Headlines

बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष पदी गफुर तडवी यांची निवड

बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष पदी गफुर तडवी यांची निवड यावल प्रतिनिधी फिरोज तडवी बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष मा. गफुर अरमान तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर तडवी यांनी बिरसा फायटर्सचे समाजासाठी रात्रंदिवस कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली, तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करुन मा. गफुर अरमान तडवी यांची यावल तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर अरमान तडवी यांना बिरसा फायटर्स कशाप्रकारे समाजातील विविध कार्य करते हे त्यांना सांगण्यात आलेआदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती, संवर्धनासाठी संविधानिक हक्क व अधिकार, आरक्षण वाचविण्यासाठी, आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देणे, पाठपुरावा करणे, प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषण करणे इत्यादी लोकशाही मागणी लढा देणे, न्यायिक लढाई लढणे, आदिवासी क्रांतीकारकांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी एका वैचारिक व सामाजिक चळवळ लढाई लढण्यासाठी संघटनेची आवश्यकता होती. आदिवासी समाजाची ही गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक व सामाजिक लढाऊ संघटनेची निर्मिती केली आहे. असे बिरसा फायटर्सचे कार्य पटवून दिले बिरसा फायटर्स संघटनेत आपण सहभागी होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपली बिरसा फायटर्स यावल * तालुकाध्यक्ष * या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपण संघटनेशी एकनिष्ठ राहून काम कराल व आपल्याकडून संघटनेची बदनामी किंवा अहित होणार नाही अशी अपेक्षा आहे. आपली तालुकाध्यक्ष* या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!

Read More

मुक्ताईनगर जिल्हाधिकारी घेतला निवडणूक संदर्भात आढावा

मुक्ताईनगर जिल्हाधिकारी घेतला निवडणूक संदर्भात आढावा मुक्ताईनगर प्रतिनिधी….. कैलास कोळी मुक्ताईनगर विधानसभा-20 सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसंबंधी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन कक्ष ,आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष ,कंट्रोल रूम यांना भेट देऊन मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी , उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोस्टमास्टर यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले .सोबतच मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे ,बोदवड तहसीलदार वाणी तसेच सर्व नायब तहसीलदार उपस्थित होते.

Read More

सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न !..जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड !…

सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न !.. जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड !… जळगाव पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी रविंद्र तितरे, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी पी.डी.पाटील तर जिल्हा समन्वयक पदी विजय लुल्हे यांची निवड !… प्रतिनिधी – दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सत्यशोधक समाज संघाची जिल्हा सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघ,महाराष्ट्र राज्याध्यक्ष ) होते.प्रमुख अतिथी सचिव डॉ.सुरेश झाल्टे , विश्वस्त विश्वासराव पाटील, विधीकर्ते भगवान रोकडे उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेसभेस उपस्थित ज्या – ज्या परिवाराने सत्यशोधक पद्धतीने विधी केले अशा सर्व परिवारांचा ग्रंथ व शाल देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.स.स.संघाचे विश्वस्त विश्वासराव पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाची भूमिका स्पष्ट केली.अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी अहिल्यानगर येथे होत असलेल्या ४२ वे राज्य अधिवेशन या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली व संघटनेचे कार्य तथा महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.अध्यक्षांच्या परवानगीने जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात येऊन पदनिहाय पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली.पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष – रवींद्र तितरे ( जळगांव ), उपाध्यक्ष – जयराम चौधरी,निवेदिता ताठे ( जळगाव ), कार्याध्यक्ष – सुरेश सपकाळ ( जळगाव ), सचिव – रमेश वराडे ( जामनेर ),कोषाध्यक्ष – योगेश कोलते, संयोजक – अशोक सोनवणे,संघटक – कैलास महाजन,सहसचिव – पवन माळी, जळगाव जिल्हा विधीकर्ते प्रभारी शिवदास महाजन ( एरंडोल ) यांची एकमताने निवड करण्यात आली.पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष – पी.डी. पाटील ( धरणगाव ), कार्याध्यक्ष – कैलास जाधव ( पातोंडे ),उपाध्यक्ष – प्रल्हाद महाजन (एरंडोल ), अनिल माळी ( चाळीसगाव ), विठ्ठल नामदास ( अमळनेर ), (चाळीसगाव ), सचिव – कविराज पाटील (एरंडोल ), कोषाध्यक्ष – हेमंत माळी (धरणगाव ), जिल्हा समन्वयक – विजय लुल्हे ( जळगाव ),संयोजक – संतोष महाजन ( पारोळा ),संघटक सुशील माळी ( भडगाव ),सहसचिव – दगडू उत्तम पाटील ( मांदुर्णे ), हिम्मत महाजन ( भडगाव ), लक्ष्मणराव पाटील ( धरणगाव ) यांची एकमताने निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सचिव व विश्वस्त यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार योगेश कोलते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय लुल्हे , रवींद्र तितरे , दीपक राजपूत यांनी परिश्रम घेतले.

