Headlines

साखर विक्रीच्या नियमांत मोठा बदल; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

साठेबाजीला बसणार चाप, सप्टेंबरपासून साखर कारखान्यांसाठी पंधरवड्याचा विक्री कोटा नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून साखर कारखान्यांसाठी असलेली मासिक कोटा पद्धत रद्द करून पंधरवड्याची (Fortnightly) विक्री कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा नियमित राहण्यास मदत होणार असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. महिन्याऐवजी आता पंधरवड्याचा कोटा सध्या साखर कारखान्यांना महिन्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा दिला जातो. मात्र, काही ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीला विक्री झालेली साखर प्रत्यक्षात महिन्याच्या शेवटी उचलली जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाजारात काही काळ साखरेची उपलब्धता कमी भासून कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने आता पंधरवड्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीत कारखान्यांना त्यांच्या वाटपातील किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार असून उर्वरित साखर त्यानंतरच्या आठवड्यात विकावी लागेल. विकलेली साखर ७ दिवसांत पाठवावी लागणार केवळ साखर विक्री करून ती कारखान्यातच पडून राहू नये, यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम केला आहे. विक्री झालेली साखर सात दिवसांच्या आत कारखान्यातून डिस्पॅच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे साखर कारखान्यांपासून व्यापारी, वितरक आणि पुढे किरकोळ बाजारापर्यंत साखरेचा प्रवाह वेगाने होण्यास मदत होईल. साठेबाजीवर सरकारची करडी नजर साखरेच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर साठ्याची देशव्यापी तपासणीही सुरू केली आहे. काही साखर कारखान्यांकडे त्यांच्या मासिक अहवालात दाखवलेल्या साठ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक साखर असल्याचे तपासणीत आढळल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय, काही कारखाने त्यांना मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा कमी साखर विकत असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे बाजारातील पुरवठा कृत्रिमरीत्या कमी होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता दरम्यान, सरकारच्या उपाययोजनांनंतर साखरेच्या एक्स-मिल किमतीत अलीकडच्या दिवसांत सुमारे २० टक्क्यांची घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. किरकोळ बाजारातील दरही खाली येण्यास सुरुवात झाली असून त्याचा फायदा पुढील काळात ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या मते, देशात साखरेची कमतरता नसून साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे दरवाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पंधरवड्याचा कोटा, सात दिवसांत डिस्पॅच आणि साठ्याची तपासणी या उपायांमुळे बाजारातील साखरेचा पुरवठा अधिक पारदर्शक आणि नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More

भारतीय जैन संघटना जामनेर व श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय जामनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शाकाहार दिवस यानिमित्ताने फन एन फूड फेअर चा कार्यक्रम संपन्न

दि 15 ऑक्टोबर,2025 वार-बुधवार ला आयोजित केला गेला होता।सदर कार्यक्रमात फूड स्टॉल,गेम स्टॉल,विक्री स्टॉल ( गृहउपयोगी सामान विकण्यासाठी)जैन ते जैन व्यापार वृद्धी च्या हेतूने 22 सहभागी स्टाल होते.विशेष सर्व स्टॉल वरील खाद्यपदार्थ जैनपदार्थ होते व यामध्ये संपूर्ण जैन शहरवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी सुरेशचंद धारिवाल सचिव श्री जैन ओसवाल भागीरथी वाचनालय,प्रविण बोहरा ओसवाल श्री संघ कार्यकारिणी सदस्य,सुमित मुनोत- बीजेस खानदेश उपाध्यक्ष,विकास कोठारी-जळगाव जि उपाध्यक्ष,कुशल बोहरा-शहर अध्यक्ष,संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार,विकास ललवाणी,हर्षल बोहरा,रितेश कोठारी, महिला विंग जिलाध्यक्ष सौ सोनल कोठारी, महासचिव सौ संगीता मंडलेचा,सौ राखी लोढा,सौ मनीषा कोठारी,सौ वंदना चोरडिया,सौ स्नेहल मुनोत इ. सदस्य उपस्थित होते.प्रोजेक्ट हेड-डॉ दिपक कोठारी,आदित्य मंडलेचासौ मोना चोरडीया,सौ रुपाली बोहरा यांनी कार्य पाहिले।सर्व स्टॉल मधून खाद्य स्टॉल चे विजयी सौ दिपाली चोरडिया ,विक्री स्टॉल चे विजयी कर्णावट,गेम स्टॉल चे विजयी मित लुंकड एवं राहत जैन होते या सर्वांना वाचनालयाकङून उपहार देऊन सन्मानित केले गेले.

