वाकडी येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न इगतपुरीचा ऋषिकेश वावरे प्रथम

वाकडी.ता.जामनेर.दि.२६/०७/०२५ आज वाकडी गावांमध्ये प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड व ग्रामस्थांच्या सहभागातून घेण्यात आले, यावेळी स्पर्धांचे उद्घाटन फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले,यावेळी अंकुश जाधव यांनी हिरवी दिंडी दाखवून स्पर्धाला सुरुवात करण्यात आली, उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर यामध्ये अनिसचे जिल्हा सचिव प्रल्हाद बोराडे,लक्ष अकॅडमीचे संचालक जळगाव पोलीस निलेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे, रमेश गायकवाड, पोलीस पाटील घनश्याम पाटील, शिक्षक प्रेमी विनोद तेली,अहजर तांबोळी,विजय राजपूत, राजेंद्र भोई, अतुल पाटील, शब्बीर तडवी, अनिल जाधव,रवी परदेशी,कुणाल बारबुदे, निलेश वाणी, देशदूत प्रतिनिधी ज्ञानेश्वर वंजारी,व रनर गृपचे सदस्य प्रथमच होत असलेल्या स्पर्धांसाठी तालुक्यातील व जिल्हा भरातून इगतपुरी नाशिक बुलढाणा, येथून आलेले स्पर्धक यामध्ये मुला व मुलीसह एकुण ७० ते ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असता, स्पर्धेचे ठिकाण तळेगाव रोड पाच किलोमीटर पर्यंत ठेवण्यात आले होते,सर्व आलेल्या स्पर्धकांनी आपले प्राविण्य दाखवत जिंकण्यासाठी प्रयत्न केले, यापैकी मुलांमधून पाच व मुली मधून पाच स्पर्धक यशस्वी झाले, यावेळी यशस्वी झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस व ट्राॅफी पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली, यावेळी अंकुश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेमुळे मुलांना चैतन्य निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय छान असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक करुन पुढील काळात मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या पोलीस भरतीसाठी स्पर्धकांना नक्कीच फायदाचे ठरेल असे त्यांनी व्यक्त केले, स्पर्धक मुलांसाठी बक्षीस देणारे प्रथम आलेले इगतपुरीचा ऋषिकेश वावरे आला ३००० हजार व द्वितीय आलेला तेजश सपकाळे,याला २००० हजार देण्यात आले, तसेच तळवेल बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्या कडून तृतीय आलेला शुभम ओलांडे, देण्यात आले,चतुर्थ आलेला आदित्य येवले यांना देण्यात आले, जळगाव राजेंद्र भोई व ट्राॅफी देणारे बजरंग दल वाकडी स्पर्धक मुलींसाठी प्रथम बक्षीस जानवी रोजोदे जळगाव हिला अनिल जाधव पहूर यांच्या हस्ते पंधराशे रोक देण्यात आले, यावेळी स्पर्धकांच्या आरोग्याची काळजी घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांच्या पाठोपाठ राहून अम्बुलन्स सेवा जावेद तडवी, रुपाली जोनवाळ,व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, दूर आलेल्या स्पर्धकांना भोजनाची व्यवस्था प्रविण गायकवाड व राजेंद्र भोई यांनी केली, यावेळी रनर गृपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Read More

