Headlines

कोरोना काळातील मी पाहिलेला गिरिश भाऊ

कोरोना काळातील मि पाहिलेला गिरिश भाऊ भाऊचे मानावे तितके आभार कमीच कोरोना काळात मि जेव्हा पळासखेडा येथील कोविड सेंटर मध्ये ॲडमिट होतो तेव्हा माझे नातेवाईक’ मित्र’ विरोधक ‘गद्दार या पैकी कोनीच नव्हते आले मला भेटायला ‘कारण मरणाची भिती लागली होती सर्वांना वाटायला पन माझा गिरिष भाऊ आला होता मला भेटायला, सुविधा पुरवायला ‘ पुर्ण हॉल मध्ये फिरून सर्वांनाधिर द्यायला होय फक्त माझा गिरीष भाऊ यायचा कोवीड सेंटर मध्ये आम्हाला भेटायला . त्या नंतर गरम पाण्याची व इतर सुविधांची तात्काळ व्यवस्था करून द्यायला. आम्हा कोरोना पॉझीटीव रुग्णांचें मनोबल खचू नये म्हूणन आला होता आमचा गिरीश भाऊ,वैद्यकीय ट्रिटमेंट सहदररोज दिवस भर भजन ‘ किर्तन देशभक्ती पर कार्यक्रम राबवत होता माझा गिरीश भाऊ अशे विविध कार्यक्रम राबऊन कोरोनाची भीती आमच्या आमच्या मनातून भीती घालउन नवीन ऊर्जा देत होता माझा गिरीश भाऊ, भाउंचे हे उपकार मि व माझ्या सोबतचे रुग्ण आयुष्यभर विसरुच शकत नाही, भाऊंनी काय केले आणि काय नाही केले याच्याशी माझ्यासारख्या सर्व साधारण व्यक्तीला काहीच देने घेने नाही, माझ्या नजरेने फक्त आरोग्यदुत म्हणून जरी भाऊन कडे बघितले तरी त्याच्यात साक्षांत संकट मोचक हनुमंत मला दिसतात, असा आहे माझा गिरीश भाऊ, ज्या वेळेस घरचे लोक जवळ येत नव्हते त्या वेळेस माझा भाऊ आम्हा कोरोना पॉजीटीव्ह पेशंट मध्ये फिरत होता, असा आहे माझा गिरीश भाऊ, आज जी लोक सत्तेसाठी,पदा साठी,राजकारण करू पाहत आहे त्यांना माझे एकच सांगणे आहे कि, कोरोना काळात कोनत्याच पेशंट ची जात,धर्म, पंथ न बघता सडळ हाताने मदत करणारा स्वतःसाठी नाही तर तुम्हा आम्हा साठी जगणारा माझा गिरीश भाऊ,रात्र न दिवस कोणत्याही जात, धर्म,पंथ न बघता रुग्णांची सेवा अहोराती देणारा माझा गिरीष भाऊ मिच नाहीय या जामनेर तालुक्यातील प्रत्येक घराघरातील व्यतिनीं अनुभवलेला असा माझा गिरीश भाऊ, अखेर रुग्ण सेवा करता करता माझा गिरीष भाऊ दोन दोन वेळा कोरोना पॉझीटीव झाला, व सर्व तालुक्यावासियांना जीव भांड्यात पडला, पण एक म्हणून आहे ना देव तारी त्या कोण मारी,प्रचंड जनतेचे आशीर्वादाने करोनावर ही मात केली, असा आहे माझा गिरीश भाऊ, सर्व जाती धर्मा पंथच्या लोकांनच्या मनात खोलवर रुजत गेलेला माझा गिरीश भाऊ सध्याची राजकिय परिस्थिती बघता माझ्या सारख्या अनेक रुग्णांच्या मदतीला धाऊन जानाऱ्या गिरीष भाऊंची आठवण जामनेर करांना करून दयावी असे मला वाटले ‘ म्हणून आज निवांत बसून भाऊंन साठी लेख लिहुन टाकले . आज तुम्ही जाती पाती च्या राजकारनाला बळी न पडता जामनेर चा खरा कोहीनुर हिरा पुन्हा एकदा निवडून द्यावा हिच विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 गिरिष दत्तात्रय महाजनअनु. क्र. 2 निशानी कमळ🪷🪷🪷🪷🪷🪷🪷तुमचा आपला सर्वांचा लाडका गिरीष भाऊ विजयी भव लेख – विलास ढाकरे.

