Headlines

वाकडी गरुड विद्यालयात शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न

शेंदूर्णी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) – शेंदूर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री व्ही. बी. पाटील सर होते. प्रारंभी अध्यक्ष तसेच श्री दीपकभाऊ परदेशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत सर यांनी केले.जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदर्शी राज्यकारभाराविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनी गीतगायनातून महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.उपशिक्षक श्री आर. एस. चौधरी सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची थोरवी वर्णन केली व कवितेद्वारे मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात श्री व्ही. बी. पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडत त्यांच्या आदर्श राज्यपद्धती, सर्वधर्मसमभाव व लोककल्याणकारी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. एम. भुरट सर व श्रीमती व्ही. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे. एम. नाईक सर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

बोदवड (प्रतिनिधी) – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेची जाणीव विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त करत एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मिठूलालजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. विकासभाऊ कोटेचा प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा उल्लेख केला. समाजहितासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य युवकांनी करावे, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. रक्तदानाचे वैज्ञानिक, सामाजिक व आरोग्यविषयक महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, रक्तदानामुळे शरीरातील रक्तनिर्मिती प्रक्रिया सक्रिय राहते आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची मदत मिळते. शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने पार पाडली. डॉ. कृष्णाई सोळंकी, डॉ. विद्या शिरसाट तसेच तंत्रज्ञ श्री. सागर पाटील, श्री. दीपक होनमाने, श्री. प्रदीप पाडवी, श्री. प्रभाकर पाटील व श्री. जगन्नाथ जाधव यांनी अत्यंत दक्षतेने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली. सर्व रक्तदात्यांची पूर्वतपासणी करून वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील यांनी केले. आयोजनासाठी डॉ. मनोज निकाळजे, प्रा. अजित पाटील, प्रा. तुषार सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर, प्रा. अखिलेश यादव, प्रा. शुभम चौधरी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना नंदवे व श्री. अतुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. रा.से.यो. स्वयंसेवक दीक्षा कोकाटे, दिव्या चौधरी, दिव्या वंजारी, रुची धांडे, संजना धांडे, प्राजक्ता दांदडे, अक्षय कोकाटे यांनी नोंदणी, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान दिले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची जिवंत अभिव्यक्ती आहे. युवकांनी वाढदिवस, जयंती किंवा राष्ट्रीय सण अशा विशेष प्रसंगी रक्तदान करून समाजाशी असलेली नैतिक बांधिलकी जपावी, असे आवाहन प्रा. नितेश सावदेकर यांनी केले.

Read More

पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) येथे उत्साहात शिवजयंती साजरी

पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) – पिंपरी नांदू ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच योगेश कोळी तसेच सदस्य भागवत पाटील, किशोर पेटारे, विशाल चौधरी, प्रतिभा निकम व दिनकर निकम यांच्या उपस्थितीत श्री हरी चौधरी व हरी कोळी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मधुकर भोई यांनी आरती केली तर अतुल चौधरी यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विनोद भोई, आजिनाथ कोळी, शांताराम चौधरी, प्रमोद भोई, चिंधूलाल भोई, वैभव भोई, रितेश कोळी, चेतन न्यावी, विजय कोळी, मयूर कोळी, गणेश कोळी यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत, ग्रामपंचायत शिपाई समाधान कोळी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

शेंदुणी येथे गरुड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जामनेर तालुक्यातील ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड’, शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.प्रमुख वक्ते हर्षल पाटील, संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, संस्थेचे सह सचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी नगरपंचायत स्विकृत सदस्य बापुसाहेब शांताराम गुजर, माजी उपसभापती (पंस,जामनेर) अण्णासो सुधाकर बारी, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, लोकमत प्रतिनिधि दिपक जाधव, पुण्यनगरीचे पत्रकार विलास आहेरे, लोकशाहीचे प्रतिनिधि ॲड देवेंद्र पारळकर, माजी उप-मुख्याध्यापक एच डी चौधरी, प्राचार्य आर एस चौधरी, उप-मुख्याध्यापक बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे एस जुबळे, विनोद पाटील, आदि उपस्थित.कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागत गिताने तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, ब्रम्हीभूत हरी प्रसाद महाराज, संस्थेचे विश्वस्त आचार्य गजाननराव गरुड, संस्थेचे प्रेरणास्रोत अण्णासो भास्कराव खंडेराव गरुड आदिंच्या प्रतिमांचे पुजन तसेच माल्यार्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी मान्यवरांचे प्रेमवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर एस चौधरी यांनी केले.विद्यार्थी मनोगत खुशी डामरे, अविनाश चव्हाण, अमोल चव्हाण यांनी करत शाळेबदल तसेच शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगत एल पी मोहणे यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव यांच्या वतीने गांधी विचार परीक्षेत जिल्ह्यात यश संपादन केल्याबद्दल सई मराठे, मानसी पाटील या विद्यार्थ्यांनींना पदक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.अतिथी मार्गदर्शन काकासाहेब सागरमल जैन यांनी करत मुलांचे मन जिंकून अनेक प्रेरणादायी उदाहणे दिली.प्रमुख वक्ते हर्षल पाटील यांनीही मुलांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत काॅफी पासून दुर रहा, अपयशाने खचुन जाऊ नका, भाषेमधील साम्यता, कला साहित्य यांच्याशी जोडलेले रहा, जगन तुमचे समृद्ध करा, शब्दांचे सामर्थ्य, बाजारामध्ये चातुर्याने पैसे कसे कमाऊ शकता आदी मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड विद्यार्थी यांनी काॅफी मुक्त परीक्षेला सामोरे जाण्याबाबत, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले, अपयशाने खचुन न जाता यशाची पहीली पायरी बनवा पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्याबाबत मागदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रंसचलन पी जी पाटील यांनी केले.शेवटी आभार डी बी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Read More

वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर

====================वाकडी.ता.जामनेर.दि.०३/०२/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Read More

जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे विज्ञान व भाषा प्रदर्शन उत्साहात संपन्न

जामनेर | प्रतिनिधीजैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी विज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, भाषाविषयक चार्ट, कविता तसेच सर्जनशील लेखन सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. मनोज कुमारजी कावडिया व संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. मयूर कावडिया प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषिक कौशल्ये तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Read More

माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!