प्राथमिक उपचार देणे, सुरक्षित स्थलांतर करणे, आपत्कालीन पथकांशी समन्वय साधणे आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, यामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक सरावादरम्यान विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेची मूलभूत तत्त्वे, आपत्कालीन प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अलार्म देणे, संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे, नागरिक व रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करणे, घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणे आणि बाधित व्यक्तींना तातडीने प्राथमिक उपचार देणे, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये बाधित व्यक्तींना रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षितपणे रुग्णालयात हलविणे आणि रुग्णालयात आवश्यक आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचाही समावेश करण्यात आला. सुरुवातीच्या आपत्कालीन प्रतिसादापासून सुरक्षित स्थलांतर, रुग्णवाहिकेद्वारे वाहतूक आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारापर्यंतच्या विविध टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार तसेच विविध विभागांमधील प्रभावी समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिक सरावात उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रदर्शन केले. या उपक्रमातून संघभावना, प्रभावी संवाद, नेतृत्वगुण, तत्पर निर्णयक्षमता तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सहाय्यक पथकांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची तसेच रुग्णांची सुरक्षितता कशी राखावी, संभाव्य धोके कसे ओळखावेत आणि परिस्थितीला नियोजनबद्ध पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत आत्मविश्वास मिळाला. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील दुवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (वैद्यकीय) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. सतीश मोरे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल; डॉ. मयुरी वाळुंज, कॅज्युअल्टी ऑफिसर (अपघात व आपत्कालीन विभाग अधिकारी) आणि श्री. आंबोरे, सुरक्षा अधिकारी यांचे सहकार्य व मोलाच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्य आणि प्रा. डॉ. योगिता औताडे, उपप्राचार्य तथा विभागप्रमुख, समुदाय आरोग्य परिचर्या विभाग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल टेमकर, प्रा. अमित कडू, सहयोगी प्राध्यापक श्री. निलेश म्हस्के, श्री. राहुल कडू, श्री. विशाल पुलाटे आणि श्री. प्रशांत अम्ब्रीत यांनी मॉक ड्रिलचे प्रभावी समन्वय व आयोजन केले. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव हा बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि अनुभवसमृद्ध उपक्रम ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद याबाबत जागरूकता वाढली. त्याचबरोबर अशा परिस्थितीत आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये, आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. भविष्यातील परिचारिका म्हणून विद्यार्थ्यांना आपत्कालीन व आपत्तीजन्य परिस्थितीत सक्षमपणे कार्य करता यावे आणि रुग्ण तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी योगदान देता यावे, यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासासोबतच गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी महाविद्यालयाची ही वचनबद्धता निश्चितच कौतुकास्पद आहे.

Read More

1)पाण्यात पोहण्यासाठी उतरले अन् काळाने घातला घाला; रेतीबंदर खाडीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू 2)तानसा नदीत दोन सख्ख्या भावांचा अंतदुसरी हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे घडली.

ठाणे | प्रतिनिधीठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या रेतीबंदर खाडी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ गेले होते. यावेळी तिघेही खाडीत पोहण्यासाठी उतरले.मात्र खाडीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधमोहीम सुरू केली.सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यात नदी, खाडी, धरणे आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली असते. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read More

जामनेरात रिपब्लिकन पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटनकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

जामनेर | प्रतिनिधी :जामनेर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.उद्घाटन कार्यक्रमाला रणजीत जोरे, गणेश सपकाळ, शेखर सुखाडे, यादव सुखाडे, विक्रम बनोडे, दादाराव मेहे, गोपाळ सपकाळ, नितीन सपकाळ, एकनाथ सपकाळ, प्रदीप लोखंडे पंचरासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जामनेर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Read More

रक्षा खडसेंकडून नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाची कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

