Headlines

कोण आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार? ‘या’ १० नेत्यांकडे आहे बक्कळ संपत्ती!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. एका बाजूला महायुती, महाविकास आघाडी व तिसऱ्या आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहेत, उमेदवाऱ्या जाहीर केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला,वेगवेगळ्या पक्षांनी, त्यांच्या उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने उद्यापर्यंतची (२९ ऑक्टोबर) मुदत दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. याद्वारे उमेद्वारांना त्यांची संपत्ती जाहीर करावी लागते. प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रांद्वारे निवडणूक आयोगाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे मलबार हिल मतदारसंघाचे उमेदवार मंगल प्रभात लोढा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी रुपये आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१.६५ कोटी रुपयांची संपत्ती होती. पाच वर्षांत त्यात साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लोढा यांच्याकडे २१८ कोटी रुपयांची स्थावर आणि २२८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लोढा हे मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी १९८० मध्ये मुंबईत लोढा ग्रुपची स्थापना केली होती, जी कंपनी आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स म्हणून ओळखली जाते. श्रीमंतीच्या बाबतीत लोढा यांच्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) प्रताप सरनाईकांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे ३३३.३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार मंगल प्रभात लोढा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून ते मुंबईतील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक रहिवासी व व्यावसायिक इमारती बांधल्या आहेत. प्रामुख्याने मध्यवर्गीय मुंबईकरांसाठी कमी दरांत घरं बांधण्याला ते प्राधान्य देतात. विधानसभेचे अध्यक्ष व भाजपाचे कुलाब्याचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बक्कळ संपत्ती आहे. महाराष्ट्रातील इतर श्रीमंत उमेदवारांची यादी क्र. उमेदवाराचे नाव. पक्ष. मतदारसंघ. एकूण संपत्ती.

Read More

५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!

महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना संधी देऊन अजित पवार यांच्याविरोधात त्यांच्याच सख्या पुतण्याला उभं केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. शेकडो कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवारही बारामती कार्यालयात स्वतः हजर राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ५७ वर्षांपूर्वीची आठवणही शेअर केली. शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा मी आढावा घेत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याची नोंद अंतकरणात कायम ठेवली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व जागा लढत आहोत. तिघांच्यात एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करतोय. एकंदर जागांपैकी ९५ टक्के जागांवर एकमत झालं आहे. काही थोड्या जागा राहिल्या आहेत, त्यावर विचार करून निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की जागा वाटपाची स्पष्टता एका दोन दिवसांत होईल. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. सरकारकडून ते सोडवले गेले नाहीत.” “महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की मविआच्या वतीने महाराष्ट्रात जनतेच्या हिताची जपणूक करणारा, महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कामगार, दलित आदिवासी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमची आघाडी करेल, असा विश्वास मी देतो. निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता आम्ही याठिकाणी आलो आहोत. मविआच्या वतीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं परदेशात उच्चशिक्षण झालंय. माझी खात्री आहे की बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाला स्वीकारून मोठी शक्ती उभी करतील”, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. “मी स्वतः ५७ वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलं आहे. ५७ वर्षे एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी दिली, त्याचं कारण जनतेशी असलेली बांधिलकी. नव्याच्या पिढीच्या सर्वच उमेदवारांना माझा सल्ला आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर सातत्याने जागृत राहा”, असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी तरुण उमेदवारांना दिला आहे. अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया काय? “शरद पवार स्वतःचा फॉर्म भरायला बारामतीच्या कार्यालयात होते. त्यानंतर आता पहिल्यांदा ते माझा फॉर्म भरायला आले. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आज खरंतर मला बोलण्यासाठी शब्द उरले नाहीत. लहानपणापासून मी पवारांचं संपूर्ण करिअर पाहिलंय. ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिले आहेत. गुरू राहिले आहेत. लहान असताना प्रत्येकाला रोल मॉडेल, आदर्श असतात. मी नेहमी शरद पवारांनाच आदर्श मानत आलो आहे. आज ते येथे माझा फॉर्म भरायला आले, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर दिली.

Read More

मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या जनगणनेची (Census) माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून देशात जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना 2025 पासून सुरू होईल आणि 2026 पर्यंत चालेल. 2021 मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे देशात पुढच्या वर्षात जनगणना करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे, अशी माहिती मिळत आहे. पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. पण, आता 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, 2028 पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणी होत आहे, मात्र सरकारनं अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कर्नाटकात, लिंगायत, जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये वाल्मिकी, रविदासी, असे विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मिळत आहे.

Read More

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे आ.राजु मामा उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय झालेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना पुन्हा भाजपा ने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मामांना हॅट्ट्रिक करण्याची संधी दिलेली आहे. उद्या वसुबारस च्या शुभमुहूर्तावरती दिनांक २८ ऑक्टोबर सोमवार सकाळी १०:३० वाजता आमदार राजूमामा भोळे आपला उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ति प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी ना. गिरीश भाऊ महाजन केंद्रीय क्रीडामंत्री ना. रक्षाताई खडसे, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल भाईदास पाटील, खा. स्मिताताई वाघ RPI चे अनिल अडकमोल, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे सर्व पदधिकारी नगरसेवक, महिला युवक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित रहाणार असून अर्ज दाखल करण्याचा मार्ग शिवतीर्थ चौक, व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन) नेहरू चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ वसंत स्मृती,भाजप कार्यालय जुने येथे समारोप होईल व तहसील कार्यालयात आ सुरेश भोळे (राजु मामा )हे उमेदवारी अर्ज दाखल करतील

Read More

भुसावळला भारतीय बौद्ध महासभेचे “जिल्हा महीला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर”

भुसावळ :- येथे दि.२८/१०/२४ सोमवारी भारतीय बौद्ध महासभा, जळगांव पुर्व अंतर्गत प्रथमच “महीला कार्यकर्ता प्रक्षिक्षण “शिबीराचे शिलरत्न बुद्ध विहार, झे टी सी रोड , सात नंबर पोलिस चौकी मागे,भुसावळ या ठिकाणी सकाळी १०ते ४ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे हया राहतील तर शिबीराचे प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संस्कार विभागाचे स्वाती गायकवाड हे राहतील आणि प्रमुख उपस्थतीमध्ये राज्य संघटक लताताई तायडे, के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार, जिल्हा कोषाध्यक्ष कल्पना तायडे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशिलकुमार हिवाळे, शैलेन्द्र जाधव हे उपास्थित रहाणार; आहेत.तरी जिह्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आव्हान जिल्हा संघटक, वनमालाताई हिवाळे यांनी केले आहे.

Read More

तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यदुत प्रफुल्ल लोढा यांनी भाजपा मध्ये घरवापासी.

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील आरोग्यदूत सामाजिक कार्यकर्ते श्री प्रफुल्लभाऊ रायचंद लोढा यांचा मुंबई येथे भाजपा पक्ष कार्यालयामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला असून त्यांची भारतीय जनता पक्षात घरवापसी झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रफुल लोढा हे पक्षातील आपसी मतभेदांमुळे पक्ष सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. त्यांनतर त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत सिडी च्या माध्यमातून तालुक्यात व जिल्ह्यात राजकारणात जोरदार खळबळ उडवून दिली होती.आता त्यांनी विधानसभा निवडणूक लागल्याने पुन्हा भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.प्रफुल लोढा यांच्या पक्षात परत येण्यामुळे पक्षाला किती बळकटी मिळते तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतधिक्यात किती वाढ होणार आणि त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेवून पुन्हा सोबत काम करणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.प्रफुल लोढा यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप मध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकारण मध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.

Read More

लोहारा तालुका पाचोरा परिसरातील सरसकट नुकसानीचे पंचनामे सुरू

प्रतिनिधी.गजानन क्षीरसागर लोहारा ता पाचोरा परिसरातील परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये कापूस सोयाबीन मका ज्वारी इत्यादी पिकांचा तोंडी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला होता त्याबाबत शासन स्तरापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी शासन दरबारी गेल्यामुळे आज प्राथमिक नुकसान अहवाल दिनांक 23/10/2024 रोजी तलाठी मोहन कुलकर्णी लोहारा ,कृषी सहाय्यक आर एच जोहरे, कृषी सहाय्यक रोहिणी पाटील, यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मका /कापूस, पिकाचे पंचनामे केले यावेळी शेतकरी देवबा चौधरी, राजू सुर्वे नंदू सुर्वे भास्कर भोई अनिल तडवी विशाल पवार दीपक राजपूत इत्यादी व शेतकरी वर्ग हजर होते पंचनामे सर्वांचे सरसकट केले जातील असे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

Read More

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मध्ये मुक्ताईनगर मध्ये उमेदवारी अर्ज केला एबी फॉर्म भरून दाखल

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मध्ये मुक्ताईनगर मध्ये उमेदवारी अर्ज केला एबी फॉर्म भरून दाखल धनुष्यबाण चिन्हावर एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मुक्ताईनगर कैलास कोळी मला नाही वाटत माझ्याशिवाय या मतदारसंघात सध्या एबी फॉर्म दाखल केला असेल रोहिणी खडसेंवर टीका येणार सरकार महायुतीचे बहुमताने येईल यातील मात्र शंका नाही रोहिणी खडसे यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म आला नाही त्यामुळे आमदारांची फॉर्म भरत्यावेळी रोहिणी खडसेंवर टीका माझ्या विरोधकांना अद्याप पर्यंत एबी फॉर्म मिळालेला नाही रोहिणी खडसेंवर टीका

Read More

हजारोंच्या उपस्थितीती रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हजारोंच्या उपस्थितीती रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुक्ताईनगर- मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलासकाळी त्यांनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई, नागेश्वर महादेव मंदिर, भवानी माता मंदिर, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र येथे दर्शन घेतलेत्यांनंतर प्रवर्तन चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्याना अभिवादन करून नामांकन रॅली काढण्यात आलीरॅली नंतर जे डी सी सी बँकेजवळ माजी मंत्री आ एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ शिरीष दादा चौधरी,जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटिल, विनोद तराळ,उदय सिंह पाटिल,मनोहर खैरनार, अविनाश पाटिल,एजाज मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा संपन्न झालीयावेळी रोहिणी खडसे यांनीमुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला युवकांचा आवाज बनुन त्यांचे प्रश्न विधानमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अपुर्ण सिंचन योजना पूर्णतःत्वास नेऊन मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून एक नविन विकास पर्व सुरू करण्यासाठी जनसामान्यांच्या आशीर्वादाने आपली उमेदवारी असुनसर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केलायाप्रसंगी हजारो नागरिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Read More

50 खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर

‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. सरकारने अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. जळगावच्या धरणागाव येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी ॲड. शरद माळी यांनी याचिका केली होती. न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत ॲड. माळी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला. प्रत्येक आंदोलन शांततेचा भंग करत नाही सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र प्रत्यके आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडे बोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले. काय आहे प्रकरण… गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमदार सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱयावर होते. त्यावेळी ॲड. माळी यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी (उद्वव बाळासाहेब ठाकरे) मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले. ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांविरोधात (उद्वव बाळासाहेब ठाकरे) गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली. आरोपात तथ्य नाही मंत्री सत्तार यांच्या ताफ्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केले, असा पोलिसांचा आरोप होता. मात्र आंदोलकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला व मंत्री यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, असा तपशील नोंदवलेल्या गुन्ह्यात नाही. त्यामुळे आंदोलकांवरील हा आरोप मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Read More
error: Don't Try To Copy !!