Headlines

पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल — नामदार गिरीश भाऊ महाजन.

जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव.

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव..जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर“१०,००० शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती आणि प्रोत्साहन” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे श्री.दिपक अग्रवाल सर,IAS, MD, (नाफेड) यांच्या हस्ते श्री. रोहन लोखंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री. प्रदिप महाजन, चेअरमन यांना सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत जामनेरच्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. नाफेड आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे कामकाज विविध क्षेत्रात सुरू आहे. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यानी बांबू लागवड व विविध कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करुन कृषी क्षेत्रात क्रांतीसाठी हातभार लावावा असे प्रतिपादन श्री. अग्रवाल यांनी केले. यावेळी गोपद्म कंपनीला शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाफेड कडून ‘नाफेड बाजार’ या त्यांच्या शाॅंपिग माॅल सुरू करणेस परवानगी पत्र देण्यात आले. यावेळी नाफेडने तयार केलेल्या देशातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० ‘एफपीसींना गौरवण्यात आले. या सन्मान सोहळावेळी पंकज प्रसाद, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, अनुराग तिवारी, महाव्यवस्थापक, पुजा टमटा, व्यवस्थापक, लिजा भटाचार्य,मोहनजी, व्यवस्थापक,इक्विटी अनुदान,व देशभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read More

राज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक

जामनेर पंचायत समितीचा राज्यात नावलौकिक 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले जामनेर प्रतिनिधीराज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक जामनेर पंचायत समिती दुहेरी पुरस्कार ने सन्मानित गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समितीचं घवघवीत यशसविस्तर..जामनेर (जि. जळगाव) पंचायत राज संस्थांमधील उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात जामनेर पंचायत समितीने राज्यभरात आपला ठसा उमटवत मोठे यश संपादन केले आहे. वर्ष 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले आहेत.ग्रामविकास, प्रशासन व्यवस्थापन, नवोपक्रम, पारदर्शकता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेत ही निवड केली गेली. जामनेर पंचायत समितीने या सर्वच निकषांवर आपली ठसा उमटवत इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.या यशामागे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे कुशल नेतृत्व, समर्पित अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींचा व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जामनेर तालुक्याचा विकास मार्ग सुकर झाला असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक नवे पर्व सुरू झाले आहे.या दणदणीत यशामुळे जामनेर तालुक्याचा राज्यस्तरीय नावलौकिक वाढला असून, पुढील वाटचालीसाठी एक भक्कम पायाभूत आधार मिळाला आहे

Read More

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार जामनेर (ता. जामनेर) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान आणि नियोजित होणार आहे. या प्रणाली अंतर्गत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी कार्यालयात लावलेल्या QR कोड स्कॅन करून, आपल्या भेटीचा उद्देश व आवश्यक तपशील भरायचा आहे. यामुळे भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात होणार असून, कामकाज अधिक सुकर व कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेट अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली शासनाच्या “गतीमान व पारदर्शक सेवा” या ध्येयाशी सुसंगत होणार आहे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे मार्गदर्शनातून सदर योजनेची अमलबजावणी श्री नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर यांनी केली आहे. — तहसिल कार्यालय, जामनेर

Read More

पाळधी जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शैलेश पाटील, व तुळशीराम वाघ होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की शिक्षणात कधीही खंड पडू देऊ नका.आई वडिलांचे,आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.ते पुढे म्हणाले तुम्ही डॉक्टर ,इंजिनियर,शिक्षक, व्यवसायिक बना,जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा.मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी एक चांगला माणूस बना अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.शाळेतील शिक्षक चंदन राजपूत, संभाजी हावडे, सतीश बावस्कर, जितेंद्र नाईक, अमित मुंडे,मगंला धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोंबे, सदस्य मनोज नेवे,नाना माळी, गजानन राजपूत, विनोद पाटील,अशोक पाटील, विकास धनगर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Read More

