जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री दिपक ढोणी पाटील तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Read More

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More

कायदा-सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध… जामनेर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक किशोर पाटील यांची नियुक्ती

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर: जामनेर शहराच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, किशोर पाटील यांची जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला असून, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळणार आहे किशोर पाटील यांनी जामनेर शहराच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.संवादादरम्यान, उपनिरीक्षक पाटील यांनी जामनेरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.नवनियुक्त उपनिरीक्षक पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, शहराच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.जामनेरच्या विकासात आणि सुरक्षिततेच्या दिशेने ही एक मोठी पावले उचलली गेली असून, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही अपेक्षित आहे.

Read More

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज गट विकास अधिकाऱ्यांची (BDO) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीचा उपयोग, तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ✅ शासकीय योजनांची अंमलबजावणी: विविध योजनांची प्रगती व अडथळ्यांवर चर्चा.✅ ग्रामपंचायतस्तरावरील कामांचे परीक्षण: स्थानिक विकासकामांची स्थिती व नियोजन.✅ पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता: या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या योजनांचे पुनरावलोकन.✅ निधीचा योग्य वापर व पारदर्शकता: निधी वितरणाची समीक्षा व कार्यक्षमतेवर भर.✅ जनतेच्या तक्रारींचे निवारण: नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठरवलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “लोकहिताची कामे जलद व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला गेला असून, गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून प्रशासनाच्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकरीत्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More

नामदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याच्या जागेची केली पाहणी

नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे. याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More

जामनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू.. हातगाडी, टपरीधारकांमध्ये नाराजी, राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे करणार हस्तक्षेप

जामनेर, ७ मार्च २०२५ (प्रतिनिधी: सुपडू जाधव, जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज) जामनेर नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान केली असून, याअंतर्गत अनेक रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते, शहराचे सौंदर्य राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. अचानक कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. प्रभावित व्यावसायिकांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत नगर पालिका प्रशासनाशी चर्चा करून व्यावसायिकांचे मत मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक नागरिकांनीही प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर आक्षेप घेत, काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!