ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Read More

जामनेर सोंनबर्डी येथे 15 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्य,नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह??

जामनेर सोंनबर्डी येथे स्विमिंग पुल मध्ये 15 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामुळे स्विमिंग पुल बांधकाम आणि त्यासाठी ची नियमावली बघता. स्विमिंग पूल व्यवस्थापन आणि परवानगी देणारे प्रशासन झोपा झोडत होते का?? स्विमिंग पूल हा क्रीडा प्रकारात येतो. परंतु, कोणत्या क्रीडा प्रकारासाठी सदर पुल बांधण्यात आला. त्यामुळे याला परवानगी देत असताना अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का??त्यानंतर पुलाची रचना बघता येथे नियमानुसार तज्ञ मार्गदर्शक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध का नव्हत्या???सदर पुल मध्ये उतरतांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोणीही कसे या खोल पुलात उतरून पोहू शकते??असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिका प्रशासन आणि क्रीडा विभाग वेळोवेळी तपासणी करीत होते का??हा ही प्रश्न मोठा जिकरीचा झाला आहे. यामुळे एका निष्पाप जीवाला हकनाक बळी जावे लागले असल्याचे मत जनमानसात आहे.यावर आता प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांच्या नजरा लागून आहे. की, राजकीय वरद हस्तात प्रकरण निकाली निघेल हे बघणे औचीत्याचे ठरेल.

Read More

शहरातील सोंनबर्डी येथे स्विमिंग पुलात बुडून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू.

जामनेर शहरातून एक दुदैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात एका पंधरा वर्षे मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. संकेत निवृत्ती पाटील 15 वर्ष राहणार घोसला,त.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता.जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील प्रसिद्ध सोनबर्डी येथे बॅक वॉटर बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांन सोबत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बुडाल्याची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला. संकेत निवृत्ती गावंडे ( पाटील ) हा जामनेर येथील शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तो आपल्या लहान भाऊ आणि आजी सोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. संकेत पाटील हा आज शाळा बुडवून पोहण्यासाठी सोनबर्डी येथील स्विमिंग पूल वर गेला होता गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये नुकतच पाणी भरण्यात आलं होतं. स्विमिंग पूल चालू करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. त्यासाठी स्विंगपूलाची डागडूची आणि इतर काम पूर्ण करण्यावर नगरपालिका प्रशासन जोर देत होतं. मात्र आज अचानक संकेत पाटील आपल्या काही मित्रांसोबत स्विमिंग पूल येथे आला होता. या स्विमिंग पूल मध्ये मुलांना अडवण्यासाठी तिथे कोणीच सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. अशातच संकेत पाटील हा आपल्या मित्रांसोबत या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र हाच पोहण्याचा मोह संकेत पाटील च्या जीवावर बेतला आणि स्विमिंग पूल मधील पाण्यात तो बुडाला. स्विमिंग पूलाची डागडूजी करण्यात येत असल्याने तिथे पाणी भरण्यात आल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे सीईओ बागुल यांनी दिली आहे.

Read More

राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल खालील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गौरविण्यात आले आहे. यादी भाग – १ सुरेश वामन गोपाळयादी भाग – ५० विलास देवलाल तागवालेयादी भाग – ६८ विजय सुकराम कोळीयादी भाग – ८१ शेख बिलाल शेख अहमदयादी भाग -१०६ राजूसिंग पंचमसिंग चौधरीयादी भाग -११३ समाधान मारोती किरोतेयादी भाग -१८५ साजिद अहमद अ.रशीदयादी भाग -२०२ मुकुंद भगवान वारंगेयादी भाग – २५८ संजीव त्र्यंबक बारीयादी भाग – ३३४ संतोष तुळशीराम वरखड

Read More
error: Don't Try To Copy !!