Headlines

भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे १३-१४ जानेवारी रोजी मोतीमाता देवीचा यात्रोत्सव

जामनेर प्रतिनिधी (अशोकराव चव्हाण) गारखेडा,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर येथे बंजारा समाजाची कुलस्वामिनी असलेल्या मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव दरवर्षाप्रमाणे मोतीमाता मंदिर ट्रस्ट,मांडवेदिगर तर्फे यावर्षी देखील शाकंभरी(पौष) पौर्णिमेला दि.१३ आणि १४’जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.या यात्रोत्सवात संपूर्ण खान्देश व राज्यातील बंजारा समाजबांधव आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात. या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष-मा.अशोकराव चव्हाण आणि सर्व पदाधिकारी येथील स्थानिक पोलिस पाटील-रविंद्रजी पवार,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच,सर्व सन्माननीय ग्रा.पं.सदस्य,तसेच गावातील युवक मंडळ,सामाजिक कार्यकर्ते व भुसावळ तालुका पोलिस प्रशासन यांचे सहकार्य असते. यानिमीत्त देवस्थान परिसरामधे सर्व व्यापारी,मिठाई दुकानदार,भांडी,खेळणी दुकानदार,इ.व्यावसायिक यांनी आपली दुकाने लावावीत असे आवाहन मोतीमाता देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष-मा.सरिचंदजी पवार,उपाध्यक्ष-मा.गजाननजी पवार,सचिव-मा.गोविंदजी पवार,खजिनदार-मा.चरणदासजी पवार,सहसचिव-सौ.संत्रीबाई पवार,सदस्य-मा.हरिभाऊ पवार,मा.भगवानजी पवार,मा.गणेशजी पवार,यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर येथील पत्रकार नितीन इंगळे हे राज्यस्तरीय ‘पत्रकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित.सर्वत्र होतोय अभिनंदनाचा वर्षाव.

जामनेर | प्रतिनिधी – निर्भिड आणि निपक्षपणे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जनतेपर्यंत पोहोचविणारे तसेच लोकजागृतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे जामनेर येथील पत्रकार नितीन इंगळे यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार रत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ६ जानेवारी, मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय पत्रकार गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रातील असामान्य कार्यगौरव करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, उद्योगपती, प्रतिष्ठित नागरिक, आणि ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार नितीन इंगळे यांना गौरवचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पत्रकार नितीन इंगळे यांनी सत्यशील आणि निर्भिड पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्न प्रकाशझोतात आणले. शासनाच्या विकास योजना, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीवर केलेले लेखन हे लोकप्रबोधनाचे प्रभावी साधन ठरले. त्यांचा हा सन्मान पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसादकार्यक्रमाला जामनेर येथील पत्रकार सुनील इंगळे, सागर लव्हाळे, मोहन दुबे, मनोज महाले, शांताराम झाल्टे, अरुण तायडे, देविदास विसपुते, साहेबराव क्षीरसागर, मोहन जोशी, अनिल शिरसाट,किरण चौधरी, अक्षय वानखेडे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नितीन इंगळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार नितीन इंगळे यांना मिळालेला हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची पावती आहे. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भुमिका आणि लोकशाहीला बळकटी देण्यासाठी केलेले कार्य यामुळे त्यांचा हा गौरव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटकेपणाने केले. या सोहळ्याने पत्रकार बांधवांचे मनोबल वाढविले आहे.

Read More

अंबिलहोळ येथे विहीर खोदकाम दरम्यान ब्लास्टिंग; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी,मंत्री गिरीश महाजन यांची भेट.

