Headlines

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

जळगावात पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळा; कायदा-सुव्यवस्थेला बळकटी

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.[10:03 am, 9/4/2026] Kiran Jio Number: मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

जामनेर – जिवन कसे जगावे हे शिक्षक शिकवितात – प्रा.चंद्रकांत डागा- जामनेर येथे 37शिक्षक व 4 समाजसेवी यांचा केला सत्कार – भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

जामनेर(वा.)- शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर सामाजिक व कौटुंबिक समज देऊन जिवन कसे जगावे याचे मार्गदर्शन ही शिक्षक करतात असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष निवृत्त प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.ते येथील महावीर भवनमध्ये संघटनेच्या गुरू दक्षिणा फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत शिक्षा सारथी सन्मान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन ओसवाल संघाचे अध्यक्ष व प्रायोजक ईश्वरलाल कोठारी होते.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्र व सरस्वती पूजनाने झाली. एकूण 37शिक्षक व 4समाजसेवी यांचा सत्कार केला गेला.प्रा.डागा म्हणाले, शिक्षक दिननिमित्त आमच्या,आमच्या मुलांचा,आचार्यांचा,आई- वडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस.त्यांना बोलवून त्यांचा सन्मान करणे, त्यांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेणे व पुढील पिढीला गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण यातुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.प्रा.डागा संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल्स,नव दंपत्ती सक्षमीकरण, दिल का जिगशॉ,परिणय पथ, एमएसएमई,अल्पसंख्याक कार्यशाळा, ईडब्ल्यूएस,कौटुंबिक लवाद आदि चालत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन,ते राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जामनेर ता.एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धाडीवाल म्हणाले, गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जिवन नाही. अध्यापन हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे. जे पडद्यामागे कार्य करतात अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणले पाहिजे.महिला जिल्हाध्यक्ष सोनल कोठारी,शिक्षक विजय सेतवाल,उमेश बेदमुथा, संजय भुरट यांनी मनोगत व्यक्त केले.**या शिक्षकांचा झाला सन्मानरामचंद्र सैतवाल,सुदर्शन सैतवाल,प्रिती संघई,नितीन सैतवाल मिलिंद वास्कर, अनंत अरतकर,प्रा.राहुल शिंपी,अजय जैन,आरती सुदर्शन सैतवाल,शिल्पा कारंजकर, संदीप वाशिमकर,कविता वाशिमकर,तुषार जैन,निकिता अरतकर,रोहिणी शिंपी, कोमल चतुर,निकिता सुर्यवंशी,मंदाकिनी छाजेड, छगणलाल छाजेड, डॉ.दिपक सिसोदियामनीषा कोठारी,वंदना चोरडिया,आरती लोढा, मयूर भुरट,रूपल भुरट,मयूर संकलेचा,अतुल साबद्रा,सविता बोहरा,डॉ श्वेता राका,उमेशजी बेदमुथा,रीना चंडालिया, सारिका चोपडा,दिपाली चोरडिया,सोनाली सिसोदिया,ईश्वर चोरडिया,संजय भुरट,प्रा.चंद्रकांत डागासमाजसेवी ईश्वरलाल साबद्रा,महेंद्र नवलखा,प्रकाश सैतवाल,पारस ललवाणी आदींचा सत्कार शाल,सन्मानपत्र व माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.सोनाली सिसोदिया तर आभारप्रदर्शन सचिन चोपडा यांनी केले.ओसवाल संघाचे मंत्री डॉ.कांतीलाल ओसवाल,संघटनेचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा,सचिव संकल्प लोढा,सह सचिव आदित्य मंडलेचा, उपाध्यक्ष दर्शन भुरट,महिला सदस्य भावना बोहरा,प्रोजेक्ट हेड विकास ललवाणी,वैभव छाजेड,सौ मनिषा कोठारी,सौ वंदना चोरडिया आदी सदस्य उपस्थित होते.

Read More

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली. या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस

वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.

Read More

खान्देशचा झेंडा थेट ‘बिगबॉस मराठी ६’ मध्ये; शेंदुर्णीचा अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत यांची ऐतिहासिक एन्ट्री

शेंदुर्णी (ता. जामनेर | जि. जळगाव) –कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या मातीतून घडलेल्या एका कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मनोरंजन मंचावर झेप घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर ओळख मिळवून देणारे खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश करत संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सिझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून आलेला कलाकार अहिराणी भाषेचा अभिमान जपत मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातून कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन कुमावत आजही आपल्या गावाशी, मित्रपरिवाराशी घट्ट नाळ जपून आहेत. साधेपणा आणि मातीशी नातं टिकवून ठेवणं हीच त्यांची ओळख आहे.सन २००५ मध्ये ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी सुपरहिट ठरली आहेत.विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत अहिराणी–मराठी संगीत क्षेत्रात नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियनहून अधिक (१२० कोटींपेक्षा जास्त) व्ह्यूज मिळाले असून, ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा ते पहिले खान्देशी कलाकार ठरले आहेत.आतापर्यंत २५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडीओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली यांसारख्या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास थेट बिगबॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा Reel Star Award यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सचिन कुमावत यांच्या कारकिर्दीत बिगबॉस मराठी हे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.सचिन कुमावत यांची ही एन्ट्री केवळ एका कलाकाराचे यश नसून, संपूर्ण खान्देश आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

बोदवड (प्रतिनिधी) – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेची जाणीव विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त करत एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मिठूलालजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. विकासभाऊ कोटेचा प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा उल्लेख केला. समाजहितासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य युवकांनी करावे, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. रक्तदानाचे वैज्ञानिक, सामाजिक व आरोग्यविषयक महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, रक्तदानामुळे शरीरातील रक्तनिर्मिती प्रक्रिया सक्रिय राहते आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची मदत मिळते. शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने पार पाडली. डॉ. कृष्णाई सोळंकी, डॉ. विद्या शिरसाट तसेच तंत्रज्ञ श्री. सागर पाटील, श्री. दीपक होनमाने, श्री. प्रदीप पाडवी, श्री. प्रभाकर पाटील व श्री. जगन्नाथ जाधव यांनी अत्यंत दक्षतेने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली. सर्व रक्तदात्यांची पूर्वतपासणी करून वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील यांनी केले. आयोजनासाठी डॉ. मनोज निकाळजे, प्रा. अजित पाटील, प्रा. तुषार सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर, प्रा. अखिलेश यादव, प्रा. शुभम चौधरी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना नंदवे व श्री. अतुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. रा.से.यो. स्वयंसेवक दीक्षा कोकाटे, दिव्या चौधरी, दिव्या वंजारी, रुची धांडे, संजना धांडे, प्राजक्ता दांदडे, अक्षय कोकाटे यांनी नोंदणी, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान दिले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची जिवंत अभिव्यक्ती आहे. युवकांनी वाढदिवस, जयंती किंवा राष्ट्रीय सण अशा विशेष प्रसंगी रक्तदान करून समाजाशी असलेली नैतिक बांधिलकी जपावी, असे आवाहन प्रा. नितेश सावदेकर यांनी केले.

Read More
error: Don't Try To Copy !!