राजकारणाच्या पलीकडे परिवाराचे नाते महत्त्वाचे; शरद पवारांच्या उपस्थितीने अमृत महोत्सवाला मिळाला मान भाजपमध्ये मी, राष्ट्रवादीत नाथाभाऊ; विचारधारा वेगळी असली तरी कौटुंबिक नाते कायम असल्याचे स्पष्ट भाजप आमदार गैरहजर राहिल्याची खंत नाही; आले आणि न आलेल्या सर्व नेत्यांबद्दल रक्षा खडसेंनी व्यक्त केला आदर बऱ्याच दिवसांपासून अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. हा अमृत महोत्सव एक परिवार म्हणून साजरा केला जात आहे. आज निखिल आपल्यात नाही, तरी प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांकडून असा उत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा असते. घरातील सदस्य म्हणून आणि निखिलच्या जागी मी आहे. नाथाभाऊंनी मला नेहमी मुलीसारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे, असे मी मानते. राजकारण वेगळे आहे आणि राजकारणाच्या पलीकडे परिवाराची एक जबाबदारी असते. त्यामुळे यावेळी सर्वांनी ठरवले की, नाथाभाऊंचा अमृत महोत्सव साजरा केला पाहिजे. नाथाभाऊंनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, राजकारणाच्या पलीकडे सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांची ओळख आणि संबंध आहेत. अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यासपीठावर यावे आणि त्यांचा मानसन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. नाथाभाऊंसोबत अनेकांनी काम केले आहे. त्या निमित्ताने का होईना, त्यांचा उल्लेख आणि सन्मान झाला पाहिजे. याच अनुषंगाने सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे राजकारणाचा रंग देण्यात आलेला नाही. हा पूर्णपणे पारिवारिक संबंधातून आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध पक्षांचे अनेक नेते या ठिकाणी आले. प्रत्येकाला ज्या वेळी सोयीचे झाले, त्या वेळी ते येथे येऊन गेले. ही अमृतभूमी कोथळी ही आदिशक्ती मुक्ताईची भूमी आहे आणि याच भूमीत नाथाभाऊंचा जन्म झाला. त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईच्या आशीर्वादाने मी असो किंवा नाथाभाऊ असोत, आज मोठ्या पदावर राहून समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. हा मुक्ताईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे परिवारातील एक सदस्य म्हणून मी भागवत सप्ताहातही सहभागी झाले. ऑन : भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार कार्यक्रमाला उपस्थित नाही मला राजकारणावर बोलायचे नाही. मात्र, एवढेच सांगू इच्छिते की, मी किंवा आमच्या परिवारातर्फे प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले आहेत. कोणी येत आहे, तर कोणी येऊन गेले आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये राजकारणाचा कोणताही उल्लेख न करता सर्वांना निमंत्रण देण्याचे काम आम्ही केले. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तर काही जण प्रत्यक्ष येऊन गेले. ऑन : शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला सत्कार मला भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा संधी मिळाली. तीन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा मला अभिमान आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन मी या घरची सून आहे. त्यामुळे या संदर्भातील माझे कर्तव्य मी नक्कीच पार पाडत आहे. नाथाभाऊंची खूप इच्छा होती की, त्यांचा अमृत महोत्सव साजरा व्हावा. त्यामुळे परिवारातील सदस्य म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शेवटी काहीही झाले तरी हा आमचा परिवार आहे. आमचे एकमेकांशी असलेले नाते कोणापासूनही लपलेले नाही. हे सर्वांना माहीत आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मी भारतीय जनता पक्षात आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. त्यांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलेली आहे, तर मी भाजपची कार्यकर्ता आहे. भाजपने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवून आम्ही हा कार्यक्रम सर्वपक्षीय ठेवला आहे, जेणेकरून सर्वांचा मानसन्मान व्हावा. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी एक सून आणि परिवारातील सदस्य म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी हे सात दिवस मी परिवारातील एक सदस्य म्हणून काम करत आहे.

Read More

एकनाथराव खडसे यांचा अमृतमहोत्सव

: जाणकार यांचे सध्या काय चाललंय? : खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भाजप किंवा महायुतीचा एकही मोठा नेता उपस्थित नाही पंकजा मुंडे यांचाही दौरा अचानक रद्द भाजपसह महायुतीचे नेते अनुपस्थित राहिले ? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस लक्ष्मण हाके ओबीसींनी आता एकत्र येण्याची वेळ जरांगे यांच्यामागे ग्रामीण जनतेचे संघटन आहे. ओबीसी समाज खूप मोठा आहे, परंतु आपल्यात अद्याप तशी एकजूट आणि संघटनात्मक बांधणी दिसत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील संवाद कमी पडतेय का? 8

Read More

अमळनेर–गलवाडे रोडवर भीषण अपघात; उभ्या डंपरला दुचाकीची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील अमळनेर–गलवाडे रोडवर उभ्या असलेल्या डंपरला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर–गलवाडे मार्गावर डंपर रस्त्यावर उभा होता. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची डंपरच्या मागील बाजूस जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे रस्त्यावर काही काळ मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अमळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृतांची ओळख, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि डंपर रस्त्यावर कोणत्या परिस्थितीत उभा होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या अपघातामुळे अमळनेर–गलवाडे मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्त्यावर अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read More

कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा | प्रतिनिधीचोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.

Read More

कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा घाट परिसरातून कर्जतच्या दिशेने जात असताना रेल्वेच्या एका डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.धूर वाढत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने सामान घेऊन रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी घाबरून धावत्या परिस्थितीत खाली उतरल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या इंजिन अथवा संबंधित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळ रेल्वे परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मोठी दुर्घटना टळलीया घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण तपासले जात आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!