Read More

मुक्ताईनगर जिल्हाधिकारी घेतला निवडणूक संदर्भात आढावा

क्ताईनगर विधानसभा-20 सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसंबंधी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन कक्ष ,आचारसंहिता कक्ष, मीडिया कक्ष ,कंट्रोल रूम यांना भेट देऊन मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर येथे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी , उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोस्टमास्टर यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले .सोबतच मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे ,बोदवड तहसीलदार वाणी तसेच सर्व नायब तहसीलदार उपस्थित होते.

Read More

बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष पदी गफुर तडवी यांची निवड

यावल (प्रतिनिधी फिरोज तडवी) बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष मा. गफुर अरमान तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर तडवी यांनी बिरसा फायटर्सचे समाजासाठी रात्रंदिवस कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली, तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करुन मा. गफुर अरमान तडवी यांची यावल तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मा. गफुर अरमान तडवी यांना बिरसा फायटर्स कशाप्रकारे समाजातील विविध कार्य करते हे त्यांना सांगण्यात आलेआदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती, संवर्धनासाठी संविधानिक हक्क व अधिकार, आरक्षण वाचविण्यासाठी, आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देणे, पाठपुरावा करणे, प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषण करणे इत्यादी लोकशाही मागणी लढा देणे, न्यायिक लढाई लढणे, आदिवासी क्रांतीकारकांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी एका वैचारिक व सामाजिक चळवळ लढाई लढण्यासाठी संघटनेची आवश्यकता होती. आदिवासी समाजाची ही गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक व सामाजिक लढाऊ संघटनेची निर्मिती केली आहे. असे बिरसा फायटर्सचे कार्य पटवून दिले बिरसा फायटर्स संघटनेत आपण सहभागी होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपली बिरसा फायटर्स यावल * तालुकाध्यक्ष * या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपण संघटनेशी एकनिष्ठ राहून काम कराल व आपल्याकडून संघटनेची बदनामी किंवा अहित होणार नाही अशी अपेक्षा आहे. आपली तालुकाध्यक्ष* या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!

Read More

महाराष्ट्रातील १५० मतदारसंघात ‘भारत जोडो’ अभियान, विदर्भातील ४० मतदारसंघांचा समावेश!

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नसला तरी भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी राज्यातील १५० विधानसभा मतदारसंघात कामाला लागले आहेत. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारत जोडो अभियान सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २६ मतदारसंघावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकी २२ लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १५० जागावर भारत जोडो अभियानने काम सुरू केले आहे. यात विदर्भातील ४० मतदारसंघांचा समावेश आहे, अशी माहिती स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक व भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी दिली. हरियाणाच्या निकाल अनाकलनीय हरियाणाच्या निकालाबाबत यादव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. विधानसभेत दोन्ही पक्षाला समान संधी होती. पण, येथे अनाकलनीय निकाल लागला आहे. त्यांचे विश्लेषण सुरू आहे. पण, महाराष्ट्रात स्थिती वेगळी आहे असे योगेंद्र यादव म्हणाले. शिंदे सरकारची पोलखोल करणार विधानसभेच्या १५० जागांवर भारत जोडो अभियानचे काम सुरू झाले आहे. गेल्या १० वर्षांत खूप मोठ्या प्रमाणात समाजात विष कालवण्याचे काम झाले आहे. ते विष काढून टाकण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी महायुतीचे सरकार घालवणे आवश्यक आहे. गेल्या एक-दीड महिन्यात राज्य सरकारने खूप घोटाळे केले आहे. त्यांची पोलखोल भारत जोडो अभियानातून करण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार कशा प्रकारे असंवैधानिक काम करीत आहे. हे लोकांना समजवून सांगितले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाला पाठीचा कणा नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी मतदान यंत्रणावर देखील संशय व्यक्त केला. ‘व्हीव्हीपॅट’ सर्व मतदारांच्या हातात देण्यात आले पाहिजे, असेही ते म्हणाले. फडणवीस यांच्या मतदारसंघात अभियान भाजपकडे असंख्य कार्यकर्ते आहेत. तसेच या पक्षाकडे खूप पैसा आहे. त्यांचा नेटवर्कही उत्तम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करणे सोपे जाते. काँग्रेसपक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर आहे. विदर्भातील ४० मतदारसंघात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते काम करीत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम नागपूर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघांचा समावेश आहे. संविधान बदलणे हाच भाजपचा हेतू लोकसभा निवडणुकीत संविधान बदल या विषयाचा फटका बसल्याने भाजप सावध झाला आहे. ते आता या विषयावर उघडपणे बोलत नाहीत. पण त्यांचा हेतू संविधान बदल करणे हाच आहे. ते संवैधानिक प्रक्रियेचे पालन करीत नाहीत. हे आम्ही मतदारांना पटवून देत असल्याचे यादव म्हणाले.