Read More

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यशजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवराष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे . प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी .१) यश अनिल डोंगरे२) निशा गजानन पाटील३) प्राची प्रवीण पाटील४) नेहा उल्हास पाटील५) सोनल मनोज भामरे६) सृष्टी नंदू शेळके७) अंकिता योगेश पाटील८) रितिका रवींद्र पाटील९) दिशा नंदकिशोर सुरळकर१०) भावेश गणेश काठोटेसर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी महाजन सर समिती प्रमुखश्री डी एच परदेशी सरसहप्रमुख श्री सी यू पानपाटील सर वश्री व्ही ए पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व गुणवंतांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील व सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले

Read More

जळगाव येथे सूर्या फाऊंडेशन आयोजित खान्देश करिअर महोत्सवात राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्था पुरस्कार प्रदान

जळगाव येथील जी.एस.ग्राउंड मैदानावर सूर्या फाऊंडेशन यांच्यावतीने खान्देश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था,शिक्षक,महिला यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक,शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण,आरोग्य,महिला बाल विकास युवा कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.भगवानसिंग डोभाळ यांच्या राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेच्यावतीने कोषाध्यक्ष श्री गणेश शिवसिंग डोभाळ,राजकुंवर कॉलेज फर्दापूरचे उपप्राचार्य डॉ अंबरसिंग बेडवाल, प्रा.ईश्वर चोरडिया हे उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवानसिंग डोभाळ ,सचिव सौ संगीता डोभाळ,प्रशासकीय अधिकारी श्री अमित राजपूत, यांच्यासह संस्थेचे सदस्य सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

पाळधी केंद्रात केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा संपन्न

पाळधी : इंग्रजी भाषेचे ज्ञान, शब्दसंपदा व अचूक शब्दलेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने समूह साधन केंद्र, पाळधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जि. प. केंद्र शाळा, पाळधी येथे झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत विविध गटांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले इंग्रजी शब्दलेखन कौशल्य दाखवून दिले. स्पर्धेतील गटनिहाय विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे— गट क्र. १🥇 देवांश निलेश धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द🥈 कृष्णा अमोल पाटील — जि. प. शाळा, सोनाळे गट क्र. २🥇 संस्कृती समाधान पाटील — जि. प. शाळा, माळपिंप्री🥈 वंशराज समाधान धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द गट क्र. ३🥇 ऐश्वर्या दीपक पाटील — जि. प. शाळा, सोनाळे🥈 मंगेश कृष्णा लांडगे — जि. प. शाळा, माळपिंप्री गट क्र. ४🥇 हर्षदा विशालसिंग पाटील — जि. प. शाळा, देवपिंप्री🥈 प्रगती संजय तिरमली — जि. प. शाळा, माळपिंप्री या स्पर्धेसाठी श्री. मुरलीधर बोंडे, श्री. मानसिंग परदेशी, श्री. किरण सपकाळे आणि श्री. संदीप सोनार यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख श्री. बाबुराव धुंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. इंग्रजी भाषेच्या सबलीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपले भाषिक कौशल्य सादर करण्याची प्रभावी संधी मिळाली. विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आता हे विजेते स्पर्धक तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. त्यांच्या यशाबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read More

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर : संघर्षापासून यशापर्यंतचा प्रवास; अभिनयासोबत सामाजिक कार्यातूनही उमटवला ठसा

