शिवक्रांती मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

संगीत खुर्चीसह विविध स्पर्धांना बालकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुंभारी सिम, दिवपिंपरी ता. जामनेर :जामनेर तालुक्यातील कुंभारी सिम, दिवपिंपरी येथे शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिक, महिला, युवक तसेच बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची भक्तिभावाने आरती व पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची या विशेष कार्यक्रमासह विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बालकांसह युवक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध स्पर्धांमधून सहभागींचे मनोरंजन करण्याबरोबरच गावातील नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, तसेच गावातील युवक व नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, या उद्देशाने शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार उपक्रम उत्साहात संपन्न

जामनेर :- आज दिनांक २९ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आनंददायी शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच स्वच्छ शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत स्वच्छता उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि आनंदातून शिकण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत झाली. मुख्याध्यापिका नजराना मॅडम व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पळासखेडे विद्यालयाचे दुहेरी यश

१४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघांची जिल्हास्तरावर निवड जामनेर : प्रतिनिधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जामनेर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत पळासखेडे मिराचे येथील नि. पं. पाटील विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी रोटवद येथे १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत नि. पं. पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला असून, या संघाचीदेखील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही संघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री. भीमरावजी शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब श्री. सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब श्री. यु. यु. पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ निळकंठ पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री. दीपकरावजी गरुड, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यासोबतच वसतिगृहाचे सचिव आ. श्री. गो. गो. सूर्यवंशी, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, खेळाडूंचे पालक यांनीही विजयी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील सर, क्रीडाशिक्षक श्री. डी. आर. चौधरी सर, तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांनी मिळवलेले हे यश विद्यालयाच्या क्रीडा परंपरेला बळ देणारे असून, आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही पळासखेडे विद्यालयाचे खेळाडू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 💐🏆

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

Read More

नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी रंगकर्मींनी घेतली आयुक्तांची भेट

बालगंधर्व खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा; रंगकर्मींनी आयुक्तांना दिले निवेदन कलावंतांसाठी महत्त्वाच्या नाट्यगृहाची दुरवस्था; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष जालगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील कलावंत आणि रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी आता रंगकर्मींनी केली आहे.यासंदर्भात रंगकर्मींनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. नाट्यगृहाची सद्यस्थिती पाहता कलावंत आणि प्रेक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रंगकर्मींनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.बालगंधर्व खुले नाट्यगृह हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे रंगकर्मी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read More

साखरेचे दर वाढल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने साखरेचे दर वाढल्याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर केले अनोखे आंदोलनजळगाव शहर महानगरपालिकेच्या समोर बिना साखरेचा चहा तयार करत साखरेचे दर वाढल्याने सरकारचा केला निषेधसाखरेचे दर कमी व्हावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आली करण्य जळगाव साखरेचे दर 80 रुपयाच्या पार झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या समोर चूल मांडून या चुलीवरती बिना साखरेचा चहा ठेवत या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे महागाई कमी व्हावी साखरेचे दर कमी व्हावे तर केंद्र सरकारच्या वतीने गरिबांना रेशन दुकानातून दहा किलो साखर मोफत मिळावी अशी मागणी यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे तर एकीकडे महागाई तर दुसरीकडे रोजगार कमी असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी

Read More

बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

तरुणावर चाकू हल्ला; हल्लेखोराला जामनेर पोलिसांनी घेतले ताब्यात

घटनेनंतर जामनेर पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची मोठी गर्दी; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहरात एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात काही काळ खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच संबंधित तरुणाचे नातेवाईक, मित्र तसेच स्थानिक नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त वाढवला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तरुण जखमी झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, चाकू हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक तपासानंतर हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती आणखी चिघळू न देता नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे जामनेर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासात हल्ल्यामागील कारण, घटनेतील इतर व्यक्तींचा सहभाग आणि हल्ल्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read More

ईद-ए-मिलाद उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा

Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी दिनांक 5/09 20025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला. आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केलातसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता

Read More

” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव “

भारतीय जैन संघठणा जामनेर शाखा तर्फे ” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव ” हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजैसे 10 वी,12 वी मध्ये85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीतसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर,वकील,सीए, आर्किटेक्ट, एमबीए,इंजीनियर,एम फार्म, पीएचडी इ.सर्व विद्यार्थीकला व क्रीड़ा क्षेत्रामध्ये में विशेष कामगिरी करणाऱ्या सर्व सदस्य आणि8 उपवास किंवा त्यापेक्षा जास्त तपस्याकरणारे तपस्वी तसेचवर्षीतप तपस्वी56 विद्यार्थी आणि तपस्विंचा आणिसमाजसाठी गौरवनिय कार्य करणाऱ्यासमाजातील 5 सदस्यांचासादर सत्कार आणि सन्मानकरण्यात आला समाजामध्ये विशेष कार्य करणे हेतूसमाज गौरव पुरस्कार दिले गेले.सर्वांचा शाल,माळा,सन्मानपत्र आणि जैन धर्माचे प्रतिकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेस राज्य उपाध्यक्षश्री विनयजी पारख यांनी सभेलाभविष्यात होणाऱ्या बीजेस च्य कार्यक्रमांची अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले|महिला जिल्हा अध्यक्षसौ सोनल कोठारी यांनी बीजेस बद्दल माहिती दीलीlकार्यक्रम के प्रायोजक डॉ कांतिलालजी कल्पेशजी परेशजी ओस्तवाल परिवार यांच्यातर्फे केलेले होते lकार्यक्रमाचे सूत्र संचालनसौ मनिषा कोठारी आणि आभार प्रदर्शनसौ वंदना चोरडिया यांनी केलेकार्यक्रमामध्ये बीजेस खान्देश उपाध्यक्ष सुमित मुनोत,खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा,जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी,शहर अध्यक्ष कुशल बोहरा,शहर उपाध्यक्ष दर्शन भुरटशहर सचिव संकल्प लोढासदस्य विकास ललवाणी,डॉ नरेंद्र रांका,डॉ दीपक कोठारी,वैभव छाजेड, आदि सदस्य एवममहिला विंग जिल्हा अध्यक्ष सौ सोनल कोठारी,जिल्हा महासचिव सौ संगीता मंडलेचा,महिला शहर अध्यक्ष सौ मोना चोरडिया,सचिव सौ रुपाली बोहरा, उपाध्यक्ष सौ शीतल चोरडिया,सदस्य मनिषा कोठारी,वंदना चोरडिया इ. सदस्य उपस्थित होते|कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेडदर्शन भुरट,दर्शन बागमार,सौ सोनाली सिसोदिया आणिसौ स्नेहल मुनोत हे होतेl

Read More
error: Don't Try To Copy !!