Read More

Mumbai Fire VIDEO : मुंबईच्या चेंबूरमध्ये भीषण आग; धुराचे लोट, लोकांची प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही!

मुंबई : राज्यात आग लागण्याच्या घटना सुरुच आहे. पुण्यातील नवी पेठ येथे सकाळी आगल्याची घटना घडली होती. पुण्यानंतर आता मुंबईतही आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंदिरात अचानक आग लागल्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सिंधी कॅम्प परिसरातील संतोषी माता मंदिरात आग लागलेल्या घटनेत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग लागल्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. तसेच तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आग लागल्यानंतर साधा पाय ठेवायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी घटनास्थळी झाली आहे. मंदिराजवळ जमलेले लोक घटना कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. मुंबईच्या चेंबूरमधील कँप परिसरातील संतोषी माता मंदिराला शनिवारी (दि. 19 ऑक्टोबर) आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आली असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.#ChemburFire #Mumbai #ViralVideo #SantoshiMataTemple #ChemburCampFire #Fire pic.twitter.com/iJAuLcSupJ — SakalMedia (@SakalMediaNews) October 19, 2024 🔥पुण्यातही आगीची घटना! पुण्याच्या नवी पेठमध्येही आज शनिवारी एका इमारतीच्या टेरेसला आग लागल्याची घटना घडली. टेरेसला आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. पुण्यातील नवी पेठ येथील गांजवे चौकातील एका ग्रंथालयाला ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर तातडीने आग विझविण्याचे काम सुरु केलं. काही वेळानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Read More

व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’मुळे १४ मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी लोकसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांतील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीच्या मतांमध्ये लोकसभा निवडणुकीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न झाल्याचा आरोप करीत फडणवीस यांनी त्याला व्होट जिहादची उपमा दिली होती. २०११च्या जनगणनेनुसार राज्यातील मुस्लीम समाजाची लोकसंख्या ही १ कोटी ३० लाख असून, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ११.५६ टक्के आहे. राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यापैकी काही मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या ही ४० टक्क्यांच्या आसपास आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या ३८ पैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना (९), राष्ट्रवादी काँग्रेस (३), समाजवादी पार्टी आणि एमआयएम प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. मुस्लिमांची संख्या लक्षणीय असली तरी या ३८ मतदारसंघांमधून फक्त आठ मुस्लीम आमदार निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. या निकालानंतर फडणवीस यांनी व्होट जिहादचा आरोप केला होता. परंतु मुस्लीमबहुल मतदारसंघांचा आढावा घेतल्यास ३८ पैकी २० मतदारसंघांमध्ये भाजप किंवा महायुतीच्या मतांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढ झालेली दिसते. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात गेल्या वेळी काँग्रेसचा आमदार निवडून आला होता. पण यंदा भाजपच्या उमदेवारांच्या मतांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, औरंगाबाद मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघांमध्ये मात्र महायुतीच्या मतांमध्ये २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १० टक्क्यांनी घट झाली आहे. महायुतीच्या मतांमध्ये वाढ झालेले काही मुस्लीमबहुल मतदारसंघ २०१९ विधानसभा २०२४ लोकसभा मालेगाव मध्य ०.४२ टक्के २.२२ टक्के धुळे ग्रामीण ४२.२५ टक्के ४५.२२ टक्के वर्सोवा मुंबई ३३.९८ टक्के. ४१.३६ टक्के वांद्रे पूर्व २५.७१ टक्के. ३७.५७ टक्के मुंब्रा-कळवा १८.७९ टक्के ३२.६७ टक्के