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा…

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा… चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पूर्णविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा. *जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी) दि . २५/४/२०२५ रोजी मांडवे बु. तालुका जामनेर येथे डॉ. राजेश सोनवणे (तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर) यांच्या सूचनेनुसार व श्री.अण्णा जाधव (तालुका हिवताप पर्यवेक्षक), श्री.विक्रमसिंग राजपूत (आरोग्य सहाय्यक वाकडी) यांच्या मार्गदर्शनाखाली २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला व उपस्थित डॉ. वैभव पाटील (स.आ.अधिकारी) व श्री. हेमंत पाटील (आरोग्यसेवक) यांनी हिवतापाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन खालील प्रमाणे केले. हिवताप हा किटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. भारतात प्लाझमोडियम व्हायव्हँक्स व प्लाझमोडियम फँल्सीफेरम हे दोन प्रकारचे रोगजंतु आढळतात. या रोगाचे प्रमुख खाद्य हे मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन आहे. या रोगजंतुमुळे हिवताप हा आजार होतो. हिवताप आजाराचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले होते व त्यावर योग्य तो उपचार माहित नसल्यामुळे त्यावेळी हिवतापामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. सर्वप्रथम सन 1889 मध्ये डाँ.सर रोनाल्ड राँस यांनी रोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार देणे शक्य होऊन हिवतापामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी झाली. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणुन जगभरात साजरा केला जातो. हिवतापाचा प्रसार अँनाफेलीस ह्या जातीच्या डासांच्या मादींमार्फत होतो.ह्या मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांत पाण्याच्या टाक्या,हौद,डबके,नारळाच्या करवंट्या,कुलर,टायरे,फुलदाण्या आदी ठिकाणी ही मादी अंडी घालतात.हिवतापाला रोखायचे झाल्यास डासांची उत्पत्ती रोखणे हाच रामबाण उपाय आहे.डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळुन घरातील पाण्याची भांडी घासुन-पुसुन स्वच्छ करणे, कोरडी करणे, पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकणे ठेवावी,परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी अथवा त्यांत आईल किंवा राँकेल टाकावे, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत.आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करुन पाण्याच्या टाक्यांमध्ये टेमीफाँस नावाचे औषध टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अंडी मरुन जातात. गावात रॅली काढून हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली.सदरप्रसंगी मांडवे बु. येथील श्री. महेमुद तडवी सरपंच, श्रीम.समीना तडवी उपसरपंच,इतर ग्रा. प. सदस्य, जि. प. शाळा मुख्याध्यापक, इतर शिक्षकवृंद, आशासेविका श्रीम.अलका जाधव, जिजाबाई पाटील, सुलोचनाबाई शिंदे व तुळसाबाई चव्हाण व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित. बाबासाहेब यांच्या जन्मस्थान महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन भूमीला नतमस्तक. भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार असून, आज त्याच अभियानाचा भाग म्हणून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा सरकारने बाबा साहेबांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे. असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेले महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन या पवित्र भूमीला नतमस्तक करून त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची जाणीव पुन्हा नव्याने केली. व शिक्षण, समता आणि न्यायासाठी झगडण्याची नवी ऊर्जा मिळाली. त्या मातीला स्पर्श करून मन विचारांच्या तेजाने उजळून निघालं. बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचं बळ मनाला पुन्हा एकदा जाणीव करून देऊन गेलं. असे उद्गार यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काढले.

Read More

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, संकटसमयी नेहमी अग्रेसर असणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन आज तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. शारीरिक आजाराची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य गिरीशभाऊंशी माझा थेट संवाद झाला तेव्हा त्यांनी सांगितले की, गेले दोन-तीन दिवस विकनेसचा त्रास जाणवत होता आणि ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.अशा स्थितीतही, जेव्हा पहेलगाम घटनेची माहिती मिळाली, तेव्हा गिरीशभाऊंनी आपल्या शारीरिक स्थितीकडे दुर्लक्ष करत तातडीने श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला.स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची ही भावना केवळ प्रेरणादायीच नाही, तर संकटसमयी खंबीर नेतृत्व कसे असते याचे ज्वलंत उदाहरण आहे. “अशा धाडसी आणि सेवाभावी नेत्याचा आम्हाला अभिमान आहे!” संकटकाळातले प्रेरणादायी नेतृत्व गिरीशभाऊ महाजन हे नेहमीच संकटात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. महापुरात मदत कार्य, कोविड काळात नागरिकांसाठी वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा पुरवणं, पूरग्रस्त भागातील बचावकार्य, अशा अनेक प्रसंगी त्यांनी लोकहितासाठी स्वतःला झोकून दिले आहे. श्रीनगरमध्ये तातडीचा समन्वय श्रीनगरमध्ये दाखल होताच, गिरीशभाऊ महाजन यांनी लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून बचावकार्य अधिक गतीमान केले आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करणे, गरज असल्यास महाराष्ट्र शासनाकडून विशेष विमानाची सोय करणे, अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांचा अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या या कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी वृत्तीवर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा अपार अभिमान आहे. संकटाच्या कोणत्याही क्षणी ते अग्रभागी असतात, हे पाहून आम्ही नेहमीच प्रेरित होतो. “आजारी असूनही जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा नेता म्हणजे खरा नेता! आम्ही गर्वाने सांगतो — आम्ही गिरीशभाऊंचे कार्यकर्ते आहोत!” महाराष्ट्राला अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संकटातून सुरक्षित बाहेर पडतो, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! “आजारी शरीराने नाही, तर धडाडीच्या मनाने संकटांवर मात केली जाते.मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही पुलवामा संकटासाठी धावलेला आमचा नेता — गिरीशभाऊ महाजन!संकटातही महाराष्ट्राचा आधारस्तंभ! गिरीशभाऊमहाजन #संकटमोचकनेतृत्व #महाराष्ट्राचाअभिमान”

Read More

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन हिवरखेडा (ता. जामनेर) : हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. हा रस्ता वाघूर उपसा सिंचन योजना, जामनेर नगरपालिका वॉटर सप्लाय योजना तसेच आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचा मुख्य संपर्क मार्ग असल्यामुळे, पाच किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी वाघूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री. विनोद पाटील, उपविभागीय अभियंता श्री. अमोल कुमावत यांची उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती भाजप गटनेते श्री. अमर शिवाजीराव पाटील, सरपंच श्री. देविदास दशरथ जोहरे, पोलीस पाटील श्री. लिलाधर मालखेडे, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, श्री. जितेंद्र भिला पाटील, श्री. अमोल सुधाकर पाटील, श्री. उमेश महाजन, विकास सोसायटी चेअरमन श्री. अरूण शंकर चौधरी, तसेच चिचखेडा येथील बापू पाटील, नामदेव झावरे, सुभाष जासुद आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Read More
error: Don't Try To Copy !!