Headlines

ईद-ए-मिलाद उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा

Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी दिनांक 5/09 20025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला. आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केलातसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता

Read More

कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलां सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा अल्पोहार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव — ( प्रतिनिधी )कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलांना खास निमंत्रण देऊन आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत वेळ घालवला व अल्पोपहार केला. या छोट्या मुलांशी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, त्यांची स्वप्ने व आकांक्षा याबाबत संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रार्थना व्यक्त केली की, एक दिवस हीच मुले सर्व अडथळे पार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून समाजाचे नेतृत्व करतील. हा क्षण खऱ्या अर्थाने आशा, समानता आणि गणेशोत्सवाच्या उत्साहाचा उत्सव ठरला – जो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मुलाला मोठी स्वप्ने पाहण्याचा व त्यांची पूर्तता करण्याचा अधिकार आहे.

Read More

जामनेर-जळगाव रोडवरील खड्ड्यांचा ‘फोटोशूट’ – नगरपरिषद व ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह!”

जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर | प्रतिनिधीजामनेर-जळगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वास्तविकता आता उघड होत आहे.(दि. 28 ऑगस्ट 2025) दुपारी समाजसेवक अविनाश बोरसे यांनी जामनेर-जळगाव रोडवरील प्रचंड खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक आगळावेगळा मार्ग निवडला. त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून “फोटोशूट” करून नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजी कामावर तिखट टीका केली. अविनाश बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले: “नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपये खर्च करूनही जामनेर-जळगाव रोडची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.” स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून भविष्यात दर्जेदार रस्ते बांधकाम व्हावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Read More

मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ३० रोजी जामनेरात

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान खान या तरुणाचा जामनेर येथे कॅफेवर बसलेला असताना , बाहेर काढून १० ते १२ जणांनी अमानुषपणे मारहाण करत खून केला होता.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दिनांक ३० ऑगस्ट,शनिवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जामनेरला येणार आहे. त्यानंतर ते पुढे बेटावद खुर्द येथे जाऊन मयत सुलेमान खान याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे,जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान तडवी, जिल्हा सचिव रफिक बेग, ॲड.राजू मोगरे पाटील,जिल्हा संघटक बबन कांबळे,यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी कळविले आहे.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अबिद हुसेन यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शेंदुर्णीत प्रचंड मुक मोर्चा हजारो पुरुष महिलांचा सहभाग

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीशेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते. यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

जामनेर – टाकळी बुद्रुक येथे दुर्दैवी घटना – 43 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामनेर तालुक्यातील टाकळी (बुद्रुक) गावात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास भीषण घटना घडली. गावातील निलेश मुरलीधर माळी (वय ४३) या व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून, ही घटना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत निलेश माळी आपल्या काही मित्रांसह गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला पाण्यातून वर येता आले नाही आणि त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर मित्र व ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

Read More

भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवस हा दुहेरी संयोग

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर यानिमित्त जामनेर शाखेचे सर्व पदाधिकारी जळगाव जवळील दीपस्तंभ फाउंडेशनच्या “मनोबल प्रकल्पाला” भेट देऊन सदर प्रकल्पाला ₹ 11000 चा धनादेश देऊन मदत केली. देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती असल्यास सढळ हाताने मदत करणारे संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलालजी मुथा सरांना आतापर्यंत खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.मुथा सरांनी वाघोली येथे भूकंपग्रस्त, अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य यांच्यासाठी निवासी वसतिगृह आणि 1 ली ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण पूर्ण करू शकतात अशी सुविधा केली आहे.आजपर्यंत 4500 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मनोबल हा भारतातील पहिला पूर्ण निवासी प्रशिक्षण प्रकल्प आहे, जो स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मोफत कोचिंग पुरवतो.विशेषत: दिव्यांग व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, ट्रान्स युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जळगावपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात सुमारे 3 एकर (1,00,000 चौरस फूट) परिसरात हा प्रकल्प वसलेला आहे.आजपावेतो 1,385 पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी, 224 अनाथ विद्यार्थी, आणि 3,940 आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आधार देऊन स्वयंरोजगार,शासकीय नोकऱ्या आणि खाजगी क्षेत्रात रोजगार, अशा प्रकारे प्रभावी करिअर मार्गदर्शन देण्यात येतो. सदर कार्यक्रमात विनयजी पारख सर आणि सौ संगीता मंडलेचा यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बीजेसचे विनयजी पारख-राज्य उपाध्यक्ष,सुमित मुनोत-खानदेश उपाध्यक्ष, विकास कोठारी-जिल्हा उपाध्यक्ष, संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार-सदस्य,तसेच सौ संगीता मंडलेचा-महिला जिल्हा सचिव,सौ मनीषा कोठारी-सदस्य,सौ वंदना चोरडिया-सदस्य,सौ जयश्री लोढा-सदस्य,मनोबलचे मातोश्री सुमती महाजन,राजेंद्र पाटील सर,सिद्धेश्वर देशमुख आणि कर्मचारी वर्ग आदी हे उपस्थित होते

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More
error: Don't Try To Copy !!