Headlines

अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More

जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांना राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

नाशिक येथे संपन्न झालेल्या एका भव्य कार्यक्रमात जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय न्यायमूर्ती वसंतराव शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वीरपत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक नामको बँकेचे चेअरमन आप्पासाहेब संतोष मराठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जितेंद्र पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

प्र. प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना उत्कृष्ट समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार……

शेंदुर्णी ता.जामनेर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सह समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार मा.श्री मनोज चौधरी उपमहापौर, महापालिका, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आला . त्यांच्या सोबत मा.श्री चंद्रशेखर पाटील स्थायी समिती सभापती, महापालिका जळगाव ,मा.श्री दिपक सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष जळगाव ,श्री.गजानन देशमुख, माजी नगरसेवक,श्री शिवाजी पाटील, शिक्षण संस्था चालक धरणगाव,श्री मनोज कोळपकर, गृहरक्षक समादेशक, जळगाव ,नगरसेवक श्री संजय देविदास सूर्यवंशी , शेंदुर्णी , तसेच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा .दादासाहेब संजयराव गरुड वप्रा. सुनील गरुड सर, जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.सत्कार व सन्मान केल्याबद्दल प्र.प्राचार्य डॉ. संजय भोळे व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

Read More

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन सोयगाव तालुका.. प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व ग्रामपंचायतबॉडी व ग्रामसेवक यांच्या नाहक हलगर्जीपणामुळे देव्हारी पिंपळवाडी इथून वाटर सप्लाय विहिरीवरून येणारी मेन पाईपलाईन वरती देव्हारे येथील शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून आपल्या शेतात शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी पाईपलाईन करून घेतली आहे व त्यातूनच नव्हे तर सावळदबारा फाट्याजवळ सुद्धा काही अज्ञात लोकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे ग्रामपंचायत सावळदबारा कार्यालयाला व संबंधित सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करता 24 तास पाणी सुविधा देण्यात येत आहे पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळद बारा ग्रामपंचायतची व अवधरीत्या पाणी उपसा तेथील शेतकरी काही लोक सर्रासपणे शेतीला व इतर कामाला पाणी घालत आहे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकीमध्ये उशिरा पाणी येते आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना भोगाव लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन वरती कारवाई न केल्याने काही देणे घेणे करून नळ कनेक्शन देण्यात आले आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाणी जास्त प्रमाणात लागत आहे अवैध नळ घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे नळ कनेक्शन घेतली जात आहेजब्बार तडवी ,(सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा सर्कल

Read More

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे

पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

Read More

अतिवृष्टी अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; आठ दिवसांत निधी वर्गाचे आश्वासन

जळगाव : अतिवृष्टी अनुदान वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे धाव घेत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल अधिकारी अंगद कासटकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल असे स्पष्ट केले. या आंदोलनात सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे आणि विशाल भगत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Read More

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उप शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जामनेर येथून रावेर येथे बदली झालेले श्री विष्णू वामन काळे यांच्याकडून जामनेर प्रभारी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेणे बाबत निवेदन देण्यात आले.जामनेर येथे कार्यरत असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री विष्णू वामन काळे यांची 13 मे 2025 रोजी जामनेर येथून रावेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती मात्र अद्यापही श्री विष्णू काळे यांनी आपला पदभार जामनेर येथून सोडलेला नाही. रावेर येथील पूर्ण वेळ पदाचा कारभार न पाहता जामनेर येथील अतिरिक्त पदभार स्वीकारण्यात इतके स्वारस्य का? असा प्रश्न जामनेर तालुक्यात शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनला आहे कारण गेल्या 10 ते 12 वर्ष जामनेर तालुक्यात ठाण मांडून बसलेले श्री विष्णू काळे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे. असा सवाल निर्माण होत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी श्री विष्णू काळे यांची जामनेर गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मात्र जामनेर तालुक्यात नावीन्य पूर्ण व पात्रता असलेले तीन – तीन कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना रावेर येथे नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार कोणत्या अनुषंगाने देण्यात आला याबद्दल जामनेर तालुका अनभिज्ञ आहे. तालुक्यातील तिन्ही कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी हा पदभार स्वीकारण्यास पात्र असताना व संबंधित शिक्षण खात्याचा कारभार पाहण्यासाठी सक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना इतर तालुक्यात बदली करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर ही कृपादृष्टी तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी जामनेर येथील विद्यमान प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री . विष्णू वामन काळे यांची जामनेर येथून तात्काळ उचल बांगळी करून त्यांना रावेर येथील पदभार देण्यात यावा व जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी यापैकी एका सक्षम व कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी यांची अतिरिक्त गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे . असं न घडल्यास बदली या संकल्पनेवर कर्मचारी व अधिकारी यांचा विश्वास राहणार नाही तो विश्वास उडेल म्हणून आपण ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या “क” व “ड” श्रेणीतील कर्मचारी बदली प्रक्रियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणताही वशिला व आकस मनात न ठेवता, बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका मनसे स्टाईल ने कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मीक कोळी , जगदीश कुरकुरे , रतन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

जामनेर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिन –तहसिलदार श्री आगळे यांनी नागरिकांच्य ऐकुन घेतल्या समस्या तक्रारी

जामनेर – ( प्रतिनिधी )जामनेर तहसिल कार्यालयाततालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!