जामनेर (प्रतिनिधी): जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथे विहीर खोदकाम सुरू असताना ब्लास्टिंगच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख राहुल धनराज वाघ (वय 35, राहणार मुंदखेडा, जामनेर) अशी झाली आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेचा तपशील:आज बुधवार, सकाळी राहुल धनराज वाघ आणि इतर तीन सहकारी अंबिलहोळ येथे विहीर खोदण्यासाठी गेले होते. खोदकाम दरम्यान अचानक ब्लास्टिंग झाल्याने विहिरीत काम करणाऱ्या कामगारांवर मोठे दगड कोसळले. यात राहुल वाघ गंभीर जखमी झाले, तर इतर दोन जणही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान मृत्यू:दुर्घटनेची माहिती मिळताच सर्व जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी राहुल वाघ यांना मृत घोषित केले. इतर दोन जखमींना पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांची भेट:घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना सांत्वन दिले. तसेच पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विहीर खोदकामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू:पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून ब्लास्टिंगसाठी लागणारे परवाने व अन्य बाबींची चौकशी केली जात आहे.

Read More

विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतल्यास जीवन समृद्ध – श्री श्याम चैतन्यजी महाराज

विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतल्यास जीवन समृद्ध – श्री श्याम चैतन्यजी महाराज जामनेर : प्रतिनिधीशालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण व अभ्यास केल्यास परिवारासह आयुष्याचे कल्याण होते. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणात अमुलाग्र बदल होत आहे. ते सर्व बदल स्वीकारून विद्यार्थ्याने शालेय जीवनापासूनच आपला शिक्षणाचा पाया मजबूत करावा. आई-वडिलांच्या आज्ञेत राहून शिक्षकांनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करावे व नियमित अभ्यास करावा. विद्यार्थी दशेत मनापासून शिक्षण घेतल्यास आपले पुढील आयुष्य समृद्ध व सुखमय होते असे मौलिक मार्गदर्शन येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. जामनेर परिसरातील जी . प.होळहवेली , महुखेडा गारखेडा तांडा बुद्रुक*शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्ग रम्य अशा श्री गुरुदेव सेवाश्रमला भेट दिली. श्री राधा माधव यांचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी महाराजांची आशीर्वाद घेतले. यावेळी . जी.प.शाळेतील शिक्षक , व शिक्षिका भागवत मस्के, नितीन दहातोंडे, समाधान थोरात, विठ्ठल जाधव ,सौ कविता पाटील ,सौ जयश्री पाटील, संदीप गावंडे ,राजेंद्र सावळे, अमोल वंजारी आदी उपस्थित होते

Read More

गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी भारतीय औद्योगिक महासंघाचा ‘सीआयआय सर्वोत्कृष्ट एफपीओ’ पुरस्कार जिंकला

भारत सरकार महत्त्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत ‘नाफेड’व ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांनी भारतीय औद्योगिक महासंघाचा ‘सीआयआय सर्वोत्कृष्ट एफपीओ’ पुरस्कार जिंकला आहे. महाराष्ट्रातील जामनेर येथील ‘गोपद्म एफपीसी’ला मूल्यवर्धन आणि ब्रॅण्डिंग श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. देशभरातून विविध पुरस्कार श्रेणींसाठी 140 अर्ज आले होते त्यापैकी 12 एफपीओंची निवड करण्यात आली त्यात जामनेरच्या ‘गोपद्म एफपीसी’चा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांचा “सीआयआय” तर्फे सन्मान केला जातो. शेतकरी आणि शेतकरी समुदाय विशेषता: अल्पभूधारकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ‘कृषीविकास’ ही संस्था शेतकरी उत्पादक संस्थांना मार्गदर्शन करते, त्यामध्ये गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनी अग्रेसर आहे. जामनेर येथील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विविध ब्रँड अंतर्गत विषमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी शेतमालास ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून गोशाळेच्या माध्यमातून कमी खर्चातील विषमुक्त शेतीचे प्रशिक्षण देणारे अनेक शेतकरी प्रतिनिधी कंपनी सोबत जुळलेले आहेत तसेच ऑनलाईन सर्व शासकीय योजना व कृषी सेवा, बँक कर्ज प्रक्रिया, कृषी विस्तार व मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व प्रस्ताव, शासकीय अनुदानासह यातील सर्व घटकांचे मार्गदर्शन व सुविधा या एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘गोपद्म एफपीसी’ ने गोपालनातून आर्थिक समृद्धतेसाठी शेण, गोमूत्राचे मूल्यवर्धन करून विविध आरोग्यदायी औषधी, अर्क उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, शेती उपयुक्त विषमुक्त खते, औषधे, घरगुती व आध्यात्मिक वापराच्या वस्तू निर्मितीतून नाविन्यपूर्ण ब्रँडसह रोजगारात चालना व महिलांना रोजगार संधी निर्माण केली आहे.दि. १० डिसेंबर रोजी “इंडिया हॅबिटॅट सेंटर”,नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ व कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री मिन्हांज आलम, (आय.ए.एस) अतिरिक्त सचिव, अन्न व उद्योग मंत्रालय, भारत सरकार, श्री.शिवकुमार, अध्यक्ष, भारतीय उद्योग महासंघ व राष्ट्रीय कृषी परिषद नवी दिल्ली, प्रा.ग्लेन डेनिंग,कोलंबिया विद्यापीठाचे संस्थापक संचालक व सौ. सीमा अरोरा, उपमहासंचालक, भारतीय उद्योग महासंघ, श्री संजय सचेती, संचालक, भारतीय उद्योग महासंघ इ. मान्यवरांच्या हस्ते “गोपद्म एफपीसी”चा गौरव करण्यात आला. कंपनीच्या वतीने चेअरमन श्री.प्रदीप महाजन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन लोखंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Read More

