Headlines

शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण

शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

Read More

पहूर येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शासन योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत

पहूर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आधार आणि बँक खात्यांच्या लिंकिंगसह आधार अपडेट करण्याच्या सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शहर किंवा तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे हा प्रक्रिया वृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने उपसरपंच राजू जाधव यांच्या पुढाकाराने आणि तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या सहकार्याने हे शिबिर पहूर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिरावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. वासुदेव घोंगडे, सरपंच श्री. अब्बू तडवी, माजी उपसरपंच श्री. रवींद्र मोरे आणि श्री. चेतन रोकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा नागरे, श्रीमती पल्लवी सोळुंके, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री. भूषण राजपूत, श्री. आनंदा शिंदे व श्री. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष सेवा देत लाभार्थ्यांना आधार लिंकिंग, बँक खाते लिंकिंग आणि इतर प्रक्रिया समजावून सांगितल्या. या शिबिराला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शासनाच्या सेवा घरपोच मिळाल्याने समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानण्यात आले

Read More

राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.

मुबंई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगडसोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरमहेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहरयोगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूरबच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक,रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूरराकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीसउपदेश, बृहन्मुंबईअर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोलामंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूरराजातिलक रोशन – सहायक पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस उप, बृहन्मुंबईबाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघरपोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणयतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघरसौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेमोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गविश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक,रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती

Read More

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

Read More

समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या

मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन

गारखेडा (ता. जामनेर) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियान” दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राम मंदिर सभागृह, गारखेडा ता. जामनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, विविध शासकीय विभागांतर्गत येणाऱ्या जनतेच्या समस्या व तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात येणार आहे. या शिबिराचा गारखेडा महसूल मंडळातील तसेच संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Read More

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read More

श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !जळगाव —पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला. यावेळी नामदार गिरीश महाजन ,खा. श्रीमती स्मिताताई वाघ, आ. श्री. सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले.

Read More
error: Don't Try To Copy !!