Headlines

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर 9 वर्ष पूर्ण 10 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. यावेळी कार्यालयात संचालक श्री मनोजजी कावडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री मनोज कावडिया त्यांनी चॅनेल बाबत कौतुक करीत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यानंतर केक काटत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संचालक श्री किरण सोनवणे,संपादक शांताराम जाधव,कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया,अँकर मीनल चौधरी,कॅमेरामन विलास ढाकरे,सुपडू जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे,आबा पाटील,यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप.

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप. पाळधी ता. जामनेर : जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी येथे आज दिनांक २५ जून २०२६ रोजी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ४०० रुपये किमतीची नवोदय मार्गदर्शिका मोफत वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत मनापासून आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.“गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी सदैव कटिबद्ध!” 📖✨

Read More

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न जळगाव, दि.१६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल. शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.

Read More

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यशजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवराष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे . प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी .१) यश अनिल डोंगरे२) निशा गजानन पाटील३) प्राची प्रवीण पाटील४) नेहा उल्हास पाटील५) सोनल मनोज भामरे६) सृष्टी नंदू शेळके७) अंकिता योगेश पाटील८) रितिका रवींद्र पाटील९) दिशा नंदकिशोर सुरळकर१०) भावेश गणेश काठोटेसर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी महाजन सर समिती प्रमुखश्री डी एच परदेशी सरसहप्रमुख श्री सी यू पानपाटील सर वश्री व्ही ए पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व गुणवंतांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील व सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले

Read More

श्रावण सोमवारी सर्पराजाचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात दर्शन, पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांच्याकडून जीवदान.

पहूर (ता. जामनेर) :श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पहूर येथील देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात एका अनोख्या प्रसंगाचे साक्षीदार भाविक झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात सर्पराजाने दर्शन दिले .सायंकाळी पूजा-अर्चेच्या वेळी मंदिरात अचानक सात ते आठ फूट लांबीचा साप दिसून आला. तात्काळ या घटनेची माहिती पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत अत्यंत शिताफीने व काळजीपूर्वक सापाला पकडले. त्यांनी सांगितले की हा साप धामण जातीचा बिनविषारी असून तो मानवाला धोका पोहोचवत नाही.सर्पराजाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या साहसी व पर्यावरणपूरक कार्याबद्दल श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे,बाबुराव घोगडे यांनी सर्पमित्र नाना माळी व त्यांचे सहकारी प्रा.ईश्वर चोरडिया यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याची उपस्थित भाविकांनी स्तुती केली.सर्प व पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Read More
error: Don't Try To Copy !!