Headlines

एकनाथराव खडसे यांचा अमृतमहोत्सव

: जाणकार यांचे सध्या काय चाललंय? : खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भाजप किंवा महायुतीचा एकही मोठा नेता उपस्थित नाही पंकजा मुंडे यांचाही दौरा अचानक रद्द भाजपसह महायुतीचे नेते अनुपस्थित राहिले ? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस लक्ष्मण हाके ओबीसींनी आता एकत्र येण्याची वेळ जरांगे यांच्यामागे ग्रामीण जनतेचे संघटन आहे. ओबीसी समाज खूप मोठा आहे, परंतु आपल्यात अद्याप तशी एकजूट आणि संघटनात्मक बांधणी दिसत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील संवाद कमी पडतेय का? 8

Read More

अमळनेर–गलवाडे रोडवर भीषण अपघात; उभ्या डंपरला दुचाकीची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील अमळनेर–गलवाडे रोडवर उभ्या असलेल्या डंपरला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर–गलवाडे मार्गावर डंपर रस्त्यावर उभा होता. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची डंपरच्या मागील बाजूस जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे रस्त्यावर काही काळ मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अमळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृतांची ओळख, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि डंपर रस्त्यावर कोणत्या परिस्थितीत उभा होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या अपघातामुळे अमळनेर–गलवाडे मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्त्यावर अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read More

कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा | प्रतिनिधीचोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

भावना महत्त्वाच्या की सत्यस्थितीला महत्त्व द्यावे?

माणसाच्या आयुष्यात भावना आणि सत्यस्थिती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भावना आपल्या मनाला दिशा देतात, तर सत्यस्थिती आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. अनेकदा आपण या दोन्हींच्या संघर्षात अडकतो. अशा वेळी प्रश्न पडतो—भावनांना महत्त्व द्यावे की सत्यस्थितीला? भावना माणसाला माणूस बनवतात. प्रेम, माया, जिव्हाळा, विश्वास आणि सहानुभूती यांमुळे नाती टिकून राहतात. जर आयुष्यात फक्त तर्क आणि वास्तव असेल, पण भावना नसतील, तर नात्यांमध्ये उब राहणार नाही. एखाद्याच्या वेदना समजून घेण्यासाठी केवळ सत्य पुरेसे नसते; त्यासाठी संवेदनशील मनही आवश्यक असते. परंतु प्रत्येक निर्णय फक्त भावनांच्या आधारावर घेतला, तर त्याचे परिणाम नेहमीच योग्य असतील असे नाही. भावना क्षणभंगुर असू शकतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, अती प्रेमापोटी केलेला त्याग किंवा भीतीमुळे सोडून दिलेली संधी—हे सर्व पुढे पश्चात्तापाचे कारण ठरू शकते. म्हणूनच सत्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. सत्यस्थिती कधीकधी कठोर असते, पण ती वास्तव असते. वास्तवाकडे दुर्लक्ष करून फक्त भावनांमध्ये जगल्यास आपण स्वतःलाच फसवू शकतो. उदाहरणार्थ, एखादे नाते केवळ भावनिक जडणघडणीमुळे टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सतत अपमान, अविश्वास किंवा अन्याय असेल, तर वास्तव स्वीकारणेच योग्य ठरते. सत्य कडू असले तरी तेच पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. याचा अर्थ भावना निरर्थक आहेत, असा नाही. भावना आणि सत्यस्थिती यांचा समतोल साधणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. भावना आपल्याला मानवता शिकवतात, तर सत्यस्थिती आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. भावना हृदयाचा आवाज असतात आणि सत्यस्थिती विवेकाचा. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना हृदय आणि बुद्धी यांचा संवाद होणे आवश्यक आहे; संघर्ष नव्हे. शेवटी, भावना आणि सत्यस्थिती यांपैकी एकाची निवड करण्यापेक्षा, सत्याचा स्वीकार करताना भावनांचा आदर करणे आणि भावना जपत वास्तवाचा स्वीकार करणे अधिक योग्य आहे. कारण केवळ भावनांवर जगता येत नाही आणि केवळ वास्तवावरही आनंदी राहता येत नाही. संतुलनातच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे.