विशेष व्यक्तिचित्र | JBN महाराष्ट्र NEWS भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि वास्तववादी व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. खलनायकापासून नायकापर्यंत, पोलीस अधिकाऱ्यापासून सामान्य माणसापर्यंत आणि विनोदी भूमिकांपासून भावनिक व्यक्तिरेखांपर्यंत विविध भूमिका साकारत त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच शेतकरी आणि गरजू नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक कार्यामुळेही त्यांचे नाव चर्चेत राहिले. बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील मुरूड-जंजिरा येथे झाला. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर असून, चित्रपटसृष्टीत ते नाना पाटेकर या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचे बालपण आर्थिक अडचणींच्या परिस्थितीत गेले. कुटुंबावर आलेल्या संकटांचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पुढे जाण्याचा निर्धार केला. नाटकांविषयी असलेली आवड आणि अभिनयाची ओढ यामुळे त्यांचा कल लहानपणापासूनच कलाक्षेत्राकडे होता. आयुष्यातील संघर्ष, सामान्य माणसाचे जीवन आणि समाजातील विविध स्तरांवरील अनुभव यांनी त्यांच्या अभिनयशैलीला वास्तववादी स्वरूप दिले. शिक्षण आणि अभिनयाचा पाया नाना पाटेकर यांनी मुंबईतील सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेतून कलाशिक्षण घेतले. शिक्षणाच्या काळात त्यांनी चित्रपटांची जाहिरात करणारी पोस्टर्स रंगवण्याचे कामही केले. आर्थिक परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. रंगभूमीवरील कामामुळे त्यांना अभिनयाचे बारकावे समजले. संवादफेक, देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि व्यक्तिरेखेच्या मानसिकतेचा अभ्यास या गोष्टी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये बनल्या. पुढे याच गुणांच्या जोरावर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. चित्रपटसृष्टीतील सुरुवात नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक छोट्या-मोठ्या भूमिका कराव्या लागल्या. मात्र, त्यांनी प्रत्येक भूमिकेतून आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘अंधा युद्ध’ आणि ‘सलाम बॉम्बे!’ यांसारख्या चित्रपटांमधील कामामुळे त्यांची ओळख वाढू लागली. त्यांच्या अभिनयात कृत्रिमतेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत गेल्या. ‘परिंदा’मधून राष्ट्रीय स्तरावर ओळख १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिंदा’ या चित्रपटाने नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीला महत्त्वाचे वळण दिले. या चित्रपटातील त्यांच्या प्रभावी अभिनयाची समीक्षकांनी दखल घेतली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रभावी अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले. गंभीर व्यक्तिरेखा साकारताना त्यांची संवादफेक, चेहऱ्यावरील भाव आणि भूमिकेतील तीव्रता विशेष लक्षवेधी ठरली. ‘क्रांतिवीर’ने मिळवून दिले मोठे यश १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्रांतिवीर’ हा चित्रपट नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात त्यांनी प्रताप नारायण तिलक ही व्यक्तिरेखा साकारली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि सामान्य माणसाच्या वेदना व्यक्त करणारा हा पात्रप्रकार प्रेक्षकांना विशेष भावला. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘क्रांतिवीर’मधील त्यांची भूमिका आजही त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक मानली जाते. गाजलेल्या चित्रपटांचा प्रदीर्घ प्रवास नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. ‘प्रहार’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’, ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’, ‘नटसम्राट’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. ‘अब तक छप्पन’मध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली, तर ‘वेलकम’मधील उदय शेट्टी या विनोदी व्यक्तिरेखेमुळे त्यांनी प्रेक्षकांना हसवले. गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारण्याची क्षमता त्यांच्या अभिनयातील विविधता दाखवते. ‘नटसम्राट’मधील अविस्मरणीय भूमिका २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नटसम्राट’ हा मराठी चित्रपट नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील विशेष महत्त्वाचा चित्रपट ठरला. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध नाटकावर आधारित या चित्रपटात त्यांनी गणपतराव रामचंद्र बेलवलकर या निवृत्त रंगकर्मीची भूमिका साकारली. आयुष्यभर रंगभूमीवर राजासारखे जगलेला कलाकार वृद्धापकाळात कौटुंबिक नात्यांमधील ताणतणाव, एकाकीपणा आणि बदलत्या परिस्थितीचा सामना करतो, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे. नाना पाटेकर यांनी या भूमिकेतील दुःख, आत्मसन्मान, भावनिक संघर्ष आणि असहायता प्रभावीपणे व्यक्त केली. ‘नटसम्राट’मधील त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा घडवून आणली. या चित्रपटामुळे नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या सामर्थ्याची ओळख झाली. पुरस्कार आणि सन्मान नाना पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ‘परिंदा’ आणि ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. ‘क्रांतिवीर’मधील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०१३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी मिळालेला हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. लष्करी प्रशिक्षण आणि देशसेवेची भावना ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले होते. या अनुभवामुळे लष्करी शिस्त, सैनिकांचे जीवन आणि देशसेवेचे महत्त्व जवळून समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांना प्रादेशिक सैन्यात मानद कॅप्टनपदही देण्यात आले होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील हा पैलू त्यांच्या अभिनयापलीकडील आवडी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतो. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्य नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्यातील महत्त्वाचा अध्याय म्हणजे ‘नाम फाउंडेशन’. मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने सप्टेंबर २०१५ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक संकट, पाणीटंचाई आणि ग्रामीण कुटुंबांची बिकट परिस्थिती हे गंभीर प्रश्न होते. या समस्यांवर मदतकार्य करण्याच्या उद्देशाने संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले. शेतकरी कुटुंबांना मदत, जलसंधारण, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे, पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न, गरजू कुटुंबांना घरे उभारण्यासाठी सहाय्य, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत आणि महिलांना रोजगारासाठी साधने उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांमध्ये संस्थेने सहभाग घेतला. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे चित्रपटसृष्टीतील लोकप्रियतेचा उपयोग सामाजिक प्रश्नांसाठीही करता येऊ शकतो, हा संदेश अनेकांपर्यंत पोहोचला. वैयक्तिक आयुष्य नाना पाटेकर यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्याशी झाले. त्यांना मल्हार पाटेकर हा मुलगा आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या अभिनय कारकिर्दीची आणि सामाजिक कार्याची चर्चा सार्वजनिक जीवनात अधिक झाली. साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची वृत्ती यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. प्रसिद्धीच्या झगमगाटातही ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न आणि सामान्य माणसाच्या अडचणी यांच्याशी जोडलेले राहण्याची त्यांची प्रतिमा अनेकदा चर्चेत राहिली. नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. उपलब्ध वृत्तांनुसार, गोव्यातील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांना वाचवता आले नाही. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची, प्रभावी अभिनयशैलीची आणि सामाजिक कार्याची पुन्हा एकदा चर्चा झाली. त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. अभिनयापलीकडचा माणूस नाना पाटेकर यांचे आयुष्य संघर्ष, मेहनत, अभिनय, लोकप्रियता आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रवास होते. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना हसवले, विचार करायला लावले आणि अनेकदा भावूकही केले. दुसरीकडे, ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी आणि गरजू कुटुंबांसाठी केलेल्या कामामुळे त्यांच्या जीवनाला सामाजिक कार्याचा वेगळा आयाम मिळाला. नाना पाटेकर यांचा प्रवास सांगतो की कलाकाराची ओळख केवळ…

Read More

जामनेरात रिपब्लिकन पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटनकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

जामनेर | प्रतिनिधी :जामनेर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.उद्घाटन कार्यक्रमाला रणजीत जोरे, गणेश सपकाळ, शेखर सुखाडे, यादव सुखाडे, विक्रम बनोडे, दादाराव मेहे, गोपाळ सपकाळ, नितीन सपकाळ, एकनाथ सपकाळ, प्रदीप लोखंडे पंचरासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जामनेर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Read More

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Read More

अवघ्या काहीच दिवसात बाप्पा आपल्या घरी येणार आहेत यानिमित्त खास पोस्ट

गणपतीची मुर्ती कशी असावी ???* बरेच जण आता आपल्या घरी बाप्पाला  आणण्यासाठी मूर्ती बुकिंग करायला जातात तर त्यामध्ये काय पाहिलं जावं याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे 👇👇👇👇👇👇 १) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये,कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात,१३) *विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या,**अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !* आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका 🙏 🌷 *गणपती बाप्पा मोरया*🌷

Read More
error: Don't Try To Copy !!