जामनेरकरानो ऐआय अतिशय घातक / आपल्या मुला-मुलीची काळजी घ्या जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवआज आपण जानुन घेणार ऐआय म्हणजे कुत्रिम वस्तुने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कुत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजेंअस) ऐआय असे म्हणतात.आजच्या युगात प्रत्येक घरात लहान मोठे मुल मुली विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाइल लॅपटाॉप वापरतात. यांचा वापर कधी कधी आपल्या कुटुंबा साठी घातक ठरतो. मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोअर वरुन अनेक जण वेगवेगडी फोटो ईडिटीगची अॅप डाऊनलोड करतात. यातीलच ऐक अॅप चर्चेत आहे ते म्हणजे ऐआय या संबधीचे अनेक अॅप आहेत. ते मानवी जिवनासाठी हे घातक ठरत आहे. याचे मोठे धोके आहेत. या धोक्याना ओळखणे गरजेचे आहे. या मुळे आपल्या सुरक्षा हक्कावर परीणाम होतो. या बद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. ऐआयचा वापर ऐखाद्या हानी साठी होण्यासाठीचा वापर वाढलाय.काही ऐआय आवाज फोटोच /विडीओच विश्लेषण करत. या मुळे आपल्या मोबाईल मधील आपला सुरक्षित डेटा सुद्धा चोरीला हडपला जातों. आयचा चालु असलेला आवाज/ फोटो/विडीयो ट्रेड घातक रुप धारण करत आहे. म्हणजे सर्व माहीत असुनही आपण आपल्या सोबत फ्राॉड करुन घेतोय. या ऐआय चा वापर काही मस्करी म्हणुन तर काही ऐखाद्याची हानी करण्यासाठी जास्त होतोय. या मार्फत आपला आवाज बनवला जातो फेस ऐखाद्या विडीओ फोटोत वापरला जातो जो खराखुरा भासतो. यांचा वापर अश्लिलिलतेत सुद्धा होतो. या मुळे ऐखाद्या व्यक्तिच जीवन ऊद्धवस्त होण्याची वेळ येते. आपल्या मोबाईल वरती आपली फोटो विडीयो कुटुंबा तील व्यक्तिची फोटो आपण आपलोड करत असतो.त्याचा वापर आपली हनी_बदनामी करण्यासाठी कुणाकडुनही होतो अशे प्रकार आपल्या जामनेर शहरात सुद्धा ऊघडकीस आलेले आहे. ते सर्व कुत्रिम रित्या बनवलेल असत परंतु ते दिसायला खर वाटत अशी भयानक ति आवाजाची फोटो/वाडीओची ईडिटीग असते. जे ततोतंत खरी वाटते. या मुळे अनेकाचे आयुष्य ऊद्धवस्त झालेत तर आत्महत्या चे प्रमाणही वाढलेल आहे. ऐखाद्याच्या बदनामी साठी अश्लीलता वापरुन ऐआय व्दारे बनवलेले विडीओ/फोटो/ ऑडिओ रेकाॉर्डीग ऐखाद्यास आत्महत्यास मंजबुर करु शकते. काही दिवस आधीच शहरातील शिवभक्त अविनाश बोरसे याचे व्हाट्सएप/ इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनी केला गेला. हजारो लाखो लाईक फाॉलो असलेल अकाउंट बंद पाडले गेले.बोरसेचा आवाजाचा व फोटोचा वापर सुद्दा काही फेक अकाउंट व्दारे फसवणुकीसाठी बदनामी साठी केला गेल्याच समोर आल होत. बोरसेनी धाडसाने हिमंतीने या गोष्टीचा सामना केला. तशी तक्रार सुद्धा त्यानी दाखल केलेली आहे. सर्व जामनेर शहरातील तालुक्यातील सर्व नागरीकाना जनतेला अवाहन आहे. आपल्या कुटुंबा चे तुमचे मुलामुलीचे भविष्य ऐआय मुळे ऊद्धवस्त होणार नाही यांची काळजी घ्या

Read More

कन्नड–चाळीसगाव घाटात ST बसचा भीषण अपघात; स्टीयरिंग रॉड तुटल्याने बस दरीच्या काठावर अडकली, मोठी जीवितहानी टळली

