दुभाजकावर धडकून कारने घेतला पेटगर्भवती पत्नीचा जळून मृत्यू ; पती जखमीअर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणीपहूर – वाकोद मार्गावर घडली दुर्घटना

पहूर ता जामनेर रस्ता दुभाजकावर धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि भडकलेल्या ज्वाळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर कारचालक पती जखमी झाल्याची दुर्घटना जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वर पहूर वाकोद दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .याबाबत अधिक माहिती अशी की , संग्राम मोरे ( रा . पूलमखेडा , ता . जि . बुलढाणा ) हे भुसावळ तालुक्यातील सासूरवाडीहून छत्रपती संभाजीनगरकडे पहूरमार्गे पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांच्यासह मारुती ग्रँड व्हिटारा कारने जात होते . दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची कार वाकोद नजीक येताच समोरच्या डिव्हाइडरवर धडकली .कार डिव्हायडर वर धडकताच मोठा आवाज झाला आणि क्षणात गाडीने पेट घेतला . काही कळायच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले . अशाच अवस्थेत वाहनचालक संग्राम मोरेबाहेर पडले मात्र कार मध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे ( वय २१ वर्षे ) या मात्र आगीच्या ज्वाळांनी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या . घटना घडतात महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील , परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व ये -जा करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . डॉ .राहुल निकम ,डॉ . जितेंद्र राजपूत ऋषिकेश भालेराव व सहकार्यांनी प्रथमोपचार केले .पुढील उपचारासाठी संग्राम पाटील यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे . मयत जान्हवी मोरे यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले . दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल निकम यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अग्निशमन दलाचे प्रयत्न –शेंदुर्णी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . वाकोद येथील रहिवाशांनी देखील टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट –दरम्यान पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली . अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी मार्च महिन्यात जान्हवी आणि संग्राम यांचा विवाह झाला होता . सुखी संसाराचे स्वप्न रंगवत लवकरच आपण आई होणार असल्याची चाहूल जान्हवी यांना लागली होती . मात्र दुर्दैवाने सहा महिन्यांचे बाळ उदरात असताना कारमध्येच अग्निज्वाळांच्या भडक्यामुळे जान्हवी मोरे यांची प्राणज्योत मालवली . कारमध्ये सीएनजी गॅस ?नेमका स्पोट कशामुळे झाला ? याबाबत घटनास्थळी वेगवेगळे तर्क लावले जात होते . कार सीएनजी गॅस इंधनावर होती की पेट्रोलवर याविषयी आरटीओ इन्स्पेक्शन मधून माहिती समोर येणार आहे . तथापि या घटनेमुळे पहूर आणि वाकोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Read More

जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न — नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय

जामनेर (प्रतिनिधी) :जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे, महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. या बैठकीस शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील, जिल्हा संघटक अशोकभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ खोडपे, डिके दादा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर शेठ सराफ, शहरप्रमुख निशामुद्दीन शेठ, नानाभाऊ जंजाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, सौ. ज्योत्स्ना विसपुते, ॲड. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा आणि जामनेर नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जामनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

निवडणुकांचा वाजला बिगूल 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला निकाल

1.आज पासून आचारसंहिता सुरू2.१० नोव्हेंबरला नामनिर्देशक पत्र भरता येणार.3.आयोगाच्या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतील.4.निवडणूक ईव्हीएम द्वारा होणार.5.१ कोटी ७ लाख ३हजार ५७६ मतदार हक्क बजावतील.6.दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार-आयोग7.१७ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख8.२ डिसेंबरला मतदान,३ डिसेंबरला मतमोजणी.9.मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप निवडणूक आयोग10.मतदारसंघ निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील*.11.२४६नगरपरिषदा ४२ नगरपंचायती निवडणुकांची घोषणा12.उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी तारीख २१ नोव्हेंबर २०२५13.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १७ नोव्हेंबर

Read More

देवदूत म्हणून धावला पंकज रक्तदान करून वाचविले 15 वर्षीय मुलीचे प्राण..

प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील गजानन कानळजे ‘रा. मोयखेडा दिगर यांची 15 वर्षाची मुलगी आजारी असल्याने रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होती उपचारादरम्यान तिला अर्जंट दुर्मिळ हे AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला प्लेटलेटची गरज होती परंतु संपूर्ण जळगाव मधील ब्लड बँक शोधून सुद्धा ब्लड मिळत नव्हती तेव्हा मात्र संपूर्ण परिवार हताश होऊन मुलीच्या वडिलांच्या व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आले आणि नातेवाईकांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून शोध सुरू केला एबी निगेटिव्ह रक्तगटाचा नातेवाईकांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये रक्तदाता हवाय असा मेसेज व्हायरल केला.जामनेर शहरातील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये अर्जंट एबी निगेटिव्ह रक्तदाता हवाय असा मेसेज पाळधी येथील तरुण पंकज धनगर याने बघितला कोणताही क्षणाचा विलंब न करतात्या मुलीच्या वडिलांना कॉल करून विचारणा केली असता त्या मुलीचे वडील ढसाढसा रडायला लागले व माझ्या मुलीला वाचवा असे विनवणी करू लागले तेव्हापंकज धनगर तात्काळ जळगाव येथील रेड क्रॉस ब्लड बँकेत जाऊन पंकज धनगर यांनी आपले अमूल्य रक्तदान करून त्या मुलीचे प्राण वाचवले.यावेळी कमलाकर पाटील,नितीन धनगर,सर्व रेडक्रॉस ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते.पंकज हा देवदूत म्हणून वेळेवर आला व मुलीचा जीव वाचवला या मदतीवरून माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ झाला असेच म्हणावे लागेल.त्या मुलीला अजून पाच AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला रक्तदाता हवाय कुणी एबी निगेटिव्ह रक्तदाता असेल त्यांनी डॉ देवानंद सरताळे 8975661500 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Read More

पोलीस यंत्रणा कोमात,लोहारा परिसरात अवैध धंदे जोरात

प्रतिनिधी(गजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरालोहारा गावासह ग्रामीण भागातील गावोगावी अवैध धंदे जोरात सुरू आहेत, सट्टा,पत्ता,विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे. अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. गावामध्ये भांडण तंटे , मारामाऱ्या , दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. लोहारा गावात गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे पोलीस लक्ष देत नाही कारण त्यांचे फक्त हप्ते वसुलीवर लक्ष असते. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सट्टा पिढीचे,गावठी दारूचे दुकाने मोठ्या ताटात थाटले आहेत, पोलिसांना वेळेवर हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा सूर सर्वसामान्य जनतेमधून निघत आहे.सट्टा,गावठी दारूमुळे युवा पिढी बरबाद होतेय, तरुण मुले बापाच्या अगोदर स्वर्गवासी होत आहेत त्यांच्या घराचा आधार हिरावला जात आहे लोहारा दूर क्षेत्रामध्ये असलेले पोलीस कर्मचारी फक्त हप्ते घेण्यासाठी असतात का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे. लोहारा गावात आतापर्यंत झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास का लागत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. लोहारा परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी लोहारा परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर,समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळेआर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More
error: Don't Try To Copy !!