Headlines

मुंबई महामार्गावरील खड्डे कंत्राटदाराला भाेवले!

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर पडलेले खड्ड्यांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ने टोल कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. घोटी व पडघा या टोलनाक्यांवर रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस कंत्राटदाराला टोलवसुलीस बंदी घालण्यात आली आहे. ही टोलवसुली प्राधिकरण करणार असून वसुलीच्या रक्कमेतून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालूवर्षी मान्सूनने जोरदार हजेरीसाेबत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचा विषय राज्यभर गाजला. इगतपूरी तालूक्यातील गोंदे-वडपे (जिल्हा ठाणे) पर्यंत महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली. परिणामी अडीच ते तीन तासांच्या प्रवासासाठी ८ ते ९ तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे महामार्गावरील खड्डे थेट विधीमंडळ अधिवेशनात गाजले. अनेक मंत्र्यांसह आमदारांनी रस्तेमार्गे प्रवास टाळून थेट नाशिकहुन रेल्वेमार्गेच मुंबई गाठण्यास सुरवात केली होती. दुसरीकडे महामार्गावरील खड्यांमुळे शरीराची हाडे खिळखिळी होतानाच वाहनांचे नुकसान होत असल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये रोष होता. खड्यांच्या समस्येवरुन नाशिककरांनी आंदोलन उभारण्याची तयारी केली होती. दरम्यान माजी खासदार हेमंत गाेडसे यांनी घोटी टोलनाक्यावर आंदोलन करत कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र बैठका घेत खड्डे बुजविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. प्रसंगी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता थेट खड्यांच्या प्रश्नावरून कंत्राटदारावरच कारवाईचा बडगा उगारत ९५ दिवस टोलवसुलीला बंदी करण्यात आली. त्यामुळे उशिराने का होईना प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. ७६ कोटींमधून दुरुस्ती टोल कंत्राटदारावरील कारवाईबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस महामार्ग प्राधिकरण घोटी व पडघा टोलनाक्यावर वसुली करणार आहे. याकाळात सुमारे ७६ कोटी रुपयांचा महसुल गोळा होणार आहे. या निधीतून गोंदे ते वडपे या महामार्गाची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल.

Read More

इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा सुमित चिंचोले यांस विभागीयस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत कांस्य पदक

दि.१९/१०/२०२४जामनेर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुले शालेय विभागीयस्तरीय शासकीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा आज दि.१९ रोजी नाशिक विभागीय क्रीडा संकुल,हिरावडी रोड, नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाल्या.जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमित संजय चिंचोले (इयत्ता १२ वी विज्ञान ) याने ११० मीटर अडथळा शर्यत तृतीय क्रमांक प्राप्त करत १९.०१ सेकंद वेळ राखत कांस्यपदक नाशिक क्रीडा अधिकारी बी आर जाधव यांच्या हस्ते देण्यात आले सोबत इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार होते.स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक मनपा, ग्रामीण एकूण १३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.◼️ अभिनंदन: इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, बी पी बेनाडे, जी डी कचरे यांनी केले.◼️मार्गदर्शन: क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे लाभले.

Read More

लोहारी येथे मेंढपाळ धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर.. वीज कोसळून 11 वर्षीय मुलासह दोन बकऱ्या मृत्युमुखी.

प्रतिनिधी.गजानन क्षीरसागरपाचोरा.लोहारी तालुका पाचोरा येथेमेंढपाळ धनगर समाजातील गोरख शिवराम शिंगाडे वय वर्ष 11 यांचे आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजता लोहारी बुद्रुक येथे गट क्रमांक 15 मध्ये अंगावर वीज कोसळून अकस्मात निधन झाले तसेच आई मंगलाबाई शिवराम शिंगाडे या जखमी झाल्या असून दोन बकऱ्या या मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे मेंढपाळ धनगर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या ठिकाणी लोहारी सरपंच प्रवीण पाटील यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला कॉल करून तात्काळ पंचनामा करून घेतला. पाचोरा येथे शवविचेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपराळा (नांदगाव) येथे वाहन रवाना झाले. या कुटुंबाला तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्कल अधिकारी एम एस पाटील , लोहारी सरपंच प्रवीण पाटील, पिंपळगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश नरवडे,माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर, आधार खाटीक ,यांनी मदत कार्य केले.

