Headlines

तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांचा पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा,तर बँकांकडून पीककर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्याला होल्ड.

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याना पीककर्ज भरण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून तगादा लावण्यात येत आहे.तर बँकांनी पीककर्ज थकीत शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. एकीकडे पूर परिस्थितीमुळे हाताचे पिक वाया गेले आहे तर दुसरीकडे जेमतेम उत्पन्न शेतकऱ्याच्या घरात येण्यास सुरुवात झाली आहे.तर पिक मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.या सर्व गोष्टींचा परिणाम कमी की काय म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. शासनाने पीककर्ज वसुली साठी तगादा लावू नये असे आदेश असताना देखील मात्र राष्ट्रीयकृत बँकांना यांची काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.तरी राज्यातील शासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन याकडे बँकांना सक्त आदेश देऊन याबाबत कठोर कारवाई बँकावर करण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read More

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

जामनेर (प्रतिनिधी) दि. २६-११-२०२५ रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालायातील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चित्रा परदेशी मैडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.आय.एम.चोरडिया सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.यानंतर प्रा.प्राची पाटील मैडम यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.यावेळी प्रा.चोरडिया सर यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन प्रा.रूपाली लोहार मैडम व कल्याणी सरताळे मैडम यांनी केला.

Read More

मालेगाव मधील बलात्कार घटने प्रकरणी लोहारा गाव कडकडीत बंद.आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणांनी लोहारा परिसर दणाणला.

प्रतिनिधीलोहारा तालुका पाचोरा येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्ष चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोहारा मार्केट पूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या बंदला गावातील व्यापारी, तरुण, तरुणी, नागरिक महिला यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सकाळी 9:00 वाजता लोहारा बस स्टॅन्ड परिसरापासून गावातून मुलींनी हातात निषेध नोंदवणारे पोस्टर घेऊन रॅली काढून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.आरोपीचा फोटो पेटवण्यात आला व त्याला असाच उभा पेटवा असा मानस व्यक्त केला. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, तरुण तरुणी पुरुष महिला, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Read More

चिमुकल्या ‘यज्ञा ‘ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे

पहूर येथे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन पहूर ता जामनेर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर अमानवी अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या विजय संजय खैरनार या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या तीव्र मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक २१ / ११ / २०२५ रोजी पहूर येथे शालेय विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला . छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादासाहेब कॅप्टन एम . आर .लेले पहूर बस स्थानक येथून होणार मोर्चास प्रारंभ झाला .आर . टी लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर . बी .आर . माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्रित येऊन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना लेखी निवेदन दिले .याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , उपसरपंच राजू जाधव , आर .बी .आर .कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना बनकर हरिभाऊ राऊत शंकर भमेरे यांनी संतप्त भावना व्यक्त करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली .याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर आगारे , माजी सरपंच शंकर जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे , सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे , पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष रवींद्र लाठे , शिक्षिका विद्यादेवी भालेराव , सुनिता पाटील , माधुरी बारी , सरोजिनी वानखेडे , डी . वाय . गोरे , बी . एन . जाधव , चंदेश सागर , नितीन पवार , अजय पाटील, दीपक पाटील हिरालाल भामेरे चंद्रकांत सोनार भरत सोनार , रतन सोनार , गजानन सोनार , जितेंद्र सोनार , चेतन रोकडे , तुषार बनकर , राहुल ढेंगाळे यांच्यासह संताप्त पहुरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज तब्बल ४० जणांनी भरले नामनिर्देशन पत्रनगराध्यक्ष पदासाठी गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांचेही अर्ज दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीदि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.आज तब्बल ४० जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी तर सदस्यांसाठी ३६ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.भाजपच्या वतीने निवडणुक लढवणाऱ्यांची मोठी यादी असुन महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ.उज्वला काशिद यांनीही आपला अर्ज दाखल केला असुन भाजपचे दोन दिग्गज नेते गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांनी सुद्धा आज अर्ज दाखल केले आहेत.पक्षाच्या वतीने आपल्यालाच ए.बी.फॉर्म मिळेल अशी सगळ्याच इच्छुकांची आशा आहे.अजुन काही दिग्गज नेते नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते आहे.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मात्र हम साथ साथ है असे चित्र असुन सगळ्याच इच्छुकांनी एकत्रीत आपल्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ४२ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.मतमोजणी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विवेक धांडे हे आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!