Headlines

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

जामनेर तालुक्यातील शिवभक्त अविनाश बोरसे ला अपघात झाल्याचे खोटे सांगुन त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न, बोरसे पुराव्यानिशी पोलिसात तक्रार दाखल करणार

जे बी एल महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर शहरात पुर्ण तालुक्यात शिवभक्त म्हणुन ओळख असलेले अविनाश बोरसे कुठत्त्याही राजकीय पक्षात नाही संघटनेत नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानी अशिर्वादानी जनतेला अबडणारी सामाजिक क्षेशत अनेक मोव मोठी काम बोरसेनी कुणालाही न घाबरता केली. जामनेरातील तरुण वर्ग नेहमी बोरसेच्या पाठीशी ऊभा दिसतो. काही दिवस आधीच कॅफेचा मूद्रा बोरसेनी लाबुन घरला या कैफे मुळे पूर्ण जामनेर तालुक्यातील पालक वर्ग उस्त होते. बोरसेनी हा महत्वाचा विषय लाऊन धरत अखेर में बंद पाइले पुर्ण जामनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात बोरसेना मोठा नालोकिक आहे. बोरसेचा चाहता नावलौकीक वाढलेली प्रतिष्ठा चपचत नसल्याने काही जण फेिक अकाउंट व्दारे काही दिवसापासुन बोरलेची बदनामी करत होते. हा सुद्धा एक प्रकार काही दिवस आधी समोर आला होता. दि.१० सप्टेंबर रोजी बोरसेना खोटी माहिती मैसेज व्दारे व फोन करून अपघात झाल्याची माहीती देत बोरसेना घराबाहेर बोलवले रात्री चारा ऐक बी मेळ असल्याने त्याने बोरसे ऐकटाच होता वाच गोष्टीचा फायदा उचलत खल्लेखोर तरुणानी संधी साधली ते सर्व दारुच्या नशेत असल्याचे ओरसेनी सांगितले, ५/६ तरुनानी बोरसेना घेरले व बेगडेच विषय दाखवत बदनामी सारख्या अश्लिल भाषेत बोलत धमक्या दिल्या. चोरसे पोलिस तक्रार करत असल्याचे कळल्याने नंतर पुन्हा जामनेर सोमबाड़ों परीसरात बोरसे फिरत असताना तिथ त्याना अडवुन जिथे मारण्याची धमकी देत पोलिस तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडे जस असल्याचे बोरसेनी सागितले. आम्ही कोणालाथ घाबरत नाही माणु बोलु लागले. हे सर्व या तरुनामी २० हजार रुपये घेऊन हा प्रकार केल्याच समोर आले आहे. ज्यावेळी बोरसेना धमकी देणे सुरु होते त्यावेळी हे सर्व ऐक तरूम कुमाला तरी बीडीओ कॉल करन दाखवत असल्याचे बोरसेनी सागितले. बोरसेनी आपला जिव चाचचण्यासाठी सर्व सहन करत तिथुन निघुन गेल्याच सागितल बोरसेनी संयम ठेवल्याची माहीती मिळाली. धमकी धमकी देणारे अनोळखी होते. बोरसे पोलिसात तक्रार दाखल करत असुन लवकरच चेहरे नाव स्पष्ट होतील. एक वर्षापूर्वी अशाच प्रकारे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सचिन बोरसे यांना यांच्या शेतात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल काय करून नावलौकीक असे प्रकार योग्य नाही. सदरील घटना अत्यंत चुकीची असून जामनेरकर संताप व्यक्त करत आहे तर शिवभक्त अविनाश बोरसेंना जामनेर शहरायव्ह तालुक्यातील खेडापाडयातुन अजुनच अधिकच बाडता पाठिंबा जामनेरकर देत असल्याच दिसुन येत आहे.

Read More

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.

Read More

जामनेर पंचायत समितीमार्फत 9820 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल मंजुरीपत्र वाटप

जामनेर रविवार, 23 फेब्रुवारी, 2025 जामनेर प्रतिनिधी (सुपडू जाधव )प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत देशभरात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यातील 9820 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून, त्यातील 7744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी बांधकाम अभियंता जे. के. चव्हाण, माजी उपसभापती नवल राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंदा लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण ₹1,46,000 अनुदान मिळणार आहे. पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Read More

बोदवड शहरातील पाणीपुरवठा विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे. शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Read More

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. JBN जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.JBN मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.JBN या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विजेत्या कुस्तीपट्टूना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जळगाव (नितीन सोनवणे) : मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

समता व सामाजिक एकात्मतेचा आदर्श; जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष विवाह नोंदणी संपन्न

जळगाव, दि. ९ एप्रिल — (प्रतिनिधी ) समाजातील भेदभाव दूर करून सर्वसमावेशकतेला चालना देणाऱ्या ‘दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजने’च्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारा एक आदर्श विवाह सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडला.तांदलवाडी (ता. रावेर) येथील श्री. महेंद्र श्रीराम पाटील (दिव्यांग) आणि श्रीमती दमयंती दिनकर कुंवर (अव्यंग) यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून सामाजिक समता, परस्पर स्वीकार आणि एकात्मतेचा संदेश दिला. या विवाहामुळे समाजासमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी नवदांपत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल, सुखमय वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. दिव्यांग व सुदृढ व्यक्तींच्या अशा विवाहांमुळे सामाजिक समतोल राखण्यास मदत होत असून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य शासनाच्या धोरणानुसार अशा दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक रूढींना छेद देणारा हा विवाह ‘समावेशक समाजा’कडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून तो सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महेंद्र आणि दमयंती यांनी स्वीकारलेला हा मार्ग इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.

Read More

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर 9 वर्ष पूर्ण 10 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. यावेळी कार्यालयात संचालक श्री मनोजजी कावडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री मनोज कावडिया त्यांनी चॅनेल बाबत कौतुक करीत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यानंतर केक काटत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संचालक श्री किरण सोनवणे,संपादक शांताराम जाधव,कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया,अँकर मीनल चौधरी,कॅमेरामन विलास ढाकरे,सुपडू जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे,आबा पाटील,यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Read More

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read More
error: Don't Try To Copy !!