Read More

नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेत अण्णासो भा.खं.गरुड मा. विद्यालय वाकडी या शाळेची लांब उडीसाठी राज्यस्तरावर दुसऱ्यांदा निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.१९/१०/२४नासिक येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी शितल चांदणे हिची लांब उडी क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यांदा राज्यस्तरावर निवड झाली,या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. दादासाहेब संजयरावजी गरुड, संस्थेचे व्हा. चेअरमन श्री.आबासाहेब भीमरावजी शेळके,सचिव श्री.सागरमलजी जैन सहसचिव दादासो श्री .यु .यु. पाटील, संस्थेचे कार्यालयीन सेक्रेटरी आदरणीय भाऊसाहेब श्री.दिपकरावजी गरुड तसेच स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच पंचक्रोशीतील पालक वृंद व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील पर्यवेक्षक श्री डी एम गरुड सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील मॅडम पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री डी एम गरुड सर तसेच क्रीडा शिक्षक श्री आर जी बैरागी सर व क्रीडा शिक्षिका श्रीमती ए एस पाटील, श्री. डी. इ. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

पाळधी गावातील परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,शासकीय पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी.

पाळधी गावातील परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,शासकीय पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी. जामनेर तालुक्यातील पाळधी व सूनसगाव फाटा या परिसरात झालेल्या परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यावेळी शेतातील केळी,मका,कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवाल दिलं झाला आहे.आधीच या वर्षी जास्तीच्या पाऊसमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून त्यात परतीच्या पाऊस ने जोरदार तडाखा दिल्यामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मुडले आहे.या झालेल्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.

Read More

पहूर जवळ दुचाकीस अपघात ! शेंदूर्णी येथील तरूण ठार : एक जखमी अज्ञात वाहनाची धडक.

पहूर जवळ दुचाकीस अपघात ! शेंदूर्णी येथील तरूण ठार : एक जखमी अज्ञात वाहनाची धडक. अज्ञात वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहूर – शेंदुर्णी मार्गावर असलेल्या घोडेस्वार बाबा दरगाह जवळ सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास घडली . याबाबत अधिक माहिती अशी की , शेंदुर्णी येथील दिपेश योगेश शिंपी ( वय २३ ) व त्याचा मित्र अक्षय जितेंद्र जाधव ( वय २१ ) हे दोघेजण दुचाकीने ( क्र . एम . एच . १९ डी यू ६२५७ ) पहूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली . या अपघातात दीपेश योगेश शिंपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला . तर अक्षय जाधव यास गंभीर दुखापत झाली .आजूबाजूच्या लोकांनी नातेवाईकांना संपर्क केला असता दीपेश योगेश शिंपी यांस पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . वैद्यकीय अधिकारी डॉ . मयुरी पवार यांनी तपासणीअंती मृत घोषित केले . दरम्यान गंभीर जखमी असलेल्या अक्षय जितेंद्र जाधव यास पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विलास चव्हाण करीत आहेत . मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दीपेशच्या अकाली जाण्याने शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Read More

आ.एकनाथ खडसेंवर आ. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत कडाडले

आ.एकनाथ खडसेंवर आ. चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत कडाडले कैलास कोळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी आज पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या विकास कामांचा आणि जनकल्याण योजनांचा सविस्तर आढावा मांडला. सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा उल्लेख केला आणि आमदार एकनाथ खडसे यांचे वृत्तीला आपला विरोध असून महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहे तसेच मुंडोळदे ते सुलवाडी पूल करून दाखवा असे आव्हान देणारे माझा सत्कार कधी करतील त्याची मी वाट पाहत असून आमदार पाटील यांनी आमदार खडसेंचा चांगलाच समाचार घेतला. महायुती सरकार हे एकमेव असे सरकार आहे जे विकास आणि कल्याण या दोन्ही घटकांना प्राधान्य देते. सर्वांगीण विकासासाठी या दोन्हींचा समतोल साधणे आवश्यक आहे, जे महायुती सरकारने नेहमीच केले आहे, ” असे त्यांनी सांगितले. शासनाने राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच बेरोजगारांसाठी रोजगार लाडका भाऊ मुख्यमंत्री सहायता निधी, शेतकऱ्यांना वीज माफ अशा अनेक कल्याणकारी योजना महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचे दुसरे नाव भूलथापा असले पाहिजे असा टोला मारीत खडसे म्हणजे एक जोक झालेले आहे. सकाळी कोणत्या पक्षात तर संध्याकाळी कोणत्या पक्षात हे त्यांचे समजतच नाही पक्षासाठी ते काम करीत नसून स्वतःच्या मुलीसाठी ते फिरत आहे पक्षाचे ध्येयधोरणे च्या विरोधात सर्व चालू असून पक्षाचे खरे काम माजी मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर हे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तीस वर्ष विविध पदे भूषविणारे यांना बोदवड करांची तहान भागवली नाही ती मी पूर्ण केली तसेच मुक्ताईनगर साठी 32 कोटीची नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच केलेले असल्याचे सांगत खडसेंनी साखर कारखान्यामध्ये पार्टनरशिप केली होती 150 कोटीचे कर्ज घेऊन ते सेटल केले असा आरोप करीत मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री माझे नेते ते सांगतील तो निर्णय मान्य. महायुती असल्याने मुक्ताईनगर विधानसभा त्या जागेवर भाजपने दावा केला आहे असे आमदार पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की भाजपने दावा केला हे निश्चित आहे दावा करणे काही गैर नाही मी पण लोकसभेच्या वेळेस दावा केला होता असे सांगितले. मी अपक्ष आमदार जरी आहे पण शिवसेनेचे काम करीत आहे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून कामे केली. बाळासाहेबांचे विचार घेऊन काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे नेते आहेत ते जे सांगतील ते मला मान्य असेल सीएम म्हणजे कॉमन मॅन असे असून मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी आता सहज मुख्यमंत्र्यांना भेटता येते जे दोन दिवसाच्यावर मंत्रालयात गेले नाही त्यांना हे काय समजेल असा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमदार पाटील यांनी टोला लगावला.