सोनाळा फाटा जवळ झालेल्या महिंद्रा पिकप गाडी पलटी झाली त्या अपघातात 14 जण जखमी

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) पहूर येथून जवळच असलेल्या सोनाळा फाट्याजवळ मध्यरात्री महिंद्रा पिकप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाल्याची घटना घडली.पहूर येथून जवळच असलेल्या जामनेर रोडवरील सोनाळा फाट्याजवळ काल मध्यरात्री महिंद्रा पिकप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात पावरा समाजाचे एकूण 14 जण जखमी झाले. यातील धर्मा बारेला वय 30, जितेंद्र बारेला वय 16, सुभा राजू बारेला वय 13, तुळशीराम बारेला वय 35, अनिल तोवर सिंग बारेला वय 30 हे गंभीर जखमी झाले .असून यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ घालवण्यात आले आहे .तर नऊ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.पहूर अपघातांची मालिकापहूर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू असून यात परवा मध्यरात्री पहूर येथे जामनेर रोडवर मक्का वाहतुकीच्या रोडवर वाळत टाकलेल्या असल्यामुळे मोटर सायकल व 407 च्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडते न घडते तोच दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आयशर व यामाहा मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर गंभीर जाती झाले होते. तर पाळधी जवळ झालेल्या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. तसेच शेंदुर्णी येथेही ट्रॅक्टरवरून पडून एक जण मयत झाल्याची घटना घडली होती. या सततच्या अपघातामुळे पहूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .दरम्यान काल मध्यरात्री झालेल्या महिंद्रा पिकप पलटी होऊन झालेल्या अपघातात 14 जण जखमी झाले असले तरी अद्याप पर्यंत पहूर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते.

Read More

पाळधी येथे केळी पिकावर शेतीशाळा संपन्न

पाळधी येथे केळी पिकावर शेतीशाळा संपन्न रुपेशकुमार बिऱ्हाडेतालुका प्रतिनिधी जे.बी.एन जामनेर पाळधी ता.जामनेर येथे फलोत्पादन पिकावरील कीड,रोग,सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प सन 2024 /25 अंतर्गत केळी पिकाच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतीशाळा ही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय,नाशिक येथील सर्वेक्षण अधिकारी संजय सोनवणे यांच्या समक्ष घेण्यात आली. शेतीशाळेत शेतकऱ्यांना केळी पिकाची काढणीपश्चात तंत्रज्ञान व एकात्मिक खत व्यवस्थापनाबद्दल तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीवर भर देण्याचे आवाहन संजय सोनवणे यांनी केले. तसेच कृषी विभाग सदैव तुमच्या पाठीशी उभा असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांनी शेतीशाळेत व शेतीत सहभाग वाढवण्याचे आवाहन देखील याप्रसंगी करण्यात आले. पाळधी गावचे माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याबद्दल आवाहन केले.शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी समूह रंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेतीशाळेस तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील व कृषी विभागातील इतर अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी बंधू उपस्थित होते.

