Headlines

नामदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याच्या जागेची केली पाहणी

नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे. याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ मार्फत आयोजित महिला दिन व पारिवारिक कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने महिला दिन व पारिवारिक मेळावा तसेच २०२५-२७ या कालावधीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महिला सशक्तीकरण व कुटुंबसंस्था यांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तसेच वीज कामगार महासंघाच्या योगदानाचे कौतुक करत संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महिला कामगारांच्या योगदानाबाबत विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सदस्यांनी महासंघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली.

Read More

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करावा, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी)शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलने केले. या आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.

Read More

जामनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू.. हातगाडी, टपरीधारकांमध्ये नाराजी, राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे करणार हस्तक्षेप

जामनेर, ७ मार्च २०२५ (प्रतिनिधी: सुपडू जाधव, जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज) जामनेर नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान केली असून, याअंतर्गत अनेक रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते, शहराचे सौंदर्य राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. अचानक कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. प्रभावित व्यावसायिकांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत नगर पालिका प्रशासनाशी चर्चा करून व्यावसायिकांचे मत मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक नागरिकांनीही प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर आक्षेप घेत, काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे.अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे. अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

बीजेएस कार्यकर्ते आणि जिल्हाधीकारीं यांचे सोबत या वर्षी तलावातिल गाळ काढणे बाबत चर्चा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवआज दि 5 मार्च रोजी भारतीय जैन संघटना व मा जिल्हाधीकारी आयुष प्रसादसरांचीगाळयुत्त शिवार व गाळ मुक्त बंधारा/धरण, नाला खोलीकरण यां विषयांवर यांचे सोबत सविस्तर चर्चा संपन्न झाली या चर्चेत मा जिल्हा धिकारी, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जल संधारण विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी , तसेच भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, BJS जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जलंगाव तालुका प्रमुख पंकज जैन ,रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर , भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगांव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल व BJS जळगांव अध्यक्ष अजय राखेचा, bjs जलकार्य जिल्हा समनव्याक गणेश कोळी यांचे सोबत चर्चा संपन्न झाली तसेच 15 तालुक्यातील bjs चे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवां पर्यन्त पोहोचून तलावातील गाळ शेतात गहेवून घेवून जाणे साठी प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी तयार आहेत अशी हमी विनय पारख यांनी दिली. लवकरच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार आणि बिडिओ आणि सरपंच यांचे सोबत मीटिंग घेताना bjs च्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करावे असे जिल्हयाधिकाऱ्यांनी सांगितले .

Read More
error: Don't Try To Copy !!