Headlines

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार!

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार! मुंबई-विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आले. ते त्याच ठिकाणी पुन्हा बांधण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तोंडी संमती दिली आहे. यासोबतच जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांच्या अहिंसा रॅलीपुढे महापालिका प्रशासन नमले आणि सहायक महापालिका आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांची के-पूर्व प्रभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वप्नंज क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ वर्षांपूर्वी बांधलेले श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांनी अहिंसा रॅली काढली. अहिंसा रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तब्बल ४ किमी २ तास पायी चालत अंधेरी (पूर्व) येथील सहायक महापालिका आयुक्त कार्यालय गाठून निषेध व्यक्त केला. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि स्थानिक आमदार पराग अलवाणी (भाजप) हे जैन समुदायासह येथे उपस्थित होते. २७ वर्षे जुने जैन मंदिर का पाडण्यात आले, असा खडा सवाल गायकवाड आणि अलवाणी यांनी सहायक महापालिका आयुक्त पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करत जैन मंदिर पाडले. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. कारण पाटील जैन मंदिराचा मलबा काढून त्याच ठिकाणी पुन्हा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार देत होते. विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता मनपा अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि पुरातन ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. हा पूर्वनियोजित कट असून भाजप युतीचे ‘बुलडोझर सरकार’च त्यास जबाबदार आहे.-वर्षा गायकवाड, खासदार लवकरच शेड तयार होणार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विलेपार्ले येथील चारही जैन समुदायांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्याच ठिकाणी जैन मंदिर पुन्हा बांधून दिले जाईल. सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून अभिषेक व पूजा टीनच्या शेडमध्ये करण्यात येणार आहे. भाविकांसाठी लवकरच हे शेड तयार केले जाईल.-श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवआपल्या जिद्दीला साथ माणुसकीची!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली एक स्तुत्य उपक्रम जामनेर येथे राबविण्यात आला. सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभाग, एस.आर. ट्रस्ट (मध्यप्रदेश), ALIMCO आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे आणि तात्काळ वितरण करण्याचे शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर येथे संपन्न झाले. या उपक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम अवयव वाटप केले. आधुनिक तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड मिळाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही एक अत्यंत भावनिक आणि गौरवाची अनुभूती असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.या उपक्रमात अनेक दिव्यांगांना तात्काळ अवयव आणि सहाय्यक उपकरणे मिळाली, ज्यामुळे त्यांना आयुष्याला नव्याने सुरुवात करता येणार आहे. मंत्री महाजन यांनी आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील काळात असे उपक्रम अधिक ठिकाणी राबवण्याचे आश्वासन दिले.या अभिनव उपक्रमातून समाजात दिव्यांगांविषयी जागरूकता निर्माण होत असून, त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही खुला होत आहे.

Read More

आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश

‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज ₹1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 1027 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी 527 सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही, मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला, जेणेकरून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात, पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा, पक्की घरे, मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओटॅगिंग, बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर, नाशिक, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ताधिकारांचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (PM DA-JGUA) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार 32 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय शिक्षणविषयक धोरणाचा भाग म्हणून, राज्यातील 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेऊन, अंबरनाथ, वर्धा व पालघर येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भविष्यातील विस्तारासाठी किमान 20 एकर क्षेत्र राखीव ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. अशोक ऊईके, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

Read More

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर.कोणाचे उघडणार नशीब,तर कोणाचे खेळ बिघडणार.

जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.

Read More

जळगाव येथे सूर्या फाऊंडेशन आयोजित खान्देश करिअर महोत्सवात राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्था पुरस्कार प्रदान

जळगाव येथील जी.एस.ग्राउंड मैदानावर सूर्या फाऊंडेशन यांच्यावतीने खान्देश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था,शिक्षक,महिला यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक,शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण,आरोग्य,महिला बाल विकास युवा कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.भगवानसिंग डोभाळ यांच्या राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेच्यावतीने कोषाध्यक्ष श्री गणेश शिवसिंग डोभाळ,राजकुंवर कॉलेज फर्दापूरचे उपप्राचार्य डॉ अंबरसिंग बेडवाल, प्रा.ईश्वर चोरडिया हे उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवानसिंग डोभाळ ,सचिव सौ संगीता डोभाळ,प्रशासकीय अधिकारी श्री अमित राजपूत, यांच्यासह संस्थेचे सदस्य सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान

*जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान …*जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर, दि. ६ एप्रिल – ग्रामीण भागातील विकासाच्या वाटचालीत झपाट्याने प्रगती करत टाकली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील S4G हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिनेअभिनेता महेशदादा देवकाते पाटील, सिनेअभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे आणि प्रांजली पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गावात स्वच्छता, पाणी योजना, हरित ग्राम संकल्पना, ग्रामसडक योजना, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकास आदी क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार हे या सन्मानामागचे मोलाचे कारण ठरले.या गौरवाने टाकली खुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तसेच जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सरपंच जितेंद्र माळी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल बोलताना सरपंच माळी म्हणाले, हा सन्मान संपूर्ण टाकली खुर्द गावासाठी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबवणार आहे.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार*