Read More

पाळधी येथील विद्यालयात तब्बल सोळा वर्षांनी भरला पुन्हा आठवणींचा वर्ग

पाळधी येथील विद्यालयात तब्बल सोळा वर्षांनी भरला पुन्हा आठवणींचा वर्ग माजी विद्यार्थी बॅच 2008 यांनी स्वखर्चातून केले प्रवेशद्वाराचे रंगरंगोटीकरण,मुलींना दिल्या साडी भेट.प्रतिनिधी.गजानन क्षीरसागरपाळधी ता.जामनेर :- मैत्री जीवनाला सुंदर करणारे अधभूत रसायन म्हणजे मैत्री आयुष्याचा प्रवास सुसह्या करणारी पाऊलवाट.मैत्री म्हणजे अतुट विश्वास.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही मैत्री अधिक दूढ करण्यासाठी सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञानाचा तितक्याच चपखलपणे वापर होताना दिसून येत आहे.अशाच २००८ मध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या जुन्या मित्रांना एकत्रित आणण्याची किमया सोशल मीडियाने केली आहे. येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी मंच सन २००७-२००८ बॅचचा गुरूपूजन समारंभ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली, गेट टुगेदरच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी त्यांना पहिली ते दहावीला ज्या गुरूजणांनी ज्ञान दिले त्या सर्व गुरुंचे सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे माजी शिक्षक तुकाराम न्हावी गुरुजी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक होते.माजी विद्यार्थ्यांपैकी गजानन क्षीरसागर यांनी सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे,माजी माध्यमिक शिक्षकांचे , कार्याचे पैलू उलगडून आठवणींना उजाळा दिला.ज्या व्यक्तीच्या जीवनात चांगले गुरू व चांगले मित्र असतात त्यांचे जीवन सफल होते हे सांगितले. जसवंत परदेशी याने मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता गीत सादर केले. याशिवाय सत्यवान पाटील,दिपाली पवार,प्रियांका पाटील,सरला मोरे,कमलाकर धनगर,श्रीराम माळी यांनी मनोगत व्यक्त केले.सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय देत जुन्या आठवणी ताज्या केल्या.त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगतांना अनेकांना गहिवरून येत होते.सर्व शिक्षकांनी सुध्दा जुन्या आठवणी सांगितल्या व आज पालक म्हणून माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्ये सांगितले .त्यामध्ये डी एस पाटील सर यांनी माजी विद्यार्थ्यांकडून खरा तो एकची धर्म प्रार्थना म्हणून घेतली व संसारिक जीवनात कसे यशस्वी होता येईल याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.अध्यक्ष तुकाराम न्हावी गुरुजी यांनी माजी विद्यार्थ्यांना जीवनातील खरे सुख हे लोककल्याणात, निसर्ग संगोपनात व सामाजिक बांधिलकी जपण्यात आहे हे स्पष्ट केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक जयराम पाटील गुरुजी,जाधव गुरुजी ,गोविंद बाविस्कर गुरुजी,उपस्थित होते.जयराम पाटील गुरुजी तर या आदरातिथ्यामुळे व्यासपीठावरच भावूक झाले होते व त्यांनी उभे राहून सुंदर गीत सादर केले.माध्यमिक शिक्षकांमध्ये एम. के.बाविस्कर, एच.डी.चौधरी,एम.एल.पाटील, डी.एस.पाटील, वाय .पी. वानखेडे, सी बी पाटील, व्हीं.टी.पाटील, एन.डी.सुशीर,सुरेश पाटील,एस.एन.पाटील,ईश्वर भील, एन.डी.सुशीर,सुरेश पाटील, सुरेखा बाविस्कर मॅडम हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन जसवंत परदेशी व गजानन क्षीरसागर यांनी केले. आभार समाधान बारी यांनी मानले.आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो म्हणून शाळेच्या प्रवेशद्वाराचे रंगरंगोटीकरण करण्यात आले, सर्व मुलींना भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व भावांनी आपल्या लाडक्या बहिणींना साडी भेट म्हणून दिली. व बहिणीनी देखील आपल्या लाडक्या भाऊला चष्मा भेट म्हणून दिला.सर्व माजी विद्यार्थ्यांनी नृत्य करून स्नेह मेळाव्याचा अफाट आनंद घेतला तसेच संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमास्थळी सर्व वातावरण भाऊकमय झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन बारी,गणेश करवंदे, योगेश माळी,अमर परदेशी,अतुल पाटील,उमेश माळी,राहुल पाटील,योगेश पाटील, गजानन परदेशी,कडूबा माळी,तुषार गोरे, अमर परदेशी,ईश्वर परदेशी,प्रशांत शिंपी,विनोद माळी,चेतन पाटील,रवींद्र नरोदे,मोनाली ढोले,सरला मोरे,प्रतिभा पाटील व सर्व बॅच २००८ मित्र मैत्रिणींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Read More

पाळधी येथे चालत्या ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन 7 जण जखमी.तर ट्रॅक्टर व 5 क्विंटल कापूस जळून खाक.