Read More

🌿निसर्ग… माझा गुरु

सुगरण पक्ष्याच्या घरट्यातून शिकलेली जिद्द आणि चिकाटी निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो. त्याच्या प्रत्येक रूपातून जीवनाचा एखादा नवा धडा मिळत असतो. तुम्ही या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात? मला माहित नाही; पण मी मात्र निसर्गाकडून खूप काही शिकलो आहे.सुगरण पक्ष्याचे घरटे माझ्या आयुष्याची एक सुंदर प्रेरणा ठरले आहे. या छोट्याशा पक्ष्याकडून मी जिद्द, चिकाटी आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद शिकलो. पक्ष्याने बांधलेले घरटे उध्वस्त करण्यासाठी अनेकदा वादळे येतात; मात्र प्रत्येक संकटानंतर तो पुन्हा नव्याने आपले घरटे बांधतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानण्याचा संदेश हा पक्षी आपल्याला देतो.२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ABC डायरी’ या माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही सुगरण पक्ष्याचा फोटो आहे. या पक्ष्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि म्हणूनच त्या पुस्तकात सुगरण पक्ष्यावर जवळपास सहा प्रकरणे लिहिली आहेत.निसर्ग मला सतत काही ना काही शिकवत गेला आणि त्यातूनच माझे साहित्य अधिक समृद्ध होत गेले.

Read More

चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.

Read More

कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा घाट परिसरातून कर्जतच्या दिशेने जात असताना रेल्वेच्या एका डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.धूर वाढत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने सामान घेऊन रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी घाबरून धावत्या परिस्थितीत खाली उतरल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या इंजिन अथवा संबंधित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळ रेल्वे परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मोठी दुर्घटना टळलीया घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण तपासले जात आहे.

Read More

खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित PSI यांनी खाकी वर्दीत असतानाच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. PSI यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला काही सांगितले होते का, तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांनी हे पाऊल उचलले, याचा तपास केला जात आहे.दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे हिंगोली पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read More

जामनेर न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

जामनेर प्रतिनिधीसध्याच्या काळात व्यसनाधीनता खुप मोठी समस्या निर्माण झाली असुन विशेषतः युवक वर्गात खुप व्यसन दिसत आहे.गुडखा,गांजा,चरस,दारु यांचा सऱ्यास वापर आता शहर आणि खेड्यात सुद्धा जास्त वाढत आहे.यामुळे घरात, समाजात वाद, भांडणे निर्माण होतात .पैशाचा अपव्यय होऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे.यामुळे समाजातील,घरात तेढ निर्माण होऊन सगळ्यांचेच नुकसान होत आहे.तेव्हा युवकांनी व्यवसनांपासुन दुर रहावे असे आवाहन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती यु.एस.वानखडे यांनी केले आहे.जामनेर न्यायालयात जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकिल संघाच्या विद्यमाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ॲड.तृप्ती देठे यांनी आपल्या भाषणात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता त्यांचे परिणाम तसेच याबाबत असलेले कायदे यांची सविस्तर माहिती दिली.यावेळी जामनेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर बारी सचिव ॲड.डिगंबर गोतमारे तसेच सर्व वकिल बांधव, भगिनी,नागरिक न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.एस.आर.पाटील तर आभार ॲड.देवेंद्र पारळकर यांनी मानले.

Read More

सामरोद जि. प. शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहातगावकरी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचा सक्रिय सहभाग

सामरोद | प्रतिनिधी सामरोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. या वेळी शाळेच्या परिसरातील क्रीडांगण व बागेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सरपंच व पोलीस पाटील यांनी ‘स्वच्छ शाळा, समृद्ध गाव’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच अभ्यासातील एकाग्रताही वाढते, असे त्यांनी सांगितले. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. अभियानाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.

Read More
error: Don't Try To Copy !!