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार* जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरसावळदबारा प्रतिनिधी -जबार एस तडवी गुणवंत्त विध्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यासाठी अभ्यास करणे ही काळाची गरज. प्रा नारायण कोलते पा.सविस्तर वृत्त असे की जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा येथील वर्ग दहावीची सन फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेली अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अतिशय तन-मन-धनाने शिक्षण घेणारी व वर्ग दहावीला 93.80 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली कुमारी दिव्या रावसाहेब सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता गुणरत्न पुरस्कार सन 24-25 मध्ये विशेष जिल्हा सामाजिक विभाग समाज कल्याण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आज रोजी विद्यार्थिनीचे पालक या नात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व सर्व सहकारी शिक्षक यांच्यामार्फत तिच्या पालकांना देण्यात आला हा पुरस्कार प्राप्त करणारी विद्यालयाची पहिली महिला विद्यार्थिनी मानकरी ठरली आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे चेक द्वारे तिला 5000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल तिच्या पालकांनी व गावकऱ्यांनी संस्थेचे विद्यालयाचे विशेष आभार मानले. पुरस्कार देताना प्राचार्य कोलते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही सुद्धा या पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात फक्त शिक्षण मन लावून आत्मसात करा आपली संपूर्ण विद्यार्थी दशेचे आयुष्य हे अभ्यासासाठी समर्पित करा आपोआपच यश तुमच्या पायथ्याशी लोळण घेईल त्यासाठी तुमच्या अंगामध्ये अभ्यास करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास हा ठासून भरायला पाहिजे तरस तुम्ही यश मिळू शकता याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्या सदाशिवे आपल्या शालेय जीवनात या विद्यार्थिनी कधी शाळेला दांडी मारली नाही दररोज शाळेत येऊन नियमित अभ्यास करणे शाळेतील सर्व शालेय उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे व उत्कृष्ट अशा निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने पारितोषिक मिळवले आहे घरची परिस्थिती अतिशय हलाकीची वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले पण आपल्या आईनी मोलमजुरी करून या विद्यार्थिनीला शिक्षण दिले वतीने आपल्या आईच्या मेहनतीचे पारणे फेडले. आज छत्रपती संभाजी नगर सारख्या देवगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे केवळ स्वतःचा आत्मविश्वास व जिद्द याच्या भरोशावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करीत आहे मित्रांनो आपल्या एवढ्या ग्रामीण भागात व खेड्यात सुद्धा गुणवत्ता व गुण रत्न विद्यार्थी घडू शकता असे प्राचार्य नारायण कोलते यांनी दैनिकाशी बोलताना मनोगत व्यक्त केले रोख रक्कम पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे पालक व भाऊ पालकांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संचालक मंडळ तसेच शाळेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षक भास्कर ससाने विकास पाटील, विजय सिंग राजपूत, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाट, भूषण देसले भास्कर ससाने, पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड विनोद जाधव संजय जोशी जीवन कोलते अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते व विद्यार्थी पालक पत्रकार बंधू उपस्थित होते.अशी माहिती प्रा जीवन कोलते यांनी दिली

Read More

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यशजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवराष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे . प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी .१) यश अनिल डोंगरे२) निशा गजानन पाटील३) प्राची प्रवीण पाटील४) नेहा उल्हास पाटील५) सोनल मनोज भामरे६) सृष्टी नंदू शेळके७) अंकिता योगेश पाटील८) रितिका रवींद्र पाटील९) दिशा नंदकिशोर सुरळकर१०) भावेश गणेश काठोटेसर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी महाजन सर समिती प्रमुखश्री डी एच परदेशी सरसहप्रमुख श्री सी यू पानपाटील सर वश्री व्ही ए पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व गुणवंतांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील व सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले

Read More

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)हीवरखेडा तवा. तालुका जामनेर येथे गोसावी बंधवामार्फत कन्या पूजनाची प्रथा अकरा वर्षापासून सुरू आहे. शुक्रवारी कन्या पूजन करण्यात आले . या निमित्त वैष्णवी देवी भंडाराची प्रथा सुरू ठेवली आहे नऊ अविवाहित मुलींचे पाय पाण्याने व दुधाने धुतले जातात पूजन करून पायाचे पाणी प्रसाद म्हणून पिण्याची प्रथा आहे जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे. त्यामुळे पूजन करून त्यामुळे पूजन करून कन्याची गावभर मिरवणूक काढल्या जाते. गावातील व बाहेर गाव वरून आलेले भाविक दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी पुजारी अनिल चव्हाण,सुनील चव्हाण, मुकेश चव्हाण,धीरज चव्हाण,राज चव्हाण,रामेश्वर चव्हाण,आशिष चव्हाण इ. असतात.

Read More
error: Don't Try To Copy !!