छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला…
जेबीएन महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी जामनेर प्रतिनिधी. जब्बार तडवी दिनांक 01/11 /2025 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांना चालना देणारी आमची संस्था. संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते पा.जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी तिने जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा बहूमान वाढविला संस्थेच्या वतीने विद्यार्थिनीचा व क्रीडा शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दरवर्षीय राज्यातील विविध शाळेतून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थिनी सोनम तडवी या विद्यार्थिनीने हा बहुमान पटकावून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक पटकावला होता. यामधून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होती ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आदिवासी समाजातील अतिशय कष्टाळू व गरीब कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून अभ्यासात हुशार असणारी परिस्थितीवर मात करत आपल्या कला व मेहनतीच्या बळावर तीन हजार मीटर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचा व संस्थेचा बहुमान वाढवला. सोनम तडवी हिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी दररोज व्यायाम व सकस आहार आणि कठोर मेहनत हेच माझ्या यशाचे गुपित असून यासाठी मला शाळेतील प्राचार्य संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळू शकले त्याबद्दल तिच्या घरच्यांनी व तिने स्वतः शाळेचे व संस्थेचे विशेष आभार मानले.जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या सोनम कबीर तडवी बारावी वाणिज्य या मुलीने तृतीय क्रमांक पटकवून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते व संचलाक मंडळ यांनी तिच्या जाहिर सत्कार केला तिच्या यशाबद्दल प्राचार्य नारायण कोलते यांनी क्रीडा शिक्षक जय राम घोती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावल्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान केला. या विद्यार्थिनीला माध्यमिक शिक्षणापासून क्रीडा शिक्षक विजय सिंग राजपूत भास्कर कमांड सुदामसिंगराठोड व डॉ. प्रा.जयराम घोती यांचे विशेष मार्गदर्शन होते याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार जीवन कोलते यांनी मानले.