दिनांक 7 नोव्हेंबर गुरुवार संध्याकाळी 6 वाजता पाळधी गावातील जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ चालत्या ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी होऊन 7 जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील किशोर दलसिंग परदेशी यांच्या शेतात कापूस वेचून ट्रॅक्टर क्रमांक MH19 CU1694 यामध्ये 5 क्विंटल कापूस घेऊन किशोर परदेशी वय 37, स्वाती परदेशी वय 32, योगिता परदेशी वय 18, पूजा परदेशी वय 16, आरती परदेशी वय 16, हिराबाई परदेशी वय 35 व वैशाली धनगर वय 25 हे घराकडे येत असताना जळगाव छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंप जवळ ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी झाली यावेळी यातील सर्व 7 जण हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.तर ट्रॅक्टर व 5 क्विंटल कापूस पूर्तहा जळून खाक झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.तर गावात घटनेची माहिती मिळताच गावातील गणेश माळी,रवींद्र परदेशी,सागर परदेशी, पवण परदेशी,आकाश परदेशी, ग्रा.प.सदस्य देवचंद परदेशी, दिपक परदेशी,पन्नालाल परदेशी,शालिक परदेशी,कैलास परदेशी व मित्र परिवार यांनी ट्रॅक्टरची आग विझविण्यात मदत करत जखमींना रुग्णालयात हलविण्यात सहकार्य केले.

Read More

संमेलन पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक माजी विद्यार्थी आले एकत्र पाटील विद्यालयात मेळावा

संमेलन पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक माजी विद्यार्थी आले एकत्र पाटील विद्यालयात मेळावा निलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) ता. जामनेर.इयत्ता 10 वी सन 1998 च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन दि. 5 नोहेंबर 2024, मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान श्री डी. एल. पाटील सर यांनी भूषविले. व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील सर, श्री. एस. एस पाटील सर, श्री वराडे सर, श्री लोहार सर, श्री डी. पी. पाटील सर, श्री एस आर पाटील सर, श्री एस सी चौधरी सर, श्री एन वाय पाटील सर, श्री आर एस चौधरी सर, श्री एम एल पाटील सर, श्रीमती एम डी पाटील मॅडम व भरत बापू इ. शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भोसांडे यांनी केले. व सूत्र संचलन माधुरी पाटील यांनी केले.कार्यक्रमवेळी श्री एस एस पाटील सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आरोग्याची गुरु किल्ली दिली, आर एस चौधरी सर यांनी ही योग्य मार्गदर्शन केले, त्यानंतर अध्यक्ष्यांनी आपल्या भाषणातून माणूस म्हणून कस जगावं हे सांगितलं. विध्यार्थ्यांपैकी श्री किरण हडप, मनोज सूर्यवंशी, निलेश सोनवणे, संजय वराडे व बापूसाहेब सुमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यापैकी बापूसाहेब सुमित पाटील, नितीन हडप, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, माधव अहिर, प्रमोद पवार, रमेश चोपडे, अनिल हडप, माणिक शिंदे, गोपाल हडप, किरण कोळी, प्रवीण कोळी, आनंदा लोहार, प्रवीण पवार, किशोर सोनार, विजय हडप, सुपडू सपकाळ, गणेश राजपूत, भगवान बोरसे, रतन बोरसे, अर्जुन खोडपे, गणेश भडगे, सतीश राजपूत, ललित वानखेडे,तुळशीराम पाटील, गोपाळ बोरसे, इ. मुलींमधून मनिषा पाटील, माधुरी पाटील, शैलजा पवार, ललिता पाटील, निर्मला बागुल, रेखा जैन, जयश्री राजपूत, आरती पवार, कौशल्या हिवाळे, पुष्पा काळे, संदीपा पवार, कविता हडप, मुक्ता पवार, मिना परदेशीं, सुवर्णा आगळे इ. विद्यार्थी -विद्यार्थिनी कार्यक्रमांस उपस्थित होते. शाळेला सर्व विदयार्थ्यांनी 36 नग सिलिंग फॅन सप्रेम भेट दिली. शेवटी श्री मनोज सपकाळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.सर्वांनी सोबत स्नेह भोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास भोसांडे, किरण हडप, संजय वराडे, खान्देश समाज भूषण बापूसाहेब सुमित पाटील, मनोज सूर्यवंशी, माधव अहिर, किरण कोळी, माधुरी पाटील, आरती पवार, मनीषा पाटील, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, अनिल हडप, नितीन हडप, माणिक शिंदे यांनी प्रयत्न केले.

