शहरातील सोंनबर्डी येथे स्विमिंग पुलात बुडून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू.
जामनेर शहरातून एक दुदैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात एका पंधरा वर्षे मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. संकेत निवृत्ती पाटील 15 वर्ष राहणार घोसला,त.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता.जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील प्रसिद्ध सोनबर्डी येथे बॅक वॉटर बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांन सोबत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बुडाल्याची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला. संकेत निवृत्ती गावंडे ( पाटील ) हा जामनेर येथील शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तो आपल्या लहान भाऊ आणि आजी सोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. संकेत पाटील हा आज शाळा बुडवून पोहण्यासाठी सोनबर्डी येथील स्विमिंग पूल वर गेला होता गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये नुकतच पाणी भरण्यात आलं होतं. स्विमिंग पूल चालू करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. त्यासाठी स्विंगपूलाची डागडूची आणि इतर काम पूर्ण करण्यावर नगरपालिका प्रशासन जोर देत होतं. मात्र आज अचानक संकेत पाटील आपल्या काही मित्रांसोबत स्विमिंग पूल येथे आला होता. या स्विमिंग पूल मध्ये मुलांना अडवण्यासाठी तिथे कोणीच सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. अशातच संकेत पाटील हा आपल्या मित्रांसोबत या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र हाच पोहण्याचा मोह संकेत पाटील च्या जीवावर बेतला आणि स्विमिंग पूल मधील पाण्यात तो बुडाला. स्विमिंग पूलाची डागडूजी करण्यात येत असल्याने तिथे पाणी भरण्यात आल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे सीईओ बागुल यांनी दिली आहे.
