Headlines

धक्कादायक! मंत्री आदिती तटकरे यांच्या PRO आशिष मेटे यांचा अचानक मृत्यू; जेवणानंतर शतपावली करताना कोसळले

मुंबई | प्रतिनिधीमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी संबंधित जनसंपर्क अधिकारी (PRO) आशिष मेटे (वय ३०) यांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.जेवणानंतर अचानक कोसळलेमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशिष मेटे हे भांडुप परिसरातील एका इमारतीत जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांना ॲसिडिटीचा त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. त्यानंतर ते इमारतीच्या आवारात शतपावली करण्यासाठी चालत होते.शतपावली करत असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. खाली पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच उपस्थितांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाहीआशिष मेटे अचानक का कोसळले आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक वृत्तांमध्ये ॲसिडिटीचा त्रास जाणवल्याचा उल्लेख आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंदघटनेची माहिती मिळाल्यानंतर भांडुप पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची तसेच संबंधित परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.राजकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळआशिष मेटे हे मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी संबंधित जनसंपर्काचे काम पाहत होते. माध्यमांशी समन्वय साधणे आणि प्रसिद्धीविषयक कामकाजात त्यांची भूमिका होती. अवघ्या ३०व्या वर्षी त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय तसेच माध्यम क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात अचानक झालेल्या या मृत्यूने परिसरातही शोककळा पसरली आहे.आशिष मेटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून, भांडुप पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Read More

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद; आरोपी किरण गायकवाडला बीडमधून अटक

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद; आरोपी किरण गायकवाडला बीडमधून अटक बीड | प्रतिनिधीसमृद्धी महामार्गावर झालेल्या दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या किरण गायकवाड याला पोलिसांनी बीडमधून अटक केली आहे. आरोपीचा फोटोही आता समोर आला असून, या कारवाईमुळे दरोड्याच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.समृद्धी महामार्गावर दरोड्याची ही घटना घडली होती. महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनाला अडवून प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान किरण गायकवाड याचा या दरोड्याशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.या दरोड्यामागे नेमकी किती जणांची टोळी आहे, या टोळीतील इतर आरोपी कोण आहेत आणि यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.दरम्यान, मुख्य सूत्रधाराला अटक झाल्याने या प्रकरणातील इतर आरोपींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोलिसांना मोकळा झाला आहे. आरोपीकडून दरोड्याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून, पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Read More

मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त 15 वा जागतिक क्रीडा दिन साजरा

शेंदुर्णी – येथील आप्पासाहेब आर. बी. गरुड महाविद्यालयाच्या मैदानावर मेजर ध्यानचंद यांची 121 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये तीन संघांनी सहभाग घेतला होता.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. बी .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सोयगाव येथे असलेले शिक्षक विशाल निकम हे लाभले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून माजी विद्यार्थी तुषार चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी 30 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे इतर विद्यार्थीही मोठया संख्येने उपस्थित होते. क्रीडा संचालक प्रा. डॉ. महेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Read More

आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार उपक्रम उत्साहात संपन्न

जामनेर :- आज दिनांक २९ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आनंददायी शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच स्वच्छ शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत स्वच्छता उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि आनंदातून शिकण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत झाली. मुख्याध्यापिका नजराना मॅडम व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन

अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव (Fire Disaster Mock Drill) आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रात्यक्षिक सरावामुळे विद्यार्थ्यांना आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने, प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे प्रतिसाद देण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी, आत्मविश्वास आणि व्यावसायिक क्षमता वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही वेळी उद्भवू शकते. अशा वेळी रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, तातडीने प्राथमिक उपचार देणे, सुरक्षित स्थलांतर करणे, आपत्कालीन पथकांशी समन्वय साधणे आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, यामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिक सरावादरम्यान विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेची मूलभूत तत्त्वे, आपत्कालीन प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अलार्म देणे, संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे, नागरिक व रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करणे, घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळणे आणि बाधित व्यक्तींना तातडीने प्राथमिक उपचार देणे, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये बाधित व्यक्तींना रुग्णवाहिकेद्वारे सुरक्षितपणे रुग्णालयात हलविणे आणि रुग्णालयात आवश्यक आपत्कालीन उपचार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचाही समावेश करण्यात आला. सुरुवातीच्या आपत्कालीन प्रतिसादापासून सुरक्षित स्थलांतर, रुग्णवाहिकेद्वारे वाहतूक आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारापर्यंतच्या विविध टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार तसेच विविध विभागांमधील प्रभावी समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिक सरावात उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रदर्शन केले. या उपक्रमातून संघभावना, प्रभावी संवाद, नेतृत्वगुण, तत्पर निर्णयक्षमता तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सहाय्यक पथकांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची तसेच रुग्णांची सुरक्षितता कशी राखावी, संभाव्य धोके कसे ओळखावेत आणि परिस्थितीला नियोजनबद्ध पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत आत्मविश्वास मिळाला. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील दुवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सरावाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (वैद्यकीय) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. सतीश मोरे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल; डॉ. मयुरी वाळुंज, कॅज्युअल्टी ऑफिसर (अपघात व आपत्कालीन विभाग अधिकारी) आणि श्री. आंबोरे, सुरक्षा अधिकारी यांचे सहकार्य व मोलाच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. हा कार्यक्रम प्रा. डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्य आणि प्रा. डॉ. योगिता औताडे, उपप्राचार्य तथा विभागप्रमुख, समुदाय आरोग्य परिचर्या विभाग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अमोल टेमकर, प्रा. अमित कडू, सहयोगी प्राध्यापक श्री. निलेश म्हस्के, श्री. राहुल कडू, श्री. विशाल पुलाटे आणि श्री. प्रशांत अम्ब्रीत यांनी मॉक ड्रिलचे प्रभावी समन्वय व आयोजन केले. अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव हा बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि अनुभवसमृद्ध उपक्रम ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद याबाबत जागरूकता वाढली. त्याचबरोबर अशा परिस्थितीत आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये, आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. भविष्यातील परिचारिका म्हणून विद्यार्थ्यांना आपत्कालीन व आपत्तीजन्य परिस्थितीत सक्षमपणे कार्य करता यावे आणि रुग्ण तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी योगदान देता यावे, यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक विकासासोबतच गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित आरोग्यसेवा देण्यासाठी महाविद्यालयाची ही वचनबद्धता निश्चितच कौतुकास्पद आहे.

Read More

1)पाण्यात पोहण्यासाठी उतरले अन् काळाने घातला घाला; रेतीबंदर खाडीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू 2)तानसा नदीत दोन सख्ख्या भावांचा अंतदुसरी हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे घडली.

ठाणे | प्रतिनिधीठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या रेतीबंदर खाडी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ गेले होते. यावेळी तिघेही खाडीत पोहण्यासाठी उतरले.मात्र खाडीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधमोहीम सुरू केली.सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यात नदी, खाडी, धरणे आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली असते. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read More

🕉️ तिसरा श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग!

जामनेरच्या सोमेश्वर महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला जामनेर | प्रतिनिधी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी असा विशेष धार्मिक योग सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जुळून आला. या शुभ पर्वानिमित्त जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. भाविकांनी भगवान सोमेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून बेलपत्र, फुले आणि इतर पूजासाहित्य अर्पण केले. अनेक भाविकांनी उपवास ठेवून मनोभावे महादेवाचे दर्शन घेतले. 🔱 सोमेश्वर मंदिरात भक्तीमय वातावरण जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. श्रावण महिन्यातील सोमवार तसेच महाशिवरात्रीच्या काळात मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने मंदिर परिसरात विशेष उत्साह पाहायला मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच लहान मुलांसह अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून महादेवाची पूजा केली. भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. 🙏 संकष्टी चतुर्थीमुळे दुहेरी भक्तीचा योग याच दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने गणेशभक्तांसाठीही आजचा दिवस विशेष ठरला. भगवान शिव आणि श्री गणेश या दोन्ही देवतांची आराधना करण्याचा योग आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कुटुंबाचे सुख, आरोग्य, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविकांनी प्रार्थना केली. 🌺 ‘हर हर महादेव’ने दुमदुमला परिसर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अभिषेक, पूजाअर्चा आणि आरतीच्या वेळी मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. श्रावणातील या पवित्र दिवसाचा लाभ घेत अनेक भाविकांनी सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान अनुभवले. श्रावणातील तिसरा सोमवार आणि संकष्टी चतुर्थीच्या या शुभ संयोगामुळे जामनेरच्या सोमेश्वर महादेव मंदिरात दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Read More

आठवणींच्या भिंतीवर आयुष्य हा शब्द वाचण्यापेक्षा… तो जगण्यात खरी मजा आहे!

