Headlines

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या दि.07/01/2025 रोजी 11:00 वा.च्या सुमारास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे,व पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. कॉ जयेंद्र पगारे, पो.हे. कॉ दिपक जाधव, पो.हे. कॉ सुशील सत्रे, पो.हे.कॉ अनिल राठोड, पो.कॉ. सचिन महाजन असे खादगाव बिटमध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर शहराच्या बाहेर खादगाव रोडवर चार ईसम हे दोन मोटरसायकल वर विना नंबरच्या मोटरसायकल घेऊन जात जात असतांना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1)सागर अमृत चौधरी वय 34 वर्ष. 2)सागर शिवाजी चौधरी वय 26 वर्ष. 3)संजय युवराज पाटील वय 45 वर्ष. 4)योगेश भाऊराव गावंडे वय 39 वर्ष. सर्व रा. खादगाव ता. जामनेर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना सदर मोटरसायकलच्या नंबर व कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्यांना सदर मोटरसायकलच्या बाबतीत काही एक सांगता येत नसून ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. त्यावरून पोलिसांची खात्री झाली की सदरच्या मोटरसायकल या नमूद ईसमानी लबाडीने मिळवलेल्या आहे किंवा त्यांच्या मालकीच्या नसतांना ताब्यात बाडगलेल्या आहेत सदरच्या मोटरसायकलीचे वर्णन खालील प्रमाणे 1)20000/-रु किंमतीची एक काळ्या रंगाची ड्रिम युगा जिचा इंजिन नंबर JC58EG0012548 व 2) 20000/-रु कि सिटी 100 कंपनीची मोटरसायकल इंजिन नंबर DUYPJM13145 व 3) 40000/-रु किं.च्या दोन मोटरसायकल दोन पंचा समक्ष जागीच जप्त करून ताब्यात घेतल्या आहे त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. वरील वर्णन व किंमतीच्या दोन मोटरसायकल मालकी नसतांना त्यांच्या कब्जात बाळगून मोटर सायकलच्या मालकी बाबत कोणतेही समाधान कारक उत्तर न देता मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 124 प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून सदर तपासात असे निष्पन्न झाले की, सदरच्या मोटरसायकल ह्या बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्य प्रदेश व छैगाव माखन पोलीस स्टेशन जि. खंडवा मध्यप्रदेश येथून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्याकडे तपासाकामी देण्यात आले आहे.

Read More

जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती

*जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती* जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर प्रतिनिधीजामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.

Read More

जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती

जामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.

Read More

लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.विजेते र्धकांना रोख बक्षिसे, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

लोहारा ता.पाचोरामहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समता,बंधुता,सदाचार व शांतीचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दादाश्री विश्व लॉन्स डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय पाचोरा रोड लोहारा येथे आयोजित करण्यात आले होते. रेबीन कापून स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खुला गट वय १६ ते ४०रन अप ६ किलोमीटर, प्रथम बक्षीस दीपक भोई शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक बक्षीस गोपाल कोळी ,तृतीय क्रमांक सौरव राजपूत, तीन किलोमीटर खुल्या गटात प्रथम बक्षीस सुरज माळी शाहपुरा द्वितीय बक्षीस हर्षल भोई शेंदुर्णी तृतीय बक्षीस कराड नवघरे शेंदुर्णी 200 मीटर स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात प्रथम बक्षीस प्रथमेश धोबी लोहारा, द्वितीय बक्षीस प्रितेश कुंभार लोहारा तृतीय बक्षीस भूषण मीना कासमपुरा 200 मीटर मुलींच्या गटात प्रथम बक्षीस निहार राजपूत कासमपुरा,द्वितीय बक्षीस मोनाली कोळी लोहारा ,तृतीय बक्षीस डिंपल थोरात कासमपुरा. 100 मीटर शालेय मुलींच्या गटात प्रथम बक्षीस दुर्गेश्वरी परदेशी कासमपुरा,द्वितीय बक्षीस खुशी गोंधळे लोहारा ,तृतीय बक्षीस विशाखा खाटीक लोहारा. 100 मीटर शालेय गट मुलांचा प्रथम बक्षीस आसिफ पिंजारी लोहारा,द्वितीय बक्षिस मोहन कोळी लोहारा, तृतीय बक्षीस सार्थक चौधरी लोहारा, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी कृषीभूषण कृषीरत्न विश्वासराव पाटील, ,डॉ सागर गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, डॉ प्रितेश चौधरी,विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण माळी, भोसंडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, पत्रकार दीपक पवार, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, अनिल तडवी, उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून तडवी सर,धोनी सर,गायकवाड सर, गुजर सर, पी .एम.सुर्वे सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश देशमुख,नंदू सुर्वे,हितेश पालीवाल,रमेश कोळी,नाना चौधरी,गुणवंत सरोदे,सुनील बाविस्कर,भूषण शिवदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार,ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी केले होते.

Read More

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (माध्यमिक विभाग) “जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) २०२४-२५” चे आयोजन दि.३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जी एच रायसोनी कॉलेज शिरसोली रोड,जळगाव येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी तथा क्रीडा उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, व भौतिकशास्त्र उपशिक्षक प्रा.सचिन तानाजी गडाख यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते “प्रशिक्षणार्थी” म्हणून शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत राज्यस्तरीय सुलभक डॉ.जगदीश पाटील, डॉ.अतुल इंगळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.

Read More

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Read More

जामनेर सोंनबर्डी येथे 15 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्य,नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह??

जामनेर सोंनबर्डी येथे स्विमिंग पुल मध्ये 15 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामुळे स्विमिंग पुल बांधकाम आणि त्यासाठी ची नियमावली बघता. स्विमिंग पूल व्यवस्थापन आणि परवानगी देणारे प्रशासन झोपा झोडत होते का?? स्विमिंग पूल हा क्रीडा प्रकारात येतो. परंतु, कोणत्या क्रीडा प्रकारासाठी सदर पुल बांधण्यात आला. त्यामुळे याला परवानगी देत असताना अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का??त्यानंतर पुलाची रचना बघता येथे नियमानुसार तज्ञ मार्गदर्शक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध का नव्हत्या???सदर पुल मध्ये उतरतांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोणीही कसे या खोल पुलात उतरून पोहू शकते??असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिका प्रशासन आणि क्रीडा विभाग वेळोवेळी तपासणी करीत होते का??हा ही प्रश्न मोठा जिकरीचा झाला आहे. यामुळे एका निष्पाप जीवाला हकनाक बळी जावे लागले असल्याचे मत जनमानसात आहे.यावर आता प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांच्या नजरा लागून आहे. की, राजकीय वरद हस्तात प्रकरण निकाली निघेल हे बघणे औचीत्याचे ठरेल.

Read More
error: Don't Try To Copy !!