JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

मुल्यवर्धन प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचा आत्मविशवास आणि कार्य क्षमता वाढेल…. गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे

शेंदुर्णी – मुल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचा आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षाकांची कार्य क्षमता सुधारेल आणी त्यांना विद्याथ्यामध्ये मुल्ये रुजवण्याचा आत्मविश्वास मिळेल. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांनी शेंदुर्णी येथे गरुड प्राथमिक शाळेत आयोजीत प्रशिक्षणत केले.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण 3. 0 दिनांक – 01-10-2025 पासून 08-10-2025 पर्यंत दोन टप्प्यात समूह साधन केंद्र शेंदुर्णी येथे आ. ग. गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे सुरु असून या प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे , मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक, लखन कुमावत यांनी भेट दिली.गटशिक्षाणाधिकारी विष्णू काळे यांनी मार्गदर्शन करतांना या प्रशिक्षणाची उपयोगीता व शिक्षकाची भुमिका स्पष्ट केली. तसेचे विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणूक करणे, सामाजीक जवाबदारीची जाणीव निर्माण करणे, संवेदनशील आणी सहकार्यशील नागरीक घडवणे, शाळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे.असे मूल्यवर्धनाची उदिष्ठे स्पष्ट केली.यावेळी कुलाचे कुलसंचालक तथा केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे , गरुड शाळेच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड , तसेच सुलभक रविंद्र सपकाळे व योगेश इंगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोपाल कुमावत यांनी केले.

Read More

चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप

जळगाव ता. जि. जळगावआज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ. सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी, शिवकृपा समुहातील सौ. सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टॉलसाठी, आदर्श समुहातील सौ. अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान स्वयंसहाय्यता समुहातील सौ. कविता सोनवणे यांना शिवणकामसाठी तर सत्यमेव जयते समुहातील सौ. सरला संजय दांडगे फुटवेअर विक्री अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपजीविकेसाठी निधी प्राप्त करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक यांनी दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरला पाटील, प्रभाग समन्वयक जळगाव दिनेश न्हाळदे, स्वप्नील पाटील पंचायत समिती जळगाव, सरुबाई जाधव वावडदा, कल्पना ठोंबरे विटनेर, विद्या पाटील पाथरी, मालुबाई पाटील वसंतवाडी, मोनिका पाटील जळके, रपेशा पाटील वडली या सर्व C.R.P. तसेच साधना सपके वसंतवाडी बॅक सखी, मनिषा पाटील वडली पशुसखी, वैशाली घाडगे विटनेर पशुसखी, विजया पाटील वावडदा कृषी सखी, तसेच जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव जिल्हा शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि.के. पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक बबन वाघ, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील व मोठ्या संख्येने बचत गट महीला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

ऐन वन्यजीव सप्ताहातच नीलगायचा मृत्यू – वनविभागावर दुर्लक्षाचा आरोप

प्रतिनिधी / जब्बार तडवी, सोयगावदि. 07 ऑक्टोबर 2025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावाजवळील पाझर तलावाच्या काठावर एक मादी नीलगाय मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. ऐन वन्यजीव प्राणी सप्ताहातच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक शेळीपालकांनी नीलगाय मृतावस्थेत असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांना दिली. त्यानंतर पत्रकार घटनास्थळी पोहोचले असता, मोकाट कुत्र्यांचा मोठा झुंड मृत नीलगायचे अवशेष फाडताना दिसून आला. पत्रकारांना पाहताच कुत्र्यांनी तिथून पळ काढला. या परिसरात काही दिवसांपासून वन्यप्राणी दिसत असूनही, वनविभागाने कोणतीही दक्षता घेतलेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे. नीलगायचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, ऐन वन्यजीव सप्ताहात घडलेली ही घटना वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

Read More

भारतीय जैन संघटना व महावीर पब्लिक स्कूल आयोजित शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न झाला

पहुर : भारतीय जैन संघटना आणि महावीर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) होते. प्रमुख उपस्थितीत श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल), श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा), श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा आणि श्री. दीपक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे यांच्यासह एकूण २० आदरणीय शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सोहळ्याला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, उपाध्यक्ष जोशी, सचिव भामरे सर, शरद बेलपत्रे तसेच अन्य पत्रकार बांधव आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

Read More

जामनेरात भव्य रावण दहनाची तयारी जोरात ….

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर शहरात दशहरा उत्सवाच्या पारंपरिक रावण दहनासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या वर्षीचे रावण दहन मंत्री गिरीश महाजन आणि सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते केले जाणार आहे.उत्साहात रंगलेल्या या कार्यक्रमात नगरातील नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन आहे. रावण दहनाची सोहळा संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, उत्सवाच्या पारंपरिक रंगात नगर रंगून जाईल.आयोजकांनी नागरिकांना विनंती केली आहे की, सर्वांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत या आनंदसोहळ्यात सहभागी व्हावे.तारीख आणि वेळ: 2/10/2025 सायंकाळी 7 वाजतास्थळ: दसरा मैदान मम्मा दैवी मंदिर समोर, जामनेरया दशहरा उत्सवात सहभागी होऊन रावण दहनाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिस करू नका

Read More

जि.प.प्राथमिक शाळा वाकडी येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी

वाकडी येथे दि.३० सप्टेंबर रोजी वाकडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आली. त्या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान वडगाव सद्दो शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक आवटे यांनी भूषवले. या शिक्षण परिषदेसाठी जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विष्णू काळे साहेब उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन सरानुसार विद्यार्थ्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबवून आपण निश्चितपणाने अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून गुणवत्ता निर्माण करू शकतो असा विश्वास काळे साहेबांनी उपस्थित शिक्षकांना दिला. तसंच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा शिक्षणकप सद्यस्थितीत प्रथम क्रमांक वर असलेला जामनेर तालुका निश्चितपणाने उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी आजपर्यंत सर्व शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक आदरणीय काळे साहेबांनी आपल्या मनोगतात केले. वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केंद्रातील शाळांच्या निपुण महाराष्ट्र अभियान संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेस उपस्थित असलेले फतेपूर व तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर यांनी सुद्धा अध्ययन स्तर निश्चितीच्या संदर्भात उपस्थितांना सविस्तार मार्गदर्शन केले.वाकडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. तर तर श्री विनोद नाईकडा यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले तर आभार श्री सूर्याजी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर शामराव पाटील, श्री शेखर महाजन व श्री प्रकाश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचेआ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे . या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

वाकडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी-फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार

वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०९/०२५ वाकडी येथे प्रामुख्याने भरपूर शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान झाले ,अतिवृष्टी अकस्मात संकटामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे,या आठवड्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन,तूर,मका,केळी इतर कडधान्ये,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बराच ठिकाणी शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजेश नाईक, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी आज वाकडी येथील शेतकरी बाजीराव जोशी यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी तसेच वाकडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जावून सर्व भागाची पाहणी केली,वाकडी येथील तलाठी परशुराम पवार, कोतवाल वैभव न्हावी यांनी शेतात जावून पिकांची पाहणी करून पंचनामे केली आहे,कुठला नुकसान ग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या लवकर अहवाल तयार करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

जामनेरकरानो ऐआय अतिशय घातक / आपल्या मुला-मुलीची काळजी घ्या जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवआज आपण जानुन घेणार ऐआय म्हणजे कुत्रिम वस्तुने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कुत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजेंअस) ऐआय असे म्हणतात.आजच्या युगात प्रत्येक घरात लहान मोठे मुल मुली विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाइल लॅपटाॉप वापरतात. यांचा वापर कधी कधी आपल्या कुटुंबा साठी घातक ठरतो. मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोअर वरुन अनेक जण वेगवेगडी फोटो ईडिटीगची अॅप डाऊनलोड करतात. यातीलच ऐक अॅप चर्चेत आहे ते म्हणजे ऐआय या संबधीचे अनेक अॅप आहेत. ते मानवी जिवनासाठी हे घातक ठरत आहे. याचे मोठे धोके आहेत. या धोक्याना ओळखणे गरजेचे आहे. या मुळे आपल्या सुरक्षा हक्कावर परीणाम होतो. या बद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. ऐआयचा वापर ऐखाद्या हानी साठी होण्यासाठीचा वापर वाढलाय.काही ऐआय आवाज फोटोच /विडीओच विश्लेषण करत. या मुळे आपल्या मोबाईल मधील आपला सुरक्षित डेटा सुद्धा चोरीला हडपला जातों. आयचा चालु असलेला आवाज/ फोटो/विडीयो ट्रेड घातक रुप धारण करत आहे. म्हणजे सर्व माहीत असुनही आपण आपल्या सोबत फ्राॉड करुन घेतोय. या ऐआय चा वापर काही मस्करी म्हणुन तर काही ऐखाद्याची हानी करण्यासाठी जास्त होतोय. या मार्फत आपला आवाज बनवला जातो फेस ऐखाद्या विडीओ फोटोत वापरला जातो जो खराखुरा भासतो. यांचा वापर अश्लिलिलतेत सुद्धा होतो. या मुळे ऐखाद्या व्यक्तिच जीवन ऊद्धवस्त होण्याची वेळ येते. आपल्या मोबाईल वरती आपली फोटो विडीयो कुटुंबा तील व्यक्तिची फोटो आपण आपलोड करत असतो.त्याचा वापर आपली हनी_बदनामी करण्यासाठी कुणाकडुनही होतो अशे प्रकार आपल्या जामनेर शहरात सुद्धा ऊघडकीस आलेले आहे. ते सर्व कुत्रिम रित्या बनवलेल असत परंतु ते दिसायला खर वाटत अशी भयानक ति आवाजाची फोटो/वाडीओची ईडिटीग असते. जे ततोतंत खरी वाटते. या मुळे अनेकाचे आयुष्य ऊद्धवस्त झालेत तर आत्महत्या चे प्रमाणही वाढलेल आहे. ऐखाद्याच्या बदनामी साठी अश्लीलता वापरुन ऐआय व्दारे बनवलेले विडीओ/फोटो/ ऑडिओ रेकाॉर्डीग ऐखाद्यास आत्महत्यास मंजबुर करु शकते. काही दिवस आधीच शहरातील शिवभक्त अविनाश बोरसे याचे व्हाट्सएप/ इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनी केला गेला. हजारो लाखो लाईक फाॉलो असलेल अकाउंट बंद पाडले गेले.बोरसेचा आवाजाचा व फोटोचा वापर सुद्दा काही फेक अकाउंट व्दारे फसवणुकीसाठी बदनामी साठी केला गेल्याच समोर आल होत. बोरसेनी धाडसाने हिमंतीने या गोष्टीचा सामना केला. तशी तक्रार सुद्धा त्यानी दाखल केलेली आहे. सर्व जामनेर शहरातील तालुक्यातील सर्व नागरीकाना जनतेला अवाहन आहे. आपल्या कुटुंबा चे तुमचे मुलामुलीचे भविष्य ऐआय मुळे ऊद्धवस्त होणार नाही यांची काळजी घ्या

Read More
error: Don't Try To Copy !!