आठवणींच्या भिंतीवर आयुष्य हा शब्द लिहिणं खूप सोपं असतं; पण त्या शब्दामागे असलेलं आयुष्य खरंच जगणं, त्यातील प्रत्येक क्षण मनापासून अनुभवणं आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकणं, हे च खरं आयुष्य असतं. आपल्या आयुष्यात अनेक दिवस येतात आणि निघून जातात. काही दिवस आनंद देतात, काही डोळ्यांत पाणी आणतात, तर काही दिवस आपल्याला आयुष्यभरासाठी एखादा धडा देऊन जातात. काळ पुढे जात राहतो आणि शेवटी उरतात त्या फक्त आठवणी. पण प्रश्न असा आहे की, उद्या आठवणींच्या भिंतीकडे मागे वळून पाहताना आपल्याला काय दिसणार आहे? फक्त जगण्याची धावपळ…की मनापासून जगलेले काही सुंदर क्षण? आज आपण अनेकदा ‘उद्या’च्या विचारात ‘आज’ हरवून बसतो. थोडं अजून कमावू, मग फिरायला जाऊ… थोडं स्थिर होऊ, मग मनासारखं जगू… वेळ मिळाला की कुटुंबासोबत बसू… अशी अनेक कारणं देत आपण वर्तमान पुढे ढकलत राहतो. पण आयुष्याला ‘नंतर’ नावाचा कोणताही हमखास दिवस मिळत नाही. म्हणूनच आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेण्याचं नाव नाही; तर प्रत्येक श्वासाचा अर्थ शोधण्याचं नाव आहे. आपल्या माणसांसोबत मनापासून हसणं, एखाद्या मित्रासोबत अचानक केलेली भटकंती, आई-वडिलांसोबत घालवलेला निवांत वेळ, मुलांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होणं, पावसात भिजताना मनमोकळं हसणं, निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण स्वतःसोबत घालवणं… हेच तर आयुष्य आहे. महागड्या वस्तू, मोठं घर, पैसा आणि प्रसिद्धी यांची किंमत नक्कीच आहे; पण शेवटी मनाला समाधान देतात त्या वस्तू नव्हे, तर त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी. कधी कधी एखादा जुना फोटो हातात येतो आणि आपण काही क्षणांसाठी भूतकाळात जातो. त्या फोटोमध्ये कदाचित साधे कपडे असतात, साधं घर असतं, परिस्थितीही साधी असते; पण चेहऱ्यावर असलेलं समाधान मात्र आजच्या अनेक सुखसोयींपेक्षा मोठं वाटतं. कारण त्या क्षणी आपण जगलो होतो… फक्त दिवस ढकलला नव्हता. आयुष्याची खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर मनात साठवलेल्या सुंदर आठवणींमध्ये असते. म्हणून प्रत्येक दिवसाला एक सुंदर आठवण बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना ते आजच सांगा. ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना आजच फोन करा. ज्यांना भेटायचं आहे त्यांना आजच भेटा. कारण वेळ निघून गेल्यावर ‘काश…’ हा शब्द खूप मोठा वाटतो. आयुष्य खूप छोटं आहे. त्यात राग, अहंकार, गैरसमज आणि तक्रारींसाठी फारशी जागा नाही. मनातलं ओझं कमी करा, नात्यांना जपा, चुका माफ करा आणि स्वतःलाही माफ करायला शिका. कारण एक दिवस आपणही आठवणींच्या भिंतीवर उभे राहून आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणार आहोत. तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न असावा— “मी आयुष्य फक्त जगलो का… की खरंच अनुभवलं?” म्हणूनच… आठवणींच्या भिंतीवर ‘आयुष्य’ हा शब्द वाचण्यात नाही, तर त्या भिंतीवर सुंदर आठवणींचे रंग भरत जगण्यात खरी मजा आहे. आजचा दिवस पुन्हा मिळणार नाही.म्हणून तो तक्रारीत नाही, तर आनंदात जगा.लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय म्हणतं ते ऐका.कारण शेवटी लोकांच्या आठवणींपेक्षा आपल्या मनात उरलेल्या आठवणीच आपल्यासोबत राहतात. आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते सुंदर असणं महत्त्वाचं…आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी योग्य वेळ म्हणजे — ‘आज!’