Read More

जामनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

काही महिन्यांपूर्वी शेंदुर्णीतील जेष्ठ नेते मा.श्री.संजदादा गरुड यांच्या पक्ष प्रवेशानंतर डॉ.सागरदादा गरुड काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष होते. अखेर नुकताच डॉ.सागर गरुड यांनी भा.ज.पा.त प्रवेश करून संजयदादा व सागरदादा “हम साथ-साथ है” हे दाखवून दिले.त्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील व पाचोरा तालुक्यातील संजयदादा व सागरदादा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शेंदुर्णी येथे ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी गोविंदशेठ अग्रवाल, विलासभाऊ राजपूत, अमृतबापु खलसे, पंडितराव जोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गिरीशभाऊंना सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आणू असे डॉ.सागरदादा गरुड यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले.

Read More

टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू

टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू नायजेरियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. ५० जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना उत्तर नायजेरिया येथील जिगावा राज्यातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्यात उलटला. यावेळी टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली,यावेळी पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. लोक पेट्रोल गोळा करत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी, टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायजेरियातील बहुतांश अपघात हे खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात, नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, यामध्ये किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले.

Read More

पाळधी गावातील मुख्य बस स्थानक गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी रबर स्ट्रीप,रमबल्स किंव्हा गतिरोधक सारखी यंत्रणा बसविण्याबाबत ग्रामस्थांचे पहूर पोलिसात निवेदन.

आमचे पाळधी हे गाव जळगाव छत्रपती संभाजी नगर या महामार्गावर असून या गावात शिक्षणासाठी पाळधी गावासह परीसारतील सोनाला, भराडी, नाचणखेडा, भिलखेडा, सार्व, जोगलखेडा, लाखोली या गावातील विद्यार्थी हे श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.तसेच बाहेर गावांना जाण्यासाठी देखील वरील गावातील ग्रामस्थ हे पाळधी गावात येत असतात. तसेच पाळधी गावात जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळा यामुख्य महामार्गाला लागून असल्याने गावातील तसेच साईनगर, शिवाजी नगर वाडी भाग येथील देखील लहान मुले हे शिकण्यासाठी येत असतात. गावातील ग्रामस्थ व शाळेत येणार विद्यार्थी यांना मुख्य बस स्थानक चौफुली व महाराणा प्रतापसिंह चौफुली याठिकाणी रस्ता ओलांडून जावे लागते. तसेच या महामार्गावर वाहनाची वर्दळ असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने या दोन्ही ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले असून जीवित हानी देखील झाली आहे. तरी आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सदरील महामार्ग कार्यालयात योग्य तो अहवाल सदर करून पाळधी गावतील दोन्ही ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी यंत्रणा बसविण्याचे सांगावे. जर कोणतीही उपाय योजना न केल्यास भविष्यात जर काही अपघात झाला तर त्यास संपूर्ण पणे महामार्ग प्राधिकरण व रोड कॉन्ट्रॅक्टर हे जबाबदार राहतील. येणाऱ्या १० ते १५ दिवसात वेग कमी करण्यासाठी योग्य ती कामे न केल्यास ग्रामस्थ हे रास्ता रोको आंदोलन करतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार राहाल. निवेदनावर पाळधी गावातील ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!