Headlines

पहूर कसबे ग्रामसभेत अधिकाऱ्यांवर संतप्त हल्लाबोल !आजी – माजी ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव? ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा !

पहूर, ता. जामनेर :पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयातील आजची ग्रामसभा संतापाच्या वातावरणात पार पडली. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्याने दप्तर सुपूर्द केले नाही, या गंभीर प्रकारावरून ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी थेट सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जातंय?” असा त्यांचा संतप्त सवाल सभागृहात चर्चेचा विषय ठरला. गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता प्रशासक सौ. आशाताई शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की,माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून, मागील कार्यकाळातील दप्तर अद्याप त्यांच्याच ताब्यात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सार्वजनिक कार्यालयाचे दप्तरच उपलब्ध नसेल, तर जनतेला माहिती वेळेत कशी मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर दप्तर हे ग्रामपंचायत कार्यालयातच आहे, शासकीय दप्तर मी घरी कशाला घेऊन येऊ? असा प्रश्न करून त्यांनी दप्तर ग्रामपंचायत मध्येच शोधण्याचा सल्ला दिला. माहिती अधिकारालाही अडथळादप्तर उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती वेळेत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पार्टटाईम अधिकाऱ्यांमुळे कारभारावर परिणाम पहूर कसबे सारख्या मोठ्या गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी मांडले. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही कार्यभार असल्याने स्थानिक समस्या दुर्लक्षित होत असल्याची तक्रार करण्यात आली. पहूरसाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्याग्रामसभेत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाघूर धरणाची पाणी योजना अद्याप सुरू न होणे याविषयी मधुकर पवार अशोक जाधव यांनी आवाज उठविला .स्मशानभूमी व गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैकुंठ रथ व शववाहिकेची गरज, शेंदुर्णी मार्गावरील दिव्यांची अनियमितता, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सवलत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली . गट क्रमांक १३५८ अतिक्रमण हटविण्याची तीव्र मागणी माजी उपसरपंच युसूफ बाबा यांनी करून पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला .श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील पर्यटन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये ठेकेदारांची मनमानी व दडपशाही याविषयी विश्वस्त किशोर बनकर व अशोक जाधव यांनी आवाज उठवला . ग्रामसभेच्या प्रारंभी प्रगणक शंकर भामेरे यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेला आजी-माजी पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच, दप्तर न सुपूर्द करण्याच्या प्रकारामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा कारभार चर्चेत आला असून, आता या प्रकरणात ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार जामनेर (ता. जामनेर) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान आणि नियोजित होणार आहे. या प्रणाली अंतर्गत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी कार्यालयात लावलेल्या QR कोड स्कॅन करून, आपल्या भेटीचा उद्देश व आवश्यक तपशील भरायचा आहे. यामुळे भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात होणार असून, कामकाज अधिक सुकर व कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेट अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली शासनाच्या “गतीमान व पारदर्शक सेवा” या ध्येयाशी सुसंगत होणार आहे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे मार्गदर्शनातून सदर योजनेची अमलबजावणी श्री नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर यांनी केली आहे. — तहसिल कार्यालय, जामनेर

Read More

नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण

आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप

जळगाव ता. जि. जळगावआज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ. सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी, शिवकृपा समुहातील सौ. सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टॉलसाठी, आदर्श समुहातील सौ. अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान स्वयंसहाय्यता समुहातील सौ. कविता सोनवणे यांना शिवणकामसाठी तर सत्यमेव जयते समुहातील सौ. सरला संजय दांडगे फुटवेअर विक्री अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपजीविकेसाठी निधी प्राप्त करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक यांनी दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरला पाटील, प्रभाग समन्वयक जळगाव दिनेश न्हाळदे, स्वप्नील पाटील पंचायत समिती जळगाव, सरुबाई जाधव वावडदा, कल्पना ठोंबरे विटनेर, विद्या पाटील पाथरी, मालुबाई पाटील वसंतवाडी, मोनिका पाटील जळके, रपेशा पाटील वडली या सर्व C.R.P. तसेच साधना सपके वसंतवाडी बॅक सखी, मनिषा पाटील वडली पशुसखी, वैशाली घाडगे विटनेर पशुसखी, विजया पाटील वावडदा कृषी सखी, तसेच जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव जिल्हा शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि.के. पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक बबन वाघ, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील व मोठ्या संख्येने बचत गट महीला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