छत्रपती संभाजीनगर | 23 ऑगस्ट 2026 छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC/ST) बसचा रविवारी, 23 ऑगस्ट रोजी कन्नड–चाळीसगाव औट्रम घाटात भीषण अपघात झाला. बसचा स्टीयरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकली. धडकेनंतर बस दरीच्या अगदी काठावर जाऊन अडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH-40-N-9726 असून या बसमधून सुमारे 59 प्रवासी प्रवास करत होते. घाटातील धोकादायक वळणावर बसचा स्टीयरिंग रॉड तुटल्याने काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरक्षा कठड्याला धडकल्याने बस दरीच्या काठावर अडकून राहिली. थरारक प्रसंग; काही क्षणांत प्रवाशांच्या जीवावर बेतले अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने काही क्षणांसाठी घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस दरीच्या दिशेने झुकल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र बस दरीत न कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही. स्टीयरिंग रॉड तुटल्याने अपघात? प्राथमिक माहितीनुसार बसचा स्टीयरिंग रॉड तुटणे हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. बसची तांत्रिक स्थिती, स्टीयरिंग यंत्रणेची तपासणी तसेच बसच्या देखभालीबाबतही संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. कन्नड–चाळीसगाव घाट पुन्हा चर्चेत कन्नड–चाळीसगाव औट्रम घाट हा या भागातील महत्त्वाचा मात्र धोकादायक घाटमार्ग म्हणून ओळखला जातो. या घाटात तीव्र वळणे, उतार आणि दरीचा भाग असल्याने वाहनचालकांना मोठ्या सावधगिरीने वाहन चालवावे लागते. यापूर्वीही या घाटात विविध वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीच्या वृत्तांमध्ये घाटातील सुरक्षा कठडे, रस्त्याची स्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या ताज्या अपघातानंतर घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहनांची तांत्रिक तपासणी याकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना टळल्याने सुटकेचा निश्वास बस दरीत कोसळली असती तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती. मात्र बस सुरक्षा कठड्याला धडकल्यानंतर दरीच्या काठावरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सुमारे 59 प्रवाशांचे जीव धोक्यात आले असतानाही मोठी जीवितहानी न झाल्याने प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनंतर ST बसच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, घाटमार्गावर धावणाऱ्या बस आणि इतर वाहनांची नियमित तपासणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. बस क्रमांक : MH-40-N-9726मार्ग : छत्रपती संभाजीनगर – सुरतघटनास्थळ : कन्नड–चाळीसगाव औट्रम घाटप्रवासी : सुमारे 59जखमी : प्राथमिक माहितीनुसार 4 ते 5अपघाताचे प्राथमिक कारण : स्टीयरिंग रॉड तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटलेजीवितहानी : मोठी जीवितहानी टळली

Read More

बोदवड शहरातील पाणीपुरवठा विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे. शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई

हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. ११ अजामीनपात्र वॉरंट तामील न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध दारू विक्रीवर धाड पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. पोलिसांचा स्पष्ट इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read More

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Read More

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप 🌷जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर 🌷 दिनांक ,:6/04/2026 रोजि बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आहे एका 58 वर्षीय नराधमाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर, गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप देत . तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास नकार करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More

जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न — नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय

जामनेर (प्रतिनिधी) :जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे, महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. या बैठकीस शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील, जिल्हा संघटक अशोकभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ खोडपे, डिके दादा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर शेठ सराफ, शहरप्रमुख निशामुद्दीन शेठ, नानाभाऊ जंजाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, सौ. ज्योत्स्ना विसपुते, ॲड. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा आणि जामनेर नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जामनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

यवतमाळमध्ये पित्यानेच ३२ वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या; व्यसनासाठी पैसे न दिल्याने संताप

जामनेर | प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव परिसरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. व्यसनासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पित्यानेच आपल्या ३२ वर्षीय दिव्यांग मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाने वडिलांकडे व्यसनासाठी पैसे मागितले होते. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने संतापलेल्या पित्याने मुलावर कुऱ्हाडीने वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी मृत मुलाच्या आईने पित्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि हत्येचे कारण याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीकडून पैशांसाठी टोकाचे पाऊल उचलले गेल्याचा आरोप असल्याने या घटनेने सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त होत आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Read More

“जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन; भाविकांचा अभूतपूर्व उत्साह”

जामनेर : जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराज यांच्या पवित्र छडीचे आगमन झाल्याने शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रामदेव बाबा नगर, भुसावळ रोड येथे आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी श्री तेजस पाटील, श्री जुतू काका पाटील, श्री अतिष भाऊ झाल्टे ,श्री दिपक भाऊ तायडे यांच्यासह जामनेर शहरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. श्री गुरु गोरखनाथजी व श्री गोगाजी महाराज यांच्या कृपेने आयोजित या सोहळ्यास जामनेर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भाविकांनी श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पवित्र छडीच्या आगमनामुळे रामदेव बाबा नगर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जामनेरमध्ये प्रथमच असा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांसह सर्व सहकारी व भाविकांनी मोलाचे योगदान दिले. “जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन” हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Read More
error: Don't Try To Copy !!