Headlines

राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.

मुबंई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगडसोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरमहेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहरयोगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूरबच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक,रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूरराकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीसउपदेश, बृहन्मुंबईअर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोलामंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूरराजातिलक रोशन – सहायक पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस उप, बृहन्मुंबईबाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघरपोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणयतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघरसौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेमोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गविश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक,रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती

Read More

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्तचंदूअण्णा नगर स्टॉपजवळ कारवाई; एक ब्रास वाळूसह स्वराज ट्रॅक्टर ताब्यात, चालक फरार

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चंदूअण्णा नगर स्टॉपजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक ब्रास अवैध गौण खनिज वाळूसह स्वराज ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ४ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिसांना परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित परिसरात कारवाई करत संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी वाहनाची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता वाळू वाहतुकीबाबत समाधानकारक माहिती अथवा आवश्यक परवानगी उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू असा सुमारे ४.२४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.दरम्यान, कारवाईदरम्यान संबंधित वाहनाचा चालक पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तसेच पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.जळगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे.🔻 पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.

Read More

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी

पहाटेच्या सुमारास आसोदा-मुरबाड बायपासवर भीषण अपघातजळगाव | प्रतिनिधी : आसोदा ते मुरबाड बायपास रस्त्यावर सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास तवेरा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रावेर तालुक्यातील एका शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शांतराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा वाहनातून काही मजूर प्रवास करीत असताना आसोदा-मुरबाड बायपासवर समोरून अथवा मार्गावरील ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तवेरा वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले.या अपघातात शांतराम पाटील यांच्यासह रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन, निखिल पाटील व चालक जितेंद्र रुपलकर हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शांतराम पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच �⁠जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. प्राथमिक तपासानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मृत शांतराम पाटील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिंदखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.

Read More

पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!

आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा जळगांव | प्रतिनिधीपोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारापुणे | प्रतिनिधीअंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे. अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे. आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.

Read More

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नर | प्रतिनिधीमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या कुटुंबाला दरोडेखोरांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यात समोर आली आहे. महामार्गावर धारदार वस्तू टाकून कारचे टायर फोडण्यात आले. कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची माहिती आहे. या घटनेत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर परिसरातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी महामार्गावर धारदार वस्तू पसरवून ठेवल्याचा संशय आहे. त्यावरून काही वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागली.याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरकडून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचेही टायर फुटले. अचानक टायर पंचर झाल्याने चालकाने कार थांबवली. मात्र, कार थांबताच परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी संधी साधली.शस्त्रांचा धाक दाखवत लूटदरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.या दरोड्यात सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.समृद्धी महामार्गावर यापूर्वीही चोरी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Read More

जामनेर शहरात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांचे पेट्रोलिंग

व्यापारी व नागरिकांशी साधला थेट संवाद; कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा जामनेर | प्रतिनिधी : जामनेर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पेट्रोलिंग करत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी शहरातील प्रमुख भागांना भेट देत व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले. पेट्रोलिंगदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांची भेट दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे या मार्गावरून जात असताना पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याठिकाणी थांबून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या पेट्रोलिंगचे महत्त्व असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रत्यक्ष पेट्रोलिंगमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

Read More

शिवसाई कन्स्ट्रक्शन ची हुकूमशाही सुरुकायद्याला न मानणाऱ्या या शिवसाई कंट्रक्शन ने माजवला हुकूमशाहीचा तांडव

दिनांक 01/112025 जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी) अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत. या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे

Read More

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे

पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

Read More

वाकडी येथे जय बजरंग गणेश मित्र मंडळाचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात

ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती वाकडी (प्रतिनिधी) : वाकडी गावातील जय बजरंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता गणपती विसर्जन सोहळ्याने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. गणरायाच्या विसर्जनानिमित्त मंडळाच्या वतीने विशेष सजावट करण्यात आलेल्या वाहनातून श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी तसेच मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गावातील नागरिक, महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य करत आणि जयघोष करत गणरायाला निरोप दिला. यावेळी अनेक भाविकांनी गणरायाच्या चरणी पुढील वर्षी पुन्हा आगमनासाठी प्रार्थना केली. संपूर्ण विसर्जन मिरवणूक उत्साह, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली. जय बजरंग गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन सोहळ्याचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडला. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. या विसर्जन सोहळ्यात मंडळाचे वैभव देशमुख, रविंद्र राजपूत, मनोज दांडगे, आशुतोष गायकवाड, हर्षल दांडगे आणि बबलू राजपूत यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. अखेर भक्तिभावाने गणरायाला निरोप देत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करण्यात आला आणि यंदाच्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली. 🙏 जय बजरंग गणेश मित्र मंडळ, वाकडी🌺 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏

Read More

भुसावळमध्ये तरुणाचा खून; १७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात

पाटील मळा परिसरातील घटनेने खळबळ; आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर हल्ला करून त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५) यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे एका महिलेच्या आईशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अल्पवयीन असल्याने त्याची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय होते, वाद नेमका कशामुळे झाला आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाटील मळा परिसरासह भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!