अखील भारतीय विद्यापीठ कुस्ती वतायकांदो स्पर्धात हरियाणा व ओडिसा राज्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची निवड

अ. र.भा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील कु. गौरी कुमावत (SYBSC ) कू हर्षदा चौधरी TYBsc व कु.लोचाना चौधरी SYBsc यांची निवड कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली व कु. गौरी कुमावत हिची निवड तयकांदो स्पर्धेसाठी बालासोर ओडिसा राज्यात होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालीयशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे , उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे डॉ.अमर जावळे प्रा.आप्पा महाजन सर क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले

Read More

तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम———————————- तोंडापूर ता जामनेरयेथील शेंदुर्णी शिक्षण संस्था संचलित श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सतीश देशमुख होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक पी डी रोनखेडे के एस माळी एस पी पाटील उपस्थित होतेयावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली या परीक्षेचे समन्वयक व परीक्षक म्हणून आर सी लोडते यांनी काम केलेअंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलालहान गटप्रथम : श्रद्धा अनिल रायपूरेद्वितीय : लोकेश सुपडू जिरीतृतीय : सृष्टी मनोज चौधरी मोठा गटप्रथम : दिव्या दीपक पाटीलद्वितीय : गणेश संजय काटकरतृतीय : वैशाली धनराज गव्हले, गायत्री गव्हारेदोन्ही गटातून 16 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आलेयावेळी आर एस पाटील के व्ही देशमुख मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले याप्रसंगी पार्थ पाटील वैभवी मुके कोमल गव्हाणे आदी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केले .श्री देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार अमोल साळुंके यांनी मानलेकार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

“महिला सन्मानाच्या मुद्द्यावर दिल्लीत निर्धाराचा एल्गार; रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत महिला प्रतिनिधींची प्रभावी एकजूट” Strap – महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ संसद ते रस्त्यापर्यंत आवाज बुलंद; देशभरातील महिला खासदार व कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग

नवी दिल्ली, 18 April 2026 महिला सक्षमीकरण आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर राजधानी दिल्लीमध्ये महिला लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत प्रभावी उपस्थिती नोंदवली. महिला आरक्षणाशी संबंधित विषयावर व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या आंदोलनात विविध स्तरांवरील महिला नेतृत्वाने सहभाग नोंदवला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, तसेच भाजप नेत्या बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक महिला खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपस्थितीमुळे हा उपक्रम केवळ राजकीय कार्यक्रम न राहता महिला सक्षमीकरणाच्या व्यापक सामाजिक अभिव्यक्तीमध्ये परिवर्तित झाला. महिला प्रतिनिधींनी शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा काढत आपली भूमिका मांडली. हा मोर्चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने नेण्यात आला होता. महिला आरक्षणाशी संबंधित घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची मागणी केली. घटनाक्रमादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून आवश्यक ती पावले उचलण्यात आली. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखत परिस्थिती हाताळण्यात आली. काही महिला प्रतिनिधींना तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आले तसेच जमाव पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात निषेध नोंदवण्यासाठी फलक, पोस्टर्स तसेच पुतळा दहनासारख्या माध्यमांचा वापर करण्यात आला. महिला प्रतिनिधींनी या माध्यमातून महिलांच्या अधिकारांबाबतचा मुद्दा ठळकपणे मांडला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की,“महिलांचे सक्षमीकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत अधिकाधिक स्थान मिळणे आवश्यक आहे. हा विषय कोणत्याही राजकीय सीमांपलीकडचा असून, देशातील प्रत्येक महिलेला समान संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” त्याचप्रमाणे उपस्थित महिला नेतृत्वानेही महिला आरक्षणाचा मुद्दा व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता अधोरेखित केली. महिलांना राजकीय आणि धोरणात्मक स्तरावर अधिक प्रभावी भूमिका मिळावी, यासाठी सर्व घटकांनी सकारात्मक सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनाक्रमानंतर हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चेत आला असून, महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू झालेली ही व्यापक जनचळवळ आगामी काळात अधिक विस्तारेल आणि महिलांच्या सहभागाला नवे आयाम देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!