Read More

लोकल घसरल्याने १०० फेऱ्या रद्द l कल्याणजवळची घटना, लाखो प्रवाशांचे हाल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये लोकलचे डबे घसरल्याची घटना ताजी असताना मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र १०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर १२० लोकल विलंबाने धावल्या. लोकल रद्द झाल्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ शुकवारी रात्री ८.५५ वाजता टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेमुळे कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. शुक्रवारी मध्यरात्री १२.४० वाजता घसरलेला डबा रुळांवरून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री १२.५० वाजता या मार्गावरून पहिली लोकल धावली. यामुळे प्रामुख्याने तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. परंतु, तरीही लोकल सेवा विस्कळीत होती. शनिवारी पहाटेपासून या लोकल जवळपास ४० ते ५० मिनिटे विलंबाने धावत होत्या. ‘किंग पॉइंट’ जवळ घटना मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.५५ च्या सुमारास कल्याण रेल्वेच्या फलाट क्रमांक २ वर लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेमुळे अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. ‘किंग पॉइंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी लोकल घसरल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. कर्जत दिशेने जाणारी वाहतूक घटनेनंतर एका तासात पूर्ववत झाली. तर, अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच, घटना घडल्यानंतर स्थानकावर घोषणा करण्यात येत होती. दरम्यान, या घटनेमुळे १०० हून अधिक लोकल रद्द आणि १२० हून अधिक लोकल विलंबाने धावत होत्या, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read More

नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?

सर्वांचा नाद करायचा पण पवार साहेबाचा नाद करायचा नाही. हा डायलॉग अनेक वेळा धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात मारला आहे. विरोधकांनाही ते याच डायलॉगच्या माध्यमातून डिवचत होते. पण आता हाच डायलॉग खरा करून दाखवण्यासाठी खुद्द शरद पवारच सरसावले आहेत. धनंजय मुंडेंच्या होमपिचवर त्यांना आस्मान दाखवण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यासाठी त्यांनी असे उमेदवार शोधले आहेत की त्यामुळे मुंडेंना करेक्ट कार्यक्रमच होतो की काय अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे. परळी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार पङक्षाकडून सुनील गुट्टे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुनील गुट्टे यांची पाटी कोरी आहे. स्वच्छ प्रतिमा आणि उच्च शिक्षित ही त्यांची जमेची बाजू आहे. वडील रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडचे आमदार आहेत. तर आई सुधामती गुट्टे या शरद पवारांच्या कट्टर समर्थक राहील्या आहेत. पक्ष फुटीनंतर त्यांनी शरद पवारांनाच साथ दिली. गुट्टे कुटुंबाचा परळीत चांगला दबदबा आहे. निवडणूक लढण्या आधी सुनील गुट्टेकर हे मतदार संघात चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी शेतकरी संवाद यात्राही काढली होती. त्यातून संपुर्ण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. तरूण चेहरा मैदानात उतरवून पवारांनी मुंडेंना शह देण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे सुनील गुट्टे हे ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात मतदार संघात आक्रमक झाले आहे. मुंडे यांनी 2019 च्या वचन नाम्यातील शब्द पाच वर्षात पाळले नाही असा आरोप ते प्रत्येक ठिकाणी करत आहेत. मुंडेंनी मंत्री पदाचा फायदा फक्त वैयक्तिक लाभासाठी करून घेतला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही झाला नाही असेही ते सांगत आहेत. धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झालेत, असा थेट आरोप करत त्यांनी धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिलं आहे. धनंजय मुंडेंचा वचननामा फेल झाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न तसेच्या तसेच आहेत. लोकांचा विकास झालेलाच नाही. मूलभूत प्रश्न ही तसेच आहेत. मतदारसंघात फक्त मोठी दादागिरी आहे. त्यामुळेच की काय इथल्या सर्व लोकांना 354 चे कलम परिचयाचे झाले आहे. कोणालाही याबाबत विचारले तर ते जाहीर पणे सांगत असतात. सध्याच्या स्थितीत परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. शिवाय धनंजय मुंडे यांनी 2019 च्या वचननाम्यातील किती वचनं पुर्ण केली हे सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे. मात्र त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या सोबतीला यावेळी आमदार पंकजा मुंडेही असणार आहेत. त्यामुळे या भाऊ बहीणीला टक्कर देणारी ताकद शरद पवार मतदार संघात उभी करत आहेत. लोकसभेला हे दोघे भाऊ बहीण एकत्र असतानाही त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यामुळे सुनील गुट्टे यांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंडे यांच्या विरोधात माहोल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय मराठा आंदोलनाचा परिणामही या मतदार संघात होवू शकतो.

Read More
error: Don't Try To Copy !!