Headlines

पहूर कसबे ग्रामसभेत अधिकाऱ्यांवर संतप्त हल्लाबोल !आजी – माजी ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव? ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा !

पहूर, ता. जामनेर :पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयातील आजची ग्रामसभा संतापाच्या वातावरणात पार पडली. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्याने दप्तर सुपूर्द केले नाही, या गंभीर प्रकारावरून ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी थेट सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जातंय?” असा त्यांचा संतप्त सवाल सभागृहात चर्चेचा विषय ठरला. गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता प्रशासक सौ. आशाताई शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की,माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून, मागील कार्यकाळातील दप्तर अद्याप त्यांच्याच ताब्यात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सार्वजनिक कार्यालयाचे दप्तरच उपलब्ध नसेल, तर जनतेला माहिती वेळेत कशी मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर दप्तर हे ग्रामपंचायत कार्यालयातच आहे, शासकीय दप्तर मी घरी कशाला घेऊन येऊ? असा प्रश्न करून त्यांनी दप्तर ग्रामपंचायत मध्येच शोधण्याचा सल्ला दिला. माहिती अधिकारालाही अडथळादप्तर उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती वेळेत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पार्टटाईम अधिकाऱ्यांमुळे कारभारावर परिणाम पहूर कसबे सारख्या मोठ्या गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी मांडले. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही कार्यभार असल्याने स्थानिक समस्या दुर्लक्षित होत असल्याची तक्रार करण्यात आली. पहूरसाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्याग्रामसभेत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाघूर धरणाची पाणी योजना अद्याप सुरू न होणे याविषयी मधुकर पवार अशोक जाधव यांनी आवाज उठविला .स्मशानभूमी व गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैकुंठ रथ व शववाहिकेची गरज, शेंदुर्णी मार्गावरील दिव्यांची अनियमितता, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सवलत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली . गट क्रमांक १३५८ अतिक्रमण हटविण्याची तीव्र मागणी माजी उपसरपंच युसूफ बाबा यांनी करून पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला .श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील पर्यटन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये ठेकेदारांची मनमानी व दडपशाही याविषयी विश्वस्त किशोर बनकर व अशोक जाधव यांनी आवाज उठवला . ग्रामसभेच्या प्रारंभी प्रगणक शंकर भामेरे यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेला आजी-माजी पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच, दप्तर न सुपूर्द करण्याच्या प्रकारामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा कारभार चर्चेत आला असून, आता या प्रकरणात ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

जामनेर – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा याच्या तर्फे पितृ दिवस निमित्त

दि.15 जूनला पितृ दिवस निमित्त“यु डोन्ट नो माय डैड”*[“तुम मेरे पापा को नही जानते”] वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते।वक्तृत्व स्पर्धामधे 30 स्पर्धकानी सहभाग घेतला होता आणिसर्वानी प्रेम आणि उत्साहात आपापल्या वडिलांच्या बाबतीत काही कटु कही गोड अनुभव सर्वांसमोर मांडले।स्पर्धेचे निकाल दोन सन्माननीय अतिथी डॉ. पराग पाटील एवं राजुलजी शाह यांनी काढले। त्यांचा पण सत्कार आणि सन्मान केला गेला।या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व.रतनलालजी मुलचंदजी कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री इन्दरचंदजी रूपेशकुमारजी कोठारी परिवार,जामनेर यानी केले होते।या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड विकास कोठारी, कुशल बोहरा,सौ.मोना चोरडिया,सौ मनीषा कोठारी यांनी कार्यक्रमात पूर्ण योगदान दिले।स्पर्धेचे विजयी सदस्याना प्रथम पुरस्कार ₹500 द्वितीय पुरस्कार ₹300 तृतीय पुरस्कार ₹200 याप्रमाने तीन्ही गृप मधे वितरित केले।सर्व विजयी प्रतिस्पर्धी चे नाव खालील प्रमाणे आहेग्रुप 1

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण….

*जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण…..जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

आचार्य गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सौ.पी.सी.पाटील यांची नियुक्ती

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथे सौ. प्रतिभा चंद्रशेखर पाटील यांची प्राचार्य/मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी पदभार सौ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे सहसचिव दादासो यू. यू. पाटील उपस्थित होते. त्यांनी सौ. पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सौ. पाटील यांना 30 वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव असून, या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी हितासाठी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, माजी सहसचिव कै. आप्पासाहेब पी. एस. पाटील यांच्या संस्कारांचा तसेच वडील माजी को-ऑपरेटिव्ह ऑफिसर कै. एस. के. पाटील यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येईल. तसेच संस्थेचे पदाधिकारी दादासाहेब गरुड, आबासाहेब भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो. गो. सूर्यवंशी व संचालक मंडळ यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे पती व किमान कौशल्य विभागाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. सौ. प्रतिभा पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जि.प.मराठी शाळा वाकडी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संदीप परदेशी यांची निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.११/१०/२५ जि.प.मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी संदीप परदेशी व उपाध्यक्ष अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली,ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली, सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप परदेशी,तर उपाध्यक्षपदी अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,सदर वाकडी केंद्रचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली, तसेच सभेकरिता पालक वर्ग देखील उपस्थित होते,यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा वाकडी मुलांचे पालक आनंदा जोशी,कोमल सिंग राजपूत,गौतम लोखंडे, अतुल न्हावी,सौ.सोनाली कोळी,सौ.जयश्री बिडके,शकीला तडवी,सौ.ज्योती कोळी,सौ.उज्जला राजपूत, युवराज बिजागरे, रमेश गायकवाड,या मान्यवरांनी समितीवर करण्यात आली,सदर सभेची रुपरेखा सुर्याजी काकडे यांनी मांडली यांनी यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवडे,शेखर महाजन,प्रकाश कुमावत आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Read More

कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा | प्रतिनिधीचोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

तरुणाला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रपरिवारा कडून सोशलमिडिया वरती आवाहण

वाकी खुर्द (ता. जामनेर) येथील २२ वर्षीय तरुण रितेश शांताराम माहोर याला भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. काल ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात त्याला जबर मार लागला असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. रितेशच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, आतापर्यंतच्या उपचारांसाठी २ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील उपचारांसाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी ही मोठी आर्थिक अडचण असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आपली मदत थेट पोहोचवण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करून आर्थिक मदत करता येईल. छोट्या मदतीतूनही मोठा आधार मिळू शकतो. आपली मदत रितेशला नवजीवन देऊ शकते! (कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क साधावा.)

Read More
error: Don't Try To Copy !!