Read More

जामनेरात रिपब्लिकन पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटनकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

जामनेर | प्रतिनिधी :जामनेर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.उद्घाटन कार्यक्रमाला रणजीत जोरे, गणेश सपकाळ, शेखर सुखाडे, यादव सुखाडे, विक्रम बनोडे, दादाराव मेहे, गोपाळ सपकाळ, नितीन सपकाळ, एकनाथ सपकाळ, प्रदीप लोखंडे पंचरासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जामनेर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Read More

रक्षा खडसेंकडून नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाची कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

राजकारणाच्या पलीकडे परिवाराचे नाते महत्त्वाचे; शरद पवारांच्या उपस्थितीने अमृत महोत्सवाला मिळाला मान भाजपमध्ये मी, राष्ट्रवादीत नाथाभाऊ; विचारधारा वेगळी असली तरी कौटुंबिक नाते कायम असल्याचे स्पष्ट भाजप आमदार गैरहजर राहिल्याची खंत नाही; आले आणि न आलेल्या सर्व नेत्यांबद्दल रक्षा खडसेंनी व्यक्त केला आदर बऱ्याच दिवसांपासून अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. हा अमृत महोत्सव एक परिवार म्हणून साजरा केला जात आहे. आज निखिल आपल्यात नाही, तरी प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांकडून असा उत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा असते. घरातील सदस्य म्हणून आणि निखिलच्या जागी मी आहे. नाथाभाऊंनी मला नेहमी मुलीसारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे, असे मी मानते. राजकारण वेगळे आहे आणि राजकारणाच्या पलीकडे परिवाराची एक जबाबदारी असते. त्यामुळे यावेळी सर्वांनी ठरवले की, नाथाभाऊंचा अमृत महोत्सव साजरा केला पाहिजे. नाथाभाऊंनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, राजकारणाच्या पलीकडे सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांची ओळख आणि संबंध आहेत. अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यासपीठावर यावे आणि त्यांचा मानसन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. नाथाभाऊंसोबत अनेकांनी काम केले आहे. त्या निमित्ताने का होईना, त्यांचा उल्लेख आणि सन्मान झाला पाहिजे. याच अनुषंगाने सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे राजकारणाचा रंग देण्यात आलेला नाही. हा पूर्णपणे पारिवारिक संबंधातून आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध पक्षांचे अनेक नेते या ठिकाणी आले. प्रत्येकाला ज्या वेळी सोयीचे झाले, त्या वेळी ते येथे येऊन गेले. ही अमृतभूमी कोथळी ही आदिशक्ती मुक्ताईची भूमी आहे आणि याच भूमीत नाथाभाऊंचा जन्म झाला. त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईच्या आशीर्वादाने मी असो किंवा नाथाभाऊ असोत, आज मोठ्या पदावर राहून समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. हा मुक्ताईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे परिवारातील एक सदस्य म्हणून मी भागवत सप्ताहातही सहभागी झाले. ऑन : भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार कार्यक्रमाला उपस्थित नाही मला राजकारणावर बोलायचे नाही. मात्र, एवढेच सांगू इच्छिते की, मी किंवा आमच्या परिवारातर्फे प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले आहेत. कोणी येत आहे, तर कोणी येऊन गेले आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये राजकारणाचा कोणताही उल्लेख न करता सर्वांना निमंत्रण देण्याचे काम आम्ही केले. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तर काही जण प्रत्यक्ष येऊन गेले. ऑन : शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला सत्कार मला भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा संधी मिळाली. तीन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा मला अभिमान आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन मी या घरची सून आहे. त्यामुळे या संदर्भातील माझे कर्तव्य मी नक्कीच पार पाडत आहे. नाथाभाऊंची खूप इच्छा होती की, त्यांचा अमृत महोत्सव साजरा व्हावा. त्यामुळे परिवारातील सदस्य म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शेवटी काहीही झाले तरी हा आमचा परिवार आहे. आमचे एकमेकांशी असलेले नाते कोणापासूनही लपलेले नाही. हे सर्वांना माहीत आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मी भारतीय जनता पक्षात आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. त्यांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलेली आहे, तर मी भाजपची कार्यकर्ता आहे. भाजपने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवून आम्ही हा कार्यक्रम सर्वपक्षीय ठेवला आहे, जेणेकरून सर्वांचा मानसन्मान व्हावा. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी एक सून आणि परिवारातील सदस्य म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी हे सात दिवस मी परिवारातील एक सदस्य म्हणून काम करत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!