जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

तोरनाळेनजीक दुचाकीची ट्रॅक्टरला धडकपती-पत्नीचा जागीच मृत्यू,दीड वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली

वाकडी.ता.जामनेर.दि.२३/०४/२६ जामनेर । मुलीला डॉक्टरांकडे दवाखान्यात दाखवून घराकडे परत जात असलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीचा बुधवारी रात्री जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना तोरनाळे गावाजवळ घडली. सुदैवाने दीड वर्षाची मुलगी बचावली आहे. जामनेर देऊळगाव गुजरी रस्त्यावर हा अपघात झाला. गोपाल वासुदेव खडके (३६) व सोनाली गोपाल खडके (३० रा. सावळतबारा, ता. सोयगाव) हे पती पत्नी फत्तेपुर येथुन सावळतबारा गावाकडे परत जात असतांना तोरनाळे गावाजवळ रस्त्यावर उभे असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात खडके दांपत्याचा जागीच मृत्यु झाला. जामनेर येथील आरोग्यदुत जालमसींग राजपुत यांनी त्यांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असुन गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ झालेल्या या भीषण अपघगातात एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणी

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजि. प. शाळा नवीदाभाडी येथील विद्यार्थी व पालकांनी ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याकडे शाळेतील बदलीपात्र शिक्षकांची बदली न होण्यासाठी साकडे घातले. जि. प. शाळा नवीदाभाडी येथे तीन शिक्षक कार्यरत असून त्यामधील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांच्या बदली होऊ नये यासाठी आज गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवीदाभाडी या गावातून अनेक पालक, महिला आणि शाळेतील मुले गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. विद्यार्थी म्हणाले,आमच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही.आम्हाला तेच शिक्षक द्या आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात,असे कथन ना.मा. गिरीश महाजन यांना सांगत होते. सदर प्रकरणाची पालकांकडून माहिती घेतली असता सदर शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला यावर्षी ‘”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या शाळेतील विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप मध्ये सहा ते सात विद्यार्थी पात्रता धारक असतात. सदर शाळेत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एम .टी .एस परीक्षाचे अभ्यास वर्ग घेतले जातात आणि विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकतात. आता झालेल्या जामनेर टॅलेंट सर्च ( जे. टी. एस.) परीक्षेत जामनेर तालुक्यातून इयत्ता चौथीतील विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी नवीदाभाडी शाळेचे आहे. अशा प्रकारची शाळेची यशोगाथा या शिक्षकांनी निर्माण केलेली आहे असे गावकऱ्यांनी सांगितले.म्हणून गजानन मंडवे व ऋषिकेत शिंदे या शिक्षकांची बदली थांबवावी अशी पालकांची शाळेतील मुलांची व महिलांची मागणी होती.

Read More

समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या

मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवआपल्या जिद्दीला साथ माणुसकीची!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली एक स्तुत्य उपक्रम जामनेर येथे राबविण्यात आला. सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभाग, एस.आर. ट्रस्ट (मध्यप्रदेश), ALIMCO आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे आणि तात्काळ वितरण करण्याचे शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर येथे संपन्न झाले. या उपक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम अवयव वाटप केले. आधुनिक तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड मिळाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही एक अत्यंत भावनिक आणि गौरवाची अनुभूती असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.या उपक्रमात अनेक दिव्यांगांना तात्काळ अवयव आणि सहाय्यक उपकरणे मिळाली, ज्यामुळे त्यांना आयुष्याला नव्याने सुरुवात करता येणार आहे. मंत्री महाजन यांनी आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील काळात असे उपक्रम अधिक ठिकाणी राबवण्याचे आश्वासन दिले.या अभिनव उपक्रमातून समाजात दिव्यांगांविषयी जागरूकता निर्माण होत असून, त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही खुला होत आहे.

Read More

पाळधी जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शैलेश पाटील, व तुळशीराम वाघ होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की शिक्षणात कधीही खंड पडू देऊ नका.आई वडिलांचे,आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.ते पुढे म्हणाले तुम्ही डॉक्टर ,इंजिनियर,शिक्षक, व्यवसायिक बना,जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा.मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी एक चांगला माणूस बना अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.शाळेतील शिक्षक चंदन राजपूत, संभाजी हावडे, सतीश बावस्कर, जितेंद्र नाईक, अमित मुंडे,मगंला धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोंबे, सदस्य मनोज नेवे,नाना माळी, गजानन राजपूत, विनोद पाटील,अशोक पाटील, विकास धनगर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Read More

तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांचा पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा,तर बँकांकडून पीककर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्याला होल्ड.

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याना पीककर्ज भरण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून तगादा लावण्यात येत आहे.तर बँकांनी पीककर्ज थकीत शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. एकीकडे पूर परिस्थितीमुळे हाताचे पिक वाया गेले आहे तर दुसरीकडे जेमतेम उत्पन्न शेतकऱ्याच्या घरात येण्यास सुरुवात झाली आहे.तर पिक मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.या सर्व गोष्टींचा परिणाम कमी की काय म्हणून राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावला आहे. शासनाने पीककर्ज वसुली साठी तगादा लावू नये असे आदेश असताना देखील मात्र राष्ट्रीयकृत बँकांना यांची काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.तरी राज्यातील शासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन याकडे बँकांना सक्त आदेश देऊन याबाबत कठोर कारवाई बँकावर करण्यात यावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read More

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी पहूर प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पहूर येथे गृहपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कामामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचू शकली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि पुढारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहोरात्र मेहनत घेतली. गर्दीचे योग्य नियोजन करून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तू मिळाल्याची खात्री केली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचवण्यात आली, याचे समाधान लाभार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होते.याप्रसंगी खालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलीपहूर भारतीय जनता पक्ष कार्यालयांचे प्रमुख राहुल ढेंगाळे, व सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, चेतन रोकडे,जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख तसेच वासुदेव घोंगडे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पांडे, शाम सावळे, महेश पाटील, लक्ष्मण गोरे, ईश्वर बारी, सलीम शेख, भारत पाटील, संदीप बेढे, मधुकर बनकर, शिवाजी राऊत, शरद बेलपत्रे, योगेश बनकर, शुभम गोधनखेड़े यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

Read More

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ मार्फत आयोजित महिला दिन व पारिवारिक कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने महिला दिन व पारिवारिक मेळावा तसेच २०२५-२७ या कालावधीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महिला सशक्तीकरण व कुटुंबसंस्था यांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तसेच वीज कामगार महासंघाच्या योगदानाचे कौतुक करत संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महिला कामगारांच्या योगदानाबाबत विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सदस्यांनी महासंघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More
error: Don't Try To Copy !!