Read More

जळगाव सुर्वण नगरीला आता कश्मिरी सुगंधाची मोहिनी”आता जामनेर होणार केशरचे सुगंधीत नंदनवन”

जळगाव सुर्वण नगरीला आता कश्मिरी सुगंधाची मोहिनी”आता जामनेर होणार केशरचे सुगंधीत नंदनवन” समुद्र सपाटी पासून 1585 मी उंची वर काश्मिरी पर्वतांच्या कुशित पिकवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट औषधी गुणधर्म असलेल्या मसाल्यांपैकी एक काश्मिरी कोंग म्हणजेच केशर उत्पन्नाचा प्रयोग जामनेरातील उच्चशिक्षीत तरुणांनी यशस्वी केला.श्री सुवेक विवेक कुलकर्णी आणि श्री. संकेत शंकर पाटील या दोन तरुणांनी श्री राजेश तुकाराम चौधरी व श्री. नरेश दत्तु घुले या दोन मित्रांच्या तांत्रीक मदतीने अपार कष्टातून जळगावातील जामनेरात प्रथमच केशरचे स्वर्ग प्रस्थापिन केले.श्री सुवेक व श्री संकेत हे दोन्ही इंजिनिअर असून मल्टीनेशनल कंपनीन उच्च पदावर कार्यरत आहेत, नोकरी सोबत स्वतः चा एखादा व्यवसाय हवा हा त्यांच्या अंतरमनाचा शब्दनाद एकून त्यांनी केशर शेती करण्याचा निर्णय घेतलासुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने त्यांनी माहीती मिळवण्यास सुरुवात केली. त्या नंतर श्रीनगर मधील संशोधन स्थळांना भेटी दिल्या आणि खूप अभ्यासपूर्ण परिश्रमातून त्यांनी केशरशेतीचा हा प्रयोग जामनेरात प्रत्यक्ष राबवला.मागील दोन वर्षापूर्वी त्यांनी नोयडा येथेकाही मित्रांची मदत घेऊन पहिला प्रयोग केला पण ते सांगतात की त्यात त्यांना अपेक्षीत यश मिळाले नाही त्या नंतर त्यांनी जामनेर व नोयडा येथे या वर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी केशर बिजची लागवड केली व दोन्ही ठिकाणी त्यांना घवघवीत यश मिळाने त्यांना दोन्ही प्लांट मिळून तब्बल 12 किलो केशर उत्पन्नाची अपेक्षा आहे.ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या दोघांनी पुलवामा मधील लेथपुर येथून केशर बीज ची आयात केली. त्यावर बुरशीनाशका सारख्या विविध प्रक्रिया करून त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवल गेल. इनडोरफार्मिंग मधील ऐरोफोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने 500 स्क्वेअर फूट मध्ये केशरची लागवड केली गेली.या दोन्ही तरूणांनी मिळून मनस्वी केलेला हा प्रयोग इतर तरूणाई साठी दिपस्तंभासारख कार्य करेल.पारंपारीक शेतीला छेद देत चार भिंतीमध्ये ही शेती केली जाऊ शकते हा नविन पायंडा या तरुणांनी जामनेर करांसाठी आखून दिला. पारंपारीक शेतीला समांतर पर्याय म्हणून केशर शेती केली जाऊ शकते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. बेरोजगार तरुणांना करियरच्या नविन संधीएरोफोनिक्स तंत्रज्ञानात मिळू शकतात अशी शक्यता या तरूणांनी वर्तवलेली आहे.आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या उक्तीला जागून इच्छुक तरुणांना मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्याचा या दोघांचा मानस आहे.

Read More

रेशन कार्डवरील धान्य झाले कमी? मोदी सरकारचा नवीन नियम जाणून घ्या, 1 नोव्हेंबरपासून लागू झाले धोरण!

भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळतो. यातील अत्याधिक योजना या देशातील गरूजूंसाठी आणि गरिबांसाठी आहे. देशातील अनेक लोकांना दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत आहे. त्यांच्यासाठी स्वस्त धान्य देण्यात येते. स्वस्त धान्य दुकानातून त्यांना साखर, तेल, तांदळासह गव्हाचे वाटप करण्या येते. गोरगरीबांसाठी रेशनिंग पुरवण्यात येते. सरकारने कोरोनो काळात अतिरिक्त धान्य वाटपाला पण मंजूरी दिली होती. आता धान्य वाटपासंदर्भात काही बदल झाले आहेत. 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल भारत सरकारने राशन कार्ड संदर्भात नियम बदलले आहेत. 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल झाला आहे. या नियमातील बदलानुसार रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा तांदुळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे दोन्ही धान्य समसमान देण्यात येणार आहे. गेल्यावेळी सरकारने राज्यात आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक निर्बंध आली आहेत. तांदळाचे वाटप घटले केंद्र सरकारने 1 नोव्हेंबरपासून रेशन कार्डधारकांसाठी नियमात बदल केला आहे. तांदळासह गव्हाच्या वाटपासाठी हे नवीन नियम लागू झाले आहेत. पूर्वी सरकार या योजनेनुसार, 3 किलो तांदळासह 2 किलो गव्हाचं वाटप करत होते. आता बदललेल्या नियमानुसार, सरकार तांदळासह गव्हाचं समसमान वाटप करणार आहे. म्हणजे आता राशन कार्डवर दोन किलो ऐवजी अडीच किलो गव्हाचे आणि 3 किलोऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप करण्यात येईल. सरकारने अंत्योदय कार्डवर देण्यात येणाऱ्या 35 किलो खाद्यान्नाच्या वाटपात बदल केला आहे. पूर्वी अंत्योदय कार्डधारकांना 14 किलो गव्हासह 30 किलो तांदळाचे वाटप करण्यात येत होते. तर आता 18 किलो तांदळासह 17 किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. हा नियम या 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे. ई-केवायसीसाठी मुदतवाढ केंद्र सरकारने यापूर्वीच रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर निश्चित झाली होती. पण अनेक अडचणींमुळे कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सरकारने आता एक महिना ही मुदत वाढवली आहे. पण 1 नोव्हेंबर रोजीपर्यंत सुद्धा ई-केवायसी पूर्ण झाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची तारीख आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या काळात ज्यांनी नियम पाळले नाहीत, त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

Read More

बाप की सैतान! पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार , नात्याला काळीमा फासणारी घटना

बाप की सैतान! पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार , नात्याला काळीमा फासणारी घटना यावल प्रतिनिधी फिरोज तडवीजळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने संबंधीत नराधमा वर गून्हा दाखल करण्यात आला आहे, या संदर्भातील प्राप्तमाहिती नुसार बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना यावल तालुक्यात घडली आहे. एका व्यक्तीचे 2023 मध्ये लग्न झाले असून त्याला आठ महिन्याची मुलगी आहे, संबंधीत व्यक्ती हा आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसोबत अशील कृत्य करीत आल्याचे त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आले, त्यामुळे ती महीला त्या नराधमाच्या हालचालींवर लक्ष वेधले मात्र ऐके दिवशी त्या नराधाप बापाने पोटच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन तीत्यवर अत्याचार केला,तर या घटनेचा उलगडा मुलीच्य आईनेच उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय सहितेच्या कलम 64/1, 65/2 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासू संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5, एल एम एन, 6 अनवे यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्रे सहकारी करीत आहे,

Read More

”पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद” शरद पवारांचा मोठा आरोप; अधिकाऱ्याचा दाखला देत म्हणाले…

