Headlines

वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता शेळगाव उपसरपंच निळकंठ पाटील यांनी अन्नदान करून वाढदिवस केला साजरा.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते. आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

शिवसाई कन्स्ट्रक्शन ची हुकूमशाही सुरुकायद्याला न मानणाऱ्या या शिवसाई कंट्रक्शन ने माजवला हुकूमशाहीचा तांडव

दिनांक 01/112025 जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी) अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत. या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे

Read More

जामनेर सोंनबर्डी येथे 15 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्य,नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह??

जामनेर सोंनबर्डी येथे स्विमिंग पुल मध्ये 15 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामुळे स्विमिंग पुल बांधकाम आणि त्यासाठी ची नियमावली बघता. स्विमिंग पूल व्यवस्थापन आणि परवानगी देणारे प्रशासन झोपा झोडत होते का?? स्विमिंग पूल हा क्रीडा प्रकारात येतो. परंतु, कोणत्या क्रीडा प्रकारासाठी सदर पुल बांधण्यात आला. त्यामुळे याला परवानगी देत असताना अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का??त्यानंतर पुलाची रचना बघता येथे नियमानुसार तज्ञ मार्गदर्शक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध का नव्हत्या???सदर पुल मध्ये उतरतांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोणीही कसे या खोल पुलात उतरून पोहू शकते??असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिका प्रशासन आणि क्रीडा विभाग वेळोवेळी तपासणी करीत होते का??हा ही प्रश्न मोठा जिकरीचा झाला आहे. यामुळे एका निष्पाप जीवाला हकनाक बळी जावे लागले असल्याचे मत जनमानसात आहे.यावर आता प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांच्या नजरा लागून आहे. की, राजकीय वरद हस्तात प्रकरण निकाली निघेल हे बघणे औचीत्याचे ठरेल.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

गरुड महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन…. .

आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील व विशेषतः मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांच्या मदतीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शेंदुर्णी गावात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले .सदर रॅलीमध्ये महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या रॅलीच्या माध्यमातून शेंदुर्णी गावात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करून एकूण १३०००(तेरा हजार) रुपयाची आर्थिक मदत मिळविली .यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या स्वेच्छेने मदत दिली .सदर मदत फेरीमध्ये महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भूषण पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अजिनाथ जीवरग ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता चंद्रकांत पाटील ,सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे, कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप कुंभार , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. मुकेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. अमर जावळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आप्पा महाजन, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. महेश पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालयाच्या रॅलीबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव गरुड , संस्थेचे व्हा चेअरमन मा. श्री. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सह सचिव दादासाहेब यू यू पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले..

Read More

कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्न

लोहारा ता. पाचोरा दि.१९कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील भाजपा सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली.विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन ,गरीब कल्याणाची या अकरा वर्षाच्या काळातील लेखा जोखा मांडण्यासाठी मा. नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन कुऱ्हाड येथे दि.१९ रोजी आयोजन करण्यात आले.या सभेचे अध्यक्ष पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे होते. सभेचे वक्ते जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती माजी सभापती सुभाष पाटील, कैलास चौधरी, शरद सोनार हे होते. यावेळी क्त्यांनी मोदीजींच्या काळात झालेली विकास कामे सांगितले. , तसेच कलम 35 अ,देशातील जनतेच्या भावनांची कदर करून ३७० वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेऊन दाखवला. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानप्रेरित होता हे भारताने जगाला ठणकावून सांगितले.तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, महा डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे थेट अनुदान, शेतीसाठी लागणारे उपकरणे जसे की ट्रॅक्टर, रोटर, पेरणी यंत्र, उज्वला योजनेत मोफत गॅस सिलेंडर. तसेच शेतकऱ्यां साठी मागेल त्याला सोलर, सूर्य घर योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कुठलीही पायपीट न करता मिळत असल्याचे सांगितले. खाजगी वाहनधारकांना तीन हजार रुपयां मध्ये वर्ष भारतासाठी नॅशनल हायवे वरील टोल साठी पास मिळत आहे.देशात ८० कोटी गरीब जनतेला दरमहा पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. अश्या अनेक योजना मोदीजींच्या काळात जनतेला मिळत आहे.मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा गेल्या अकरा वर्षांत कायापालट झाला आहे व होतो आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा मोठा विश्वास आहेच, यापुढेही जनता त्यांना साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे असे वक्त्यांनी सांगितले.यावेळी भाजपा पाचोरा पूर्व अध्यक्ष शोभाताई तेली,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मुकेश पाटील,शेतकी संघ संचालक शिवदास तात्या पाटील, प्रकाश पाटील, नरू बापू पाटील तसेच लोहारा-कुऱ्हाड-गोराडखेडा गटातील शेतकरी, नागरिक, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते , गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती प्रमुख, केंद्रप्रमुख , बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख , विभागातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.प्रास्ताविक शरद सोनार, सूत्रसंचालन कैलास चौधरी तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.

Read More

सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रेचे आयोजनराजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक यात्रा

जामनेर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, शिवकार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यभरातील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!