Headlines

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

प्रतिनिधी -सुपडू जाधवमहाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना

मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

Read More

पहूर येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शासन योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत

पहूर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आधार आणि बँक खात्यांच्या लिंकिंगसह आधार अपडेट करण्याच्या सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शहर किंवा तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे हा प्रक्रिया वृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने उपसरपंच राजू जाधव यांच्या पुढाकाराने आणि तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या सहकार्याने हे शिबिर पहूर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिरावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. वासुदेव घोंगडे, सरपंच श्री. अब्बू तडवी, माजी उपसरपंच श्री. रवींद्र मोरे आणि श्री. चेतन रोकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा नागरे, श्रीमती पल्लवी सोळुंके, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री. भूषण राजपूत, श्री. आनंदा शिंदे व श्री. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष सेवा देत लाभार्थ्यांना आधार लिंकिंग, बँक खाते लिंकिंग आणि इतर प्रक्रिया समजावून सांगितल्या. या शिबिराला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शासनाच्या सेवा घरपोच मिळाल्याने समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानण्यात आले

Read More

आगामी जामनेर नगरपरिषद आणि शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढविण्याचा निर्णय

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर – आगामी जामनेर नगरपरिषद आणि शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जामनेर नगरपरिषदेच्या १३ प्रभागांमध्ये पक्ष २६ उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. नगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून योग्य व लोकप्रिय उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, लवकरच त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे. या निर्णयामुळे जामनेर व शेंदुर्णी परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीच्या रणांगणात जोरदार तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकीचे अध्यक्षस्थान नानाभाऊ पाटील यांनी भूषवले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ चीतोडिया यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी स्थानिक पातळीवरील मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न

जळगांव –येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” चे मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे व खासदार तथा मंत्री रक्षा खडसे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रीय सदस्य नोंदणी, नवीन मंडल रचना व बूथ रचना बाबत मार्गदर्शन करून कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, आमदार श्री. सुरेशजी भोळे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण व भाजपा जिल्हा प्रमुख पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Read More

जामनेर-जळगाव रोडवरील खड्ड्यांचा ‘फोटोशूट’ – नगरपरिषद व ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह!”

जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर | प्रतिनिधीजामनेर-जळगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वास्तविकता आता उघड होत आहे.(दि. 28 ऑगस्ट 2025) दुपारी समाजसेवक अविनाश बोरसे यांनी जामनेर-जळगाव रोडवरील प्रचंड खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक आगळावेगळा मार्ग निवडला. त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून “फोटोशूट” करून नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजी कामावर तिखट टीका केली. अविनाश बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले: “नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपये खर्च करूनही जामनेर-जळगाव रोडची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.” स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून भविष्यात दर्जेदार रस्ते बांधकाम व्हावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Read More

पंढरपूरात राज्यस्तरीय पुरस्कारांचा जल्लोषविविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव – भगवंत पांडुरंगाच्या साक्षीने सोहळ्याला उत्साहाची उधाण – वाकडी च्या बाळु जोशी याना सन्मानित

वाकडी.ता.जामनेर.दि.२/०४/२६सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यात बाळू जोशी वाकडी ता जामनेर दैनिक सकाळ चे पत्रकार यांना हि सन्मानित करण्यात आले . या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर ! आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी निवेदन शैलीने महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ऐश्वर्या चासकर यांना या मंचावर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजातील जादू, मंचावरील आत्मविश्वास आणि प्रत्येक कार्यक्रमाला उंची देण्याची कला यामुळे त्या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना भरभरून दाद दिली. या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, वृक्षमित्र, आरोग्यदूत, क्रीडारत्न, नारिशक्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, जीवन गौरव, उत्कृष्ट सरपंच, आदर्श शेतकरी, संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते. भगवंत पांडुरंगाच्या पवित्र भूमीत झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली. उपस्थितांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभघेता आला तसेच कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19 वे वंशज सावता महाराज वसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, वनरक्षक अधिकारी अनिता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रणव परिचारक, द युवा ग्रामीण पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, ऐकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार, राज्याध्यक्ष शकील मनियार, सचिव बाळासाहेब कोठुळे, महिला सचिव मंगलताई सासवडे, महाराष्ट्राची भूमी मुख्य संपादक आनंद बारवकर, सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पुणे जिल्हा कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी, जळगाव जिल्हा कार्यकारिणी, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, समाजातील कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. विशेषतः ऐश्वर्या चासकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला एक ग्लॅमर आणि अभिमानाची झळाळी प्राप्त झाली.

Read More

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. JBN जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.JBN मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.JBN या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विजेत्या कुस्तीपट्टूना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला!– मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल

जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला. सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 🟩 प्रशासनाकडून विशेष आवाहन:जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल. अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल

Read More
error: Don't Try To Copy !!