बारामती : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बारामती येथे दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांच्या दुसऱ्या पाडव्यावरुन नाराजी व्यक्त केली. शिवाय आर. आर. पाटलांविषयी अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन प्रतिक्रिया दिली. यासह निवडणुकीमध्ये पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद मिळत असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. शरद पवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आजचा दिवस आनंदाचा असतो. ⁠महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, हेच मागणं आहे. ⁠महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते, ⁠परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे. ⁠केंद्र सरकारच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र पहिल्याच पाच राज्यात नाही.. उत्पादनात महाराष्ट्र मागे गेला आहे. ”सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने आपण चित्र बदलू शकतो. परीवर्तन घडवू शकतो.. ⁠राज्यातील जनतेला सुविधा देण्याच्या योजना या सरकारने बंद केल्याचं चित्र आहे. या योजनांचे निधी इतरत्र वळवला जातोय.” असंही पवार म्हणाले. आर.आर. पाटलांबद्दलच्या विधानावर पवार म्हणाले… ”सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही काढला नाही. आर.आर. पाटील यांची प्रतिमा चांगली होती.. स्वच्छ होती. त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं हे योग्य नाही. ते घडलं नसतं चागलं झालं असतं. सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली, त्यात काही चुकीचं नाही असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेचा शपथेचा तो भंग आहे.” असं शरद पवार म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांना रसद… शरद पवार म्हणाले की, या सरकारचं वैशिष्ट्य आहे.. विमानाने एबी फॉर्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. ⁠हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे.

Read More

शहरातील भुसावळ रोडवरील किरण टी सेंटर दुकानाला भिषण आग,आगीत मालाचे लाखोंचे नुकसान

जामनेर – शहरातील भुसावळ रोड येथील आय सी आय सी आय बँकेच्या बाजूला असलेल्या किरण टी सेंटर ला दी.१ रोजी लक्ष्मी पूजन दिवाळीच्या दिवशीच अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सविस्तर असे, की दिवाळी असल्या कारणाने किरण टी सेंटर चे मालक किरण झाल्टे हे दुकानाची पूजा करून दुकान बंद करून घरी गेले असता साधारण १० वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. दुकानात लाखो रुपयांचे चिप्स पाकिटे, मिनरल वॉटर बॉक्स, थंड पेये चे बॉक्स, चहा पावडर, साखर, बिस्कीट पुढे बॉक्स यासह दुकानात असलेले साहित्य मिळून १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फटाका खिडकी मधून दुकानात शिरल्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आग लागल्याची माहिती नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दल घटणा स्थळी दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळेच बाजूलाच असलेल्या बँकेचे मोठे होण्यापासून वाचवले आहे. एक शांत स्वभावी, अतिशय होतकरू, सर्वांशी प्रेमाने वागणारा माणूस म्हणून किरण झाल्टे यांचे शहारत नाव असून कर्ज काढून त्यांनी चहाचा व्यवसाय उभा केला होता. प्रपंचाचा गाडा हाकताना याच चहाच्या भाड्याने घेतलेल्या दुकानावर व कोल्ड्रिंक्स आणि चिप्स च्या व्यवसायातून ते आपला घर खर्च चालवत होते. पण अचानक लागलेल्या आगीमुळे क्षणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे

Read More

शहरातील भुसावळ रोडवरील किरण टी सेंटर दुकानाला भिषण आग,आगीत लाखोंचे नुकसान.

जामनेर – शहरातील भुसावळ रोड येथील आय सी आय सी आय बँकेच्या बाजूला असलेल्या किरण टी सेंटर ला दी.१ रोजी लक्ष्मी पूजन दिवाळीच्या दिवशीच अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सविस्तर असे, की दिवाळी असल्या कारणाने किरण टी सेंटर चे मालक किरण झाल्टे हे दुकानाची पूजा करून दुकान बंद करून घरी गेले असता साधारण १० वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. दुकानात लाखो रुपयांचे चिप्स पाकिटे, मिनरल वॉटर बॉक्स, थंड पेये चे बॉक्स, चहा पावडर, साखर, बिस्कीट पुढे बॉक्स यासह दुकानात असलेले साहित्य मिळून १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फटाका खिडकी मधून दुकानात शिरल्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आग लागल्याची माहिती नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दल घटणा स्थळी दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळेच बाजूलाच असलेल्या बँकेचे मोठे होण्यापासून वाचवले आहे.एक शांत स्वभावी, अतिशय होतकरू, सर्वांशी प्रेमाने वागणारा माणूस म्हणून किरण झाल्टे यांचे शहारत नाव असून कर्ज काढून त्यांनी चहाचा व्यवसाय उभा केला होता. प्रपंचाचा गाडा हाकताना याच चहाच्या भाड्याने घेतलेल्या दुकानावर व कोल्ड्रिंक्स आणि चिप्स च्या व्यवसायातून ते आपला घर खर्च चालवत होते. पण अचानक लागलेल्या आगीमुळे क्षणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!