Read More

वसुनंदिनी फाउंडेशनचे पुरस्कारवितरण, वर्धापन दिन उत्साहात

वसुनंदिनी फाउंडेशनचे पुरस्कारवितरण, वर्धापन दिन उत्साहात जळगाव : सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वसुनंदिनी फाउंडेशन संचलित एम. के. व्हेंचर जळगाव यांच्या साहित्य सरिता मंचतर्फे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अल्पबचत भवनात 8 डिसेंबर रोजी पार पडला. यात राज्यभरातील नवोदित साहित्यिकांच्या प्रकाशित झालेल्या 13 काव्यसंग्रह, कथासंग्रह यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच समाजातील उत्कृष्ट कला, क्रीडा, सामाजिकसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 56 महिला व पुरुषांना वसुनंदिनी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाळीसगावचे प्रसिद्ध लेखक विश्वास विष्णू देशपांडे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय बहुभाषिक महासंघ अध्यक्ष सुरेश मुळे, नाशिकचे अविनाथ भिडे, लेखराज उपाध्याय, डॉ.प्रकाश शंकरराव जोशी, दिलीप दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार सुचिता कुंघटकर, कल्पना रोहिदास सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरणासाठी महिला रोजगार मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करून संस्थेचे सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले म्हणून उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले. पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन वसुनंदिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर सोनवणे आणि एम. के. वेंचर्स अध्यक्षा माधुरी कुलकण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मकरंद पाटील, ललिता पाटील, सुनीता पाटील यांनी केले. अशोक पारधी व नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read More

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा रब्बी हंगाम- 2024 साठी 31 डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा रब्बी हंगाम- 2024 साठी 31 डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज रुपेशकुमार बिऱ्हाडेजामनेर तालुका प्रतिनिधी राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढवून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत‌ पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिकांचा समावेश असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे तसेच ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी अर्ज करता येणार आहे. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक असणार आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८- अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा देखील आवश्यक आहे. 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रुपये 300 तर व आदिवासी गटासाठी पीक निहाय रक्कम रुपये 150 राहील. तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे पिक स्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षीसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये असणार आहे. तर जिल्हा पातळीवरील पहिले बक्षीस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षीस पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षीस चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षीस तीस हजार रुपये असणार आहे. पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जामनेर श्री. जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

Read More

विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंत्री गिरीश भाऊ महाजन व दिलीप खोडपे सरांनी विजयासाठी घातले साकडे,शेंदुर्णीत यात्रा उत्सवाला सुरूवात.

शेंदुर्णी (प्रतिनिधी) खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर हे एकत्र आले. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, मंत्री गिरीष महाजन, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प्रवीण गरुड, भाजपचे नेते संजय गरुड, सरोजिनी गरुड, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, माजी नगराध्यक्षा विजया खलसे आदी मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११ वाजता महापूजासह आरती करण्यात आली. १७४४ च्या कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशीला प्रारंभ झालेल्या रथोत्सवाचा वारसा आजही भक्तिभावाने साजरा केला जातो. आज त्रिविक्रम भगवान यांच्या रथाचे मनोभावे पूजन केले गेले. हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. रथोत्सवानिमित्त शेंदुर्णीत भरते पंधरा दिवस यात्रा सोन नदीच्या काठावर रथोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरली आहे. त्यात हॉटेल्स, करमणुकीचे खेळ, विविध दुकाने, सिनेमागृहे, तमाशा मंडळे आहे. यामुळे १५ दिवस मोठी यात्रा भरत असते. त्यात लाखों रुपयांची व्यवसायात उलाढाल होत असते. नौकरी , व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणारे शेंदुर्णीकर आवर्जुन उपस्थित राहतात. माहेरवाशीण मुली, जावाई या वेळी शेंदुर्णी येथे हमखास येतात.यात्रा उत्सवाचा आनंद भाविक भक्तांनी गुण्या गोविंदाने घ्यावा तसेच निवडणुकीचा माहोल असल्याने प्रशासनावर